फोटो – ट्विटर, आयसीसी

भारतीय टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) त्याच्या पदाचा राजीनामा दिला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टेस्ट सीरिज (India vs South Africa) गमावल्यानंतर दुसऱ्या दिवशी विराटनं हा निर्णय जाहीर केला. विराटनं सोशल मीडियावर या निर्णयाची घोषणा करताना भावुक प्रतिक्रिया दिली आहे. विराटने मागच्या वर्षी T20 वर्ल्ड कपपूर्वी त्या प्रकारातील कॅप्टनसी सोडली होती. त्यानंतर त्याला वन-डे टीमच्या कॅप्टन पदावरून हटवण्यात आले. आता त्याने टेस्ट टीमची कॅप्टनसीही देखील सोडली (Virat quits Test Captaincy) आहे.

विराटची भावुक प्रतिक्रिया

विराट कोहलीनं कॅप्टनसी सोडताना बीसीसीआयचे ही संधी दिल्याबद्दल आभार मानले आहेत. ‘मी सात वर्ष टीमला योग्य दिशेनं नेण्यासाठी खडतर परिश्रम केले आहेत. मी माझी काम प्रामाणिकपणे केले. त्यामध्ये कधीही कचुराई केली नाही. प्रत्येक गोष्टीचा शेवट कधी तरी होतो. माझा टेस्ट टीमचा कॅप्टन म्हणून प्रवास समाप्त होत आहे.’

विराट पुढे म्हणतो, ‘माझ्या या प्रवासात अनेक चढ-उतार झाले. पण, कधीही प्रयत्न आणि विश्वासात कमतरता नव्हती. प्रत्येक गोष्टीत 120 टक्के योगदान देण्यावर माझा विश्वास आहे. मी हे करू शकत नसेल तर ते योग्य नाही, हे मला माहिती आहे. माझ्या मनात त्याबद्दल कोणताही गोंधळ (Virat quits Test Captaincy) नाही.

मला एवढ्या मोठ्या कालावधीमध्ये कॅप्टनसी करण्याची संधी दिली, त्याबद्दल बीसीसीआयचे आभार मानतो. त्याचबरोबर टीमचे सर्व सहकारी एका व्हिजनसह आले होते. मी त्याची पहिल्या दिवशी कल्पना केली होती. त्यांनी कधीही कोणत्याही परिस्थितीमध्ये हार मानली नाही. तुम्ही सर्वांनी माझा प्रवास सुंदर बनवला. रवी भाईंचे (Ravi Shastri) आभार. त्याचबरोबर आमच्या पाठीशी राहणाऱ्या सर्व सपोर्ट ग्रुपचे आभार. त्या सर्वांची मोठी भूमिका होती. सर्वात शेवटी महेंद्रसिंह धोनीचे (MS Dhoni) खूप आभार. त्याने कॅप्टन म्हणून माझ्यावर विश्वास दाखवला.’

सर्वात यशस्वी कॅप्टन

विराट कोहली हा भारतीय टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कॅप्टन आहे. विराटने 68 टेस्टमध्ये टीमची कॅप्टनसी केली. त्यामध्ये त्याने 40 मध्ये विजय मिळवला. तर, 17 मध्ये पराभव झाला आणि 11 टेस्ट ड्रॉ झाल्या. विराटच्या कॅप्टनसीमध्येच भारताने 2018 साली ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्याच्या कारकिर्दीमध्ये टीम इंडिया टेस्ट रँकिंगमध्ये नंबर 1 वर पोहचली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Championship) फायनलमध्ये धडक मारली. न्यूझीलंडने फायनलमध्ये टीमचा पराभव केला.

विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माला कॅप्टन का करण्यात आले? वाचा Inside Story

विराटच्या कॅप्टनसीमधील सात वर्षांच्या काळात भारताने मायदेशात एकही सीरिज गमावली नाही. ऑस्ट्रेलियासह श्रीलंका आणि वेस्ट इंडिजमध्येही टेस्ट सीरिज जिंकली. तसेच इंग्लंडमध्येही या वर्षी झालेल्या सीरिजमध्ये टीम इंडिया आघाडीवर असून यंदा सीरिज गमावणार नाही, हे नक्की आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: