
एखादं साम्राज्य उभं राहण्यासाठी अनेक वर्ष लागतात. ते लयाला जाण्याचा कालावधी हा तुलनेनं कमी असतो. एखादी ठिणगी देखील शक्तीशाली साम्राज्य नष्ट करू शकते, हा इतिहास आहे. विराट कोहली (Virat Kohli) म्हणजे भारतीय क्रिकेट, अशी काही महिन्यांपूर्वीपर्यंत परिस्थिती होती. विराटचा प्रत्येक शब्द ही भारतीय क्रिकेटमधील पूर्व दिशा होती. गेल्या 4 महिन्यांमध्ये ही परिस्थिती बदलली आहे. 4 महिन्यांमध्ये विराट कोहलीला 4 टीमच्या कॅप्टनसी सोडव्या लागल्या आहेत. विराटच्या कारकिर्दीमधील (Virat Kohli Captaincy Timeline) हा सर्वात वादळी कालखंड आहे.
16 स्पटेंबर 2021: विराट कोहलीनं या दिवशी एक मोठा निर्णय घेतला. त्या दिवशी विराटने टीम इंडियाच्या T20 टीमची कॅप्टनसी सोडणार असल्याचे जाहीर केले. आपण आगामी वर्ल्ड कपनंतर ही कॅप्टनसी सोडू असा निर्णय, विराटने त्या दिवशी जाहीर केला. या निर्णयानंतरच त्याचे साम्राज्य संपण्यास सुरूवात झाली.
19 सप्टेंबर 2021: विराट कोहलीनं 3 दिवसांमध्येच दुसरा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) टीमची कॅप्टनसी आयपीएल सिझननंतर सोडणार असल्याचे विराटने जाहीर केले. विराट 2013 साली आरसीबीचा कॅप्टन बनला होता. त्याच्या कॅप्टनसीमध्ये आरसीबीने 11 ऑक्टोबर रोजी शेवटचा सामना खेळला. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध ‘प्ले ऑफ’मध्ये पराभूत झाल्यानंतर कॅप्टन म्हणून आरसीबीसाठी आयपीएल जिंकण्याचं स्वप्न अपूर्ण राहिले.
8 नोव्हेंबर 2021: टीम इंडियाचे T20 वर्ल्ड कपमधील आव्हान या दिवशी संपुष्टात आले. पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्धच्या मॅचमध्ये पराभव झाल्याने भारतीय टीम सेमी फायनमध्ये प्रवेश करू शकली नाही. वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात पाकिस्तान विरुद्ध पहिला पराभव आणि 2014 नंतर पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेत बाद फेरी गाठण्यात अपयश या दोन गोष्टी विराटच्या कॅप्टनसीमध्ये झाल्या. विराटच्या T20 प्रकारातील कॅप्टनसीचा दुखद शेवट (Virat Kohli Captaincy Timeline) झाला.
8 डिसेंबर 2021: विराट कोहलीला वन-डे टीमच्या कॅप्टनसीपदावरून हटवण्याचा निर्णय या दिवशी निवड समितीनं जाहीर केला. विराटच्या जागी रोहित शर्माची (Rohit Sharma) या टीमचा कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली.
15 डिसेंबर 2021: दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी विराटची वादळी पत्रकार परिषद मुंबईमध्ये झाली. या पत्रकार परिषदेत विराटने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांचा दावा खोडला. विराट आणि बीसीसीआयमध्ये ‘ऑल इज वेल’ नसल्याचे त्या दिवशी स्पष्ट झाले.
रोहित शर्माशी संबंध ते सौरव गांगुलीचे वक्तव्य विराट कोहलीने दिले 5 मोठ्या मुद्यांवर स्पष्टीकरण
15 जानेवारी 2022: दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरिज जिंकण्याचे टीम इंडियाचे स्वप्न अधुरे राहिले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी विराट कोहलीने टेस्ट टीमची कॅप्टनसी सोडण्याचा जाहीर करत सर्वांना धक्का (Virat Kohli Captaincy Timeline) दिला.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.