
विराट कोहली (Virat Kohli) भारतीय क्रिकेट टीमची कॅप्टनसी सोडणार आहे. स्वत: विराटनंच हे जाहीर केलं आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या T20 वर्ल्ड कपनंतर तो या फॉरमॅटमध्ये कॅप्टनसी (Virat Kohli Steps Down) करणार नाही. टीम इंडियाचा T20 कॅप्टन म्हणून आगामी वर्ल्ड कप ही त्याची शेवटची स्पर्धा असेल. गेल्या काही दिवसांपासून विराट कॅप्टनसी सोडणार अशी चर्चा सुरू होती. बीसीसीआयनं ही चर्चा फेटाळली होती. मात्र आता विराटनंच या विषयावर शिक्कामोर्तब केलं आहे.
काय म्हणाला विराट?
विराटनं या विषयावर पोस्ट लिहून त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘मी अत्यंत भाग्यवान आहे. मी फक्त भारतीय टीमचं प्रतिनिधित्व केलं नाही तर पूर्ण क्षमतेनं कॅप्टनसी देखील केली. या काळात मला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे मी आभार मानतो. सहकारी खेळाडू, सपोर्ट स्टाफ, निवड समिती, कोच आणि ज्या प्रत्येकानं भारतीय टीमसाठी प्रार्थना केली त्या सर्वांचा मी आभारी आहे.
गेल्या 8-9 वर्षांपासून मी तिन्ही प्रकारात देशाचं प्रतिनिधित्व करत आहे. मागील 5-6 वर्षांमध्ये तीन प्रकारात कॅप्टन आहे. मला असं वाटतंय की, टेस्ट आणि वन-डे फॉर्मेटमधील कॅप्टनसीसची तयारी करण्यासाठी मला थोडी स्पेस आवश्यक आहे. T20 टीमचा कॅप्टन म्हणून मी माझ्याकडून सर्व काही केलं. आता T20 टीममध्ये बॅट्समन म्हणून करणार आहे.
मी हा निर्णय खूप विचार करुन घेतला आहे. रवी भाई, रोहित आणि माझ्या जवळच्या व्यक्तींशी बरीच चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला. मी या T20 वर्ल्ड कपनंतर T20 टीमची कॅप्टनसी सोडणार (Virat Kohli Steps Down) आहे. मी बीसीसीआय सचिव जय शहा आणि अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याशी देखील या विषयावर चर्चा केली आहे. निवड समितीशी देखील चर्चा केली. मी भारतीय क्रिकेट आणि भारतीय टीमची पूर्ण क्षमतेनं सेवा करत राहीन.’ असं विराटनं जाहीर केलं आहे.
विराटचा कॅप्टनसी रेकॉर्ड
विराट कोहलीनं 45 आंतरराष्ट्रीय T20 मॅचमध्ये टीम इंडियाची कॅप्टनसी केली आहे. यामध्ये 29 मॅच टीमनं जिंकल्या आहेत. तर 13 मध्ये पराभव झाला असून 2 मॅचचा निकाल लागला नाही. विराटच्या कॅप्टनसीमध्ये विजयाची टक्केवारी 65.11 टक्के आहे.
‘या’ 5 कारणांमुळे रोहित शर्मा ठरेल विराट कोहलीपेक्षा चांगला कॅप्टन!
विराट 2017 साली इंग्लंड विरुद्धच्या सीरिजमध्ये पहिल्यांदा T20 टीमचा कॅप्टन झाला होता. आगामी T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया पहिल्यांदाच त्याच्या कॅप्टनसीमध्ये खेळणार (Virat Kohli Steps Down) आहे. आता विराटनंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) T20 प्रकारात कॅप्टन होणार हे स्पष्ट आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.