देशातील वाढत्या कोरोना संकटात सामजिक भान जपत अनेक क्रिकेटपटू मदतीसाठी पुढे आले आहेत. आजी-माजी क्रिकेटपटूंनी या काळात वेगवेगळ्या प्रकारची मदत केली आहे. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) देखील या कामामध्ये आघाडीवर आहे. त्यानं नुकतेच लोकसहभागातून (crowdfunding)  या कामासाठी 11 कोटी (Virat Kohli Helps) जमवले. या अभियानाची सुरुवातच विराट आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांनी 2 कोटी रुपये दिली आहे.

भारतीय क्रिकेटपटूला मदत

विराटनं नुकतीच एका भारतीय क्रिकेटपटूला संकटात मदत केली आहे. केएस श्रवंती नायडू (KS Shravanthi Naidu) हिची आई सध्या कोरोनामुळे गंभीर आजारी आहे. श्रवंतीने आईच्या उपचारासाठी 16 लाख खर्च केले असून पुढील उपचारासाठी तिला आणखी पैशांची गरज आहे. श्रवंतीनं यासाठी बीसीसीआय (BCCI) आणि हैदराबाद क्रिकेट असोसिएशन (HCA) कडे मदतीची विनंती केली होती. त्यानंतर बीसीसीआयच्या दक्षिण भारत विभागाची माजी संयोजक एन. विद्या यादव (N. Vidya Yadav) हिनं सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट लिहली. या पोस्टमध्ये तिने विराटलाही टॅग करत मदत करण्याचं आवाहन केले होते.

विराटला याची माहिती होताच त्याने तातडीने 6.77 लाख रूपयांची मदत (Virat Kohli Helps)  श्रवंतीला केली. विराटनं इतक्या तातडीनं मदत केल्याबद्दल आश्चर्य वाटले, अशी भावना विद्या यादवनं ‘स्पोर्ट्सस्टार’ शी बोलताना व्यक्त केली आहे. टीम इंडियाचे फिल्डिंग कोच आर. श्रीधर यांनी याबाबाबत विराटला माहिती दिल्याबद्दल विद्यानं त्यांचे आभार मानले आहेत.

लेडी धोनी म्हणून ओळखली जाणारी इंद्राणी रॉय कोण आहे?

मदतीसाठी आणखी हात पुढे

विराट कोहलीप्रमाणे श्रवंतीला मदतत करण्यासाठी आणखी हात पुढे येण्यास सुरुवात झाली आहे. हैदराबाद क्रिकेट असोसिएशननं तिला 3 लाखांची तातडीची मदत दिली असून आणखी 2 लाख रूपये लवकरच देणार असल्याचं सांगितले आहे. त्याचबरोबर टीम इंडियाचा खेळाडू हनुमा विहारी (Hanuma Vihari) आणि बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा (Jwala Gutta) यांनी देखील श्रवंतीला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

श्रवंतीच्या नावावर पदार्पणातच रेकॉर्ड

श्रवंतीनं आंतरराष्ट्रीय कारकीर्दीमध्ये 1 टेस्ट, 4 वन-डे आणि 6 T20 मॅच खेळल्या आहेत. श्रवंतीच्या नावावर पहिल्याच T20 मॅचमध्ये बेस्ट बॉलिंगचा रेकॉर्ड आहे. बांगलादेश विरुद्ध 2014 साली झालेल्या त्या T20 मध्ये श्रवंतीनं 9 रन देऊन 4 विकेट्स घेतल्या होत्या.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: