
अनेकांना फोनवर बोलताना किंवा त्यामधील इंटरनेटचा वापर करताना वेळेचं भान राहत नाही. त्यामुळे त्यांना महिनाअखेरीस लाखो रुपयांचं बिल येतं. पण फक्त एक तास फोनवर व्हिडिओ पाहत बसल्यानं टीम इंडियाचा (Team India) कॅप्टन विराट कोहलीला (Virat Kohli) तब्बल तीन लाखांचं बिल आलं होतं. विराटचा ‘तो’ अनुभव सांगणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
व्हिडीओत काय आहे?
कलर्स टीव्ही (Clors TV) वरील ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ (Comedy Nights With Kapil) या कपिल शर्माच्या (Kapil Sharma) शो मधील हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत विराट एकदम आनंदी आणि थट्टा मस्करी करण्याच्या मूडमध्ये दिसत आहे.
( वाचा : भर मैदानात सहकाऱ्याला मारणार होता ‘हा’ बांगलादेशी! पाहा व्हिडीओ )
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 360 रन्सचा पाठलाग केल्यानंतरची आठवण देखील या शो मध्ये उपस्थित असलेला टीम इंडियाचा माजी खेळाडू नवजोत सिंग सिद्धूने (Navjot Singh Sidhu) शेअर केली, त्यालाही विराटनं अगदी खेळकर मुडमध्ये दाद दिली. त्याचबरोबर बोरिवलीच्या अनुष्का या तरुणीनं विचारलेल्या प्रश्नावर तो निरुत्तर झाला होता. त्यानंतर कपिल शर्मानं ‘बोरिवलीच्या अनुष्का’ची त्याच्या खास स्टाईलनं फिरकी घेतली.
का आले इतके बिल?
विराट कोहलीनं यावेळी श्रीलंकेतल्या विमानतळावरचा त्याचा अनुभव सांगताना भरमासाठ बिलाचा किस्सा शेअर केला. विराट टीममधील सहकाऱ्यांसोबत श्रीलंकेच्या विमानतळावर बॅग्ज येण्याची वाट पाहत होता. रिकामा वेळ घालवण्यासाठी त्याने कपिल शर्माचा शो पाहणं सुरु केलं. विमानतळावरचं वाय-फाय नीट चालत नव्हतं. त्यामुळे त्यानं भारतामधील मोबाईलच्या रोमिंग इंटरनेटवर कपिल शर्माच्या शो चा व्हिडीओ पाहणं सुरु केले.
विराटच्या भावानं साधारण तासाभरानं काळजीनं विराटला फोन केला. “तू कुठे आहेस, आणि काय करत आहेस?’ असे त्यानं विराटला विचारले. विराटचा मोबाईल हरवला, या काळजीनं त्यांनी हा फोन केला होता. त्यावर ‘श्रीलंकेच्या विमानतळावर मोबाईमध्ये व्हिडीओ पाहत असल्याचं, विराटनं सांगितले. त्यावेळी विराट कोहलीच्या मोबाईलचं तासाभरातच तीन लाख रुपये बिल आलं आहे, अशी माहिती भावानं विराटला दिली. विराटने मोबाईलवर कॉमेडी व्हिडीओ पाहण्यासाठी भारतीय कंपनीच्या मोबाईलचे इंटरनेट कनेक्शन सुरु केले होते. त्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय रोमिंगच्या दरानुसार तासाभरातच तीन लाखांचे बिल आले होते.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.
You must be logged in to post a comment.