फोटो – सोशल मीडिया

टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी मुंबईमध्ये खळबळजनक पत्रकार परिषद घेतली होती. विराटनं त्या पत्रकार परिषदेमध्ये केलेल्या आरोपानंतर विराट आणि बीसीसीआय (BCCI) यांच्यात एकवाक्यता नसल्याचं उघड झाले. या सर्व प्रकरणात निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी अखेर मौन सोडले आहे.शर्मा यांनी विराटच्या वक्तव्यावर दिलेल्या स्पष्टीकरणानंतर (Chetan Sharma on Virat) विराट आणि बीसीसीआयमध्ये  नेमकं कोण खरं बोलतंय? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

काय म्हणाला होता विराट?

T20 टीमची कॅप्टनसी सोडू नकोस असा विराटला सल्ला दिल्याचा दावा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी केला होता. विराटनं मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये तो दावा फेटाळला होता.

मी T20 टीमची कॅप्टनसी सोडण्याबाबत बीसीसीआयशी चर्चा केली. त्यावेळी त्यावेळी बोर्डाने या निर्णयाचे स्वागत केले. मला T20 टीमची कॅप्टनसी सोडू नकोस असे कधीही सांगण्यात आले नाही. मी त्यावेळी वन-डे आणि टेस्ट टीमची कॅप्टसी यापुढेही करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण, बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना मला या पदावरून हटवायचं असेल तरी आपली तयारी आहे.’ असे त्यांना कळवल्याचा दावा विराटनं केला होता.  

रोहित शर्माशी संबंध ते सौरव गांगुलीचे वक्तव्य विराट कोहलीने दिले 5 मोठ्या मुद्यांवर स्पष्टीकरण

शर्मांचे स्पष्टीकरण काय?

चेतन शर्मांनी T20 वर्ल्ड कपपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत काय झालं होतं याचे स्पष्टीकरण दिले आहे. ‘T20 वर्ल्ड कपच्या पूर्वी विराटनं घेतलेल्या निर्णयानं आम्हा सर्वांना धक्का बसला होता. विराटनं या निर्णयाचा फेरविचार करावा तसंच आपण या निर्णयावर वर्ल्ड कपनंतर चर्चा करू अशी विनंती बैठकीला उपस्थित असलेल्या सर्वांनीच विराटला केली होती.

विराटच्या या निर्णयाचा वर्ल्ड कपवर परिणाम होईल असे निवड समितीमधील सर्व सदस्यांचे  मत होते. भारतीय क्रिकेटच्या भल्यासाठी या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती सर्वांनी विराटला केली. त्या बैठकीला उपस्थित असलेल्या बीसीसीआय अधिकाऱ्यांचे देखील हेच मत होते. विराटसारख्या खेळाडूचा या प्रकराचा निर्णय ऐकल्यानंतर कुणाला शॉक बसणार नाही ?.

या विषयावर वर्ल्ड कपनंतर चर्चा करावी असा आमचा विचार होता. पण, विराट त्याच्या निर्णयावर ठाम असल्यानं आम्हाला त्याचा आदर करावा लागला. आम्हाला वर्ल्ड कपपूर्वी कोणताही वाद नको होता.’ असे स्पष्टीकरण शर्मा यांनी (Chetan Sharma on Virat) दिले आहे.

चेतन शर्मा यांची पत्रकार परिषद पाहण्यासाठी इथे क्लिक करा

वन-डे टीमची कॅप्टनसी का काढली?

‘निवड समितीने त्यांच्या बैठकीपूर्वी दीड तास आधी माझ्याशी संपर्क साधला होता. आम्ही त्यावेळी दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील टेस्ट टीमवर चर्चा केली. ही चर्चा संपत आली असताना त्यांनी मला तू आता वन-डे टीमचा कॅप्टन नसशील असे सांगितले. मी तो निर्णय मान्य केला.’ असे विराटने मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते.

चेतन शर्मा यांनी विराटच्या या वक्तव्यावर देखील स्पष्टीकरण दिले आहे.विराटनं T20 टीमची कॅप्टनसी सोडल्यानंतर आम्ही (निवड समितीनं) त्याला वन-डे टीमच्या कॅप्टनपदावरून काढले. मी स्वत: त्याला टेस्ट टीम निवडण्याबाबतची बैठक सुरू होण्यापूर्वी दीड तास आधी फोन केला होता. आमच्यात चांगली चर्चा झाली. लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये एकच कॅप्टन हवा हे निवड समितीचं मत, विराटनं मान्य केलं, असा दावा शर्मा यांनी (Chetan Sharma on Virat) केला आहे.

विराट कोहलीच्या वक्तव्यावर गांगुलीचं उत्तर, दादानं सांगितलं पुढं काय करणार

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.