
बडोदा (Baroda) विरुद्ध हरयाणा (Haryana) ही सय्यद मुश्ताक अली T20 (Syed Mushtaq Ali Trophy 2021) स्पर्धेची क्वार्टर फायनल शेवटच्या बॉलपर्यंत रंगली. बडोद्याला शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 18 रन्सची आवश्यकता होती. संपुर्ण मॅचमध्ये चांगली बॉलिंग करणाऱ्या सुमीत कुमारनं (Sumit Kumar) पहिले तीन बॉल चांगले टाकले. त्या तीन बॉलवर फक्त 3 रन निघाले. आता बडोद्याला 3 बॉलमध्ये 15 रन हवे होते. बडोद्याच्या विष्णू सोळंकीनं (Vishnu Solanki) त्या दबावात सर्वोत्तम खेळ केला. त्यानं शेवटच्या तीन बॉलमध्ये 6,4 आणि 6 रन काढत बडोद्याला विजय मिळवून दिला. त्यामधील शेवटच्या बॉलवर तर विष्णूनं महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) हेलिकॉप्टर शॉट खेचत विजयी सिक्सर मारला.
हरयाणाची संथ सुरुवात
या स्पर्धेत कृणाल पांड्यानं (Krunal Pandya) माघार घेतल्यानंतर बडोद्याची कॅप्टनसी करणाऱ्या केदार देवधरनं (Kedar Devdhar) टॉस जिंकला आणि पहिल्यांदा फिल्डिंग घेतली. केदारनं सुरुवातीलाच एक चपळ रनआऊट करत हरयाणाला धक्का दिला. त्यानंतर हरयाणानं संथ बॅटिंग केली. त्यांनी पॉवर प्लेमध्ये 2 आऊट 33 रन केले होते. तर दहाव्या ओव्हरनंतर त्यांचा स्कोअर 2 आऊट 58 असा होता.
( वाचा : SMAT: गतविजेत्या कर्नाटकचं आव्हान संपुष्टात, पंजाबची सेमी फायनलमध्ये धडक! )
हिमांशू राणा आणि शिवम चौहान यांनी नंतर थोडी फटकेबाजी केली. राणाची हाफ सेंच्युरी फक्त 1 रननं हुकली. तर शिवम 35 रन काढून आऊट झाला. आयपीएल स्पर्धा (IPL 2020) गाजवणाऱ्या राहुल तेवतियाकडून (Rahul Tewatia) हरयाणाला मोठ्या अपेक्षा होता. तेवतिया 10 बॉलमध्ये 10 रन काढून रन आऊट झाला. सुमीत कुमारनं शेवटी केलेल्या फटकेबाजीमुळे हरयाणानं बडोद्यासमोर 149 रनचं टार्गेट ठेवलं.
बडोद्याचा आठ विकेट्सनं विजय
बडोद्यानंही हरयाणाप्रमाणेच संथ सुरुवात केली. पहिल्या पॉवर प्लेनंतर त्यांचा स्कोअर 1 आऊट 33 तर 10 ओव्हरनंतर 1 आऊट 55 होता. विष्णू सोळंकी आणि कॅप्टन केदार देवधरनं दुसऱ्या विकेटसाठी 68 रन्सची पार्टरनरशिप केली. केदारला 43 रनवर सुमीत कुमारनं आऊट केलं.
( वाचा : SMAT: अर्जुन सचिन तेंडुलकरचं मुंबईकडून पदार्पण, पहिल्या मॅचमध्ये घेतली एक विकेट -VIDEO )
केदार आऊट झाल्यानंतर विष्णू सोळंकीनं मॅचची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली. हरयाणाचा कॅप्टन मोहित शर्मानं (Mohit Sharma) 19 व्या ओव्हरमध्ये फक्त 5 रन दिले. त्यानंतर बडोद्यावर दडपण वाढलं होतं. पण, विष्णूनं धोनीप्रमाणे थंड डोक्यानं खेळ करत शेवटी धोनीसारखाच हेलिकॉप्टर शॉट खेचत टीमला सेमी फायनलमध्ये पोहचवलं.
मोहित शर्मा, युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) जयंत यादव (Jayant Yadav) आणि राहुल तेवतिया या अनुभवी चौकडीकडून हरयाणाला मोठ्या अपेक्षा होत्या. यापैकी फक्त चहलनं एक विकेट घेतली. अन्य तिन्ही बॉलर्सना विकेट मिळवण्यात अपयश आलं. आता बडोद्याची सेमी फायनलमध्ये पंजाब विरुद्ध लढत होणार आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.