
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आजवर 70 सेंच्युरी झळकावल्या आहेत. गेल्या वर्षात कोरोनामुळे क्रिकेट बराच काळ बंद होतं. त्यानंतर विराटनं काही काळ कौटुंबिक कारणामुळे क्रिकेटपासून ब्रेक घेतला होता. या सर्व काळात विराटवर शतकांची देवता रुसलेली आहे. विराटनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सेंच्युरी झळकावून बराच काळ लोटला आहे. हे जरी असलं तरी त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. विराट कोहलीनं सोशल मीडियावर एक सेंच्युरी झळकावली आहे. इन्स्टाग्रामवर 100 मिलियन (10 कोटी) फॉलोअर्स असणारा विराट (Virat Kohli Instagram) पहिला भारतीय आणि पहिला क्रिकेटपटू बनला आहे.
फुटबॉलपटूंच्या रांगेत विराट
विराट कोहलीच्यापूर्वी 100 मिलियन क्लबमधील खेळाडूंमध्ये फक्त फुटबॉलपटूंचा समावेश होता. ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo), लिओनेल मेस्सी (Lionel Messi) आणि नेयमार (Neymar) या फुटबॉलपटूंचे इन्स्टाग्रामवर 100 मिलियन फॉलोअर्स आहेत. खेळाडूंच्या यादीत ख्रिस्तियानो रोनाल्डो सर्वात आघाडीवर असून त्याचे 266 मिलियन फॉलोअर्स आहेत. आतंरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल (ICC) आणि विराटची आयपीएल टीम असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांनी यासाठी विराटचं (Virat Kohli Instagram) अभिनंदन केलं आहे.
विराटनं टाकलं प्रियाकांला मागं
सध्या अमेरिकेत स्थायिक असलेली भारतीय स्टार प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) भारतीय सेलिब्रेटींच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्रियांकाचे इन्स्टाग्रामवर 60 मिलियन फॉलोअर्स आहेत. श्रद्धा कपूर (Sharddha Kapoor) तिसऱ्या क्रमांकावर असून तिचे 58 मिलियन फॉलोअर्स आहेत.
( वाचा : कुणाची आकडेवारी आहे सरस, विराट कोहली की जो रुट ? )
मैदानातील दुष्काळ संपवा
विराट कोहली सध्या अहमदाबादमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात चार मार्चपासून सुरु होणाऱ्या चौथ्या आणि शेवटच्या टेस्टसाठी सराव करत आहे. या सीरिजमध्ये विराटनं आत्तापर्यंत 3 टेस्टमध्ये 34.40 च्या सरासरीनं 172 रन केले आहेत. 74 हा त्याचा या सीरिजमधील सर्वोच्च स्कोअर आहे.
विराटच्या दर्जाचा विचार करता हे रन कमी आहेत. या सीरिजमध्ये सर्वात जास्त रन करण्याच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर असून जो रुट, रोहित शर्मा आणि आर. अश्विन यांनी विराटपेक्षा जास्त रन केले आहेत. त्यामुळे चौथ्या टेस्टमध्ये विराटनं सेंच्युरी मारुन वर्षभराचा दुष्काळ संपवावा अशीच सर्वांची अपेक्षा आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.