फोटो – ट्विटर

विजय हजारे ट्रॉफीमधील (Vijay Hazare Trophy 2021) तामिळनाडू विरुद्ध सौराष्ट्र (Tamil Nadu vs Saurashtra) यांच्यातील सेमी फायनल शेवटच्या बॉलपर्यंत रंगली. दोन्ही टीमनं जिद्दीनं लढलेल्या या मॅचमध्ये तामिळनाडूने अगदी शेवटच्या बॉलवर 2 विकेट्सनं विजय मिळवत फायनलमध्ये (Tamil Nadu in Final) प्रवेश केला. या मॅचमध्ये तामिळनाडूची टीम अनेकदा अडचणीत आली, पण त्यावर त्यांनी मात करत आपली टीम देशांतर्गत क्रिकेटमधील लिमिटेड ओव्हर्समध्ये बेस्ट का आहे हे दाखवून दिले. सौराष्ट्राच्या 35 वर्षांच्या खेळाडूची दमदार सेंच्युरी हे देखील या मॅचचे वैशिष्ट्य ठरले.

मोठ्या मॅचमध्ये सेंच्युरी

सौराष्ट्राच्या टीमनं भारतीय क्रिकेटला अनेक झुंजार खेळाडू दिले आहे. या टीममधले चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) हे सर्वांना माहिती आहेत. पण, या पलिकडेही सौराष्ट्राची टीम मजबूत आहे. त्यामुळेच हे दोन प्रमुख खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमुळे दूर असूनही सौराष्ट्रानं रणजी ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली आहे.

सौराष्ट्राच्या टीममधील एक महत्त्वाचा खेळाडू म्हणजे त्यांचा विकेट किपर-बॅटर शेल्डन जॅक्सन (Sheldon Jackson).  फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 49 च्या सरासरीनं खेळणाऱ्या 35 वर्षांच्या शेल्डननं यावर्षी सय्यद मुश्ताक अली स्पर्धा देखील गाजवली होती. तरीही त्याची इंडिया A टीममध्ये निवड झाली नाही, त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.

विजय हजारे स्पर्धेत आत्तापर्यंत शेल्डनचा फॉर्म खास नव्हता. मागील 6 मॅचमध्ये त्याने 0, 21, 65, 10, 5 आणि 15 रन काढले होते. पण सेमी फायनलमध्ये स्पर्धेतील मोठ्या लढतीत शेल्डन फॉर्मात आला. तामिळनाडूच्या चौफेर बॉलिंग अटॅकसमोर त्याने लिस्ट A क्रिकेटमधील 8 वी सेंच्युरी झळकावली. शेल्डननं 125 बॉलमध्ये 134 रन काढले. त्याच्या या सेंच्युरीमुळे सौराष्ट्राने तामिळनाडूला विजयासाठी 50 ओव्हर्समध्ये 311 रनचं आव्हानात्मक टार्गेट ठेवले.

‘सिलेंडर डिलिव्हरी मॅन’च्या मुलाची कमाल, IPL Auction मध्ये होणार मालामाल

जुळ्या भावांनी सावरले

311 रनचा पाठलाग करताना तामिळनाडूची सुरूवात खराब झाली. क्वार्टर फायनलमध्ये सेंच्युरी झळकावणारा जगदीशन शून्यावर आऊट झाला. कॅप्टन विजय शंकर देखील फक्त 4 रन काढून परतला. तामिळनाडूचा स्कोर 2 आऊट 23 होता त्यावेळी बाबा अपराजित आणि बाबा इंद्रजित या जुळ्या भावांनी तामिळनाडूला (Tamil Nadu in Final) सावरले.

अपराजित-इंद्रजित जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी 97 रनची महत्त्वपूर्ण पार्टनरशिप केली. इंद्रजित 50 रन काढून आऊट झाला. तर अपराजितने सेंच्युरी झळकावत 124 बॉलमध्ये 122 रन काढले.

शाहरूख खानचा आणखी एक ‘सुपरहिट शो’, 13 बॉलमध्ये काढले 64 रन

‘सुंदर’ टच

तामिळनाडूला विजय मिळवण्यासाठी आणखी एका दमदार खेळीची गरज होती. ती गरज टीम इंडियाचा ऑल राऊंडर वॉशिंग्टन सुंदरनं (Washington Sundar) भरून काढली. सुंदरलाही या स्पर्धेत बॅटनं फार कमाल करता आली नव्हती. पण, सेमी फायनलमध्ये निर्णायक क्षणी त्याने 70 रनची खेळी करत तामिळनाडूला विजयाच्या जवळ नेले.

सुंदरच्या खेळीनंतरही सौराष्ट्रानं शेवटपर्यंत मॅच सोडली नव्हती. मॅचच्या शेवटच्या बॉलपूर्वी दोन्ही टीमचा स्कोअर बरोबरीत होता. त्यावेळी आर. साई किशोरनं फोर लगावत तामिळनाडूच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. आता फायनलमध्ये तामिळनाडूची लढत हिमाचल प्रदेशशी (Tamil Nadu in Final) होणार आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: