जुन्या वैभवाचे दाखले देत वर्तमानात जगणारी टीम अशी पाकिस्तानची क्रिकेट विश्वात ओळख आहे. पाकिस्तानला फास्ट बॉलर्सची मोठी परंपरा आहे, असं मानले जाते. इम्रान खान, वासिम अक्रम, वकार युनूस, शोएब अख्तर इ.इ. अशी अनेक नावं त्यासाठी दिली जातात. पाकिस्तानचा ‘ऑल टाईम ग्रेट’ बॉलर असलेल्या वकार युनूसवर लबाडी करण्याचा (Cheater Waqar Younis) आरोप झाला आहे. हा आरोप पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर मोहम्मद आसिफ (Mohammad Asif ) याने केला आहे.

वकार युनूसनं त्याच्या आंतरराष्ट्रीय करियरमध्ये 700 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. वासिम अक्रमसोबतची (Wasim Akram) त्याची जोडी अतिशय खतरनाक मानली जात होती. रिव्हर्स स्विंग (reverse swing) या कलेत वकार हा अतिशय निष्णात ‘कलाकार’ मानला जात होता. मोहम्मद आसिफनं वकारच्या या कलेबाजीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

काय म्हणाला आसिफ?

‘तो (वकार) रिव्हर्स स्विंग मिळावा म्हणून बॉलशी छेडछाड (Cheater Waqar Younis) करत असे. त्याच्या करियमधील बहुतेक काळ नव्या बॉलनं बॉलिंग कशी करायची हे त्याला ठाऊक नव्हते. क्रिकेट करियर उतरणीला आल्यावर तो नव्या बॉलनं बॉलिंग करायला शिकला.’

आसिफ इतक्यावरच थांबला नाही. त्याने वकारच्या कोचिंगवरही गंभीर शंका उपस्थित केली आहे. ‘त्याने एकही फास्ट बॉलर घडवलेला नाही. त्यानं त्याचा स्वभाव बदलला असता तर पाकिस्तानला अनेक चांगले बॉलर मिळाले असतो. तो रिव्हर्स स्विंगचा मास्टर म्हणून ओळखला जातो. पण त्याला एकही परफेक्ट रिव्हर्स स्विंग टाकणारा बॉलर तयार करता आलेला नाही. पाकिस्तानकडे जे काही फास्ट बॉलर आहेत, त्यांना रोटेट केले जाते. त्यांच्यात एकही क्वालिटी बॉलर नाही. मागच्या 20 वर्षातील कोचिंग करियरमध्ये वकारनं काय केलं आहे?’ असा प्रश्न आसिफनं विचारला आहे.

( Explained: पाकिस्तान फास्ट बॉलर्सची खाण आहे! तर 26 वर्षांपासून ‘हे’ का जमत नाही? )

वकार युनूसनं रिटायरमेंटनंतर पाकिस्तानचा मुख्य कोच म्हणून काम केलं असून सध्या तो पाकिस्तानच्या राष्ट्रीय टीमचा बॉलिंग कोच आहे. Arey News शी बोलताना आसिफनं वकारवर हे सर्व आरोप केले आहेत.

‘आसिफही स्वच्छ नाही’

पाकिस्तानचा बॉलिंग कोच वकार युनूसवर आरोप करणाऱ्या मोहम्मद आसिफची कारकीर्द देखील बदनामच आहे. आसिफनं 2005 साली त्याचं आंतरराष्ट्रीय करियर सुरु केलं. त्याची गणणा पाकिस्तानच्या बेस्ट फास्ट बॉलरमध्ये होत होती. त्याने 23 टेस्टमध्ये 106 तर 38 वन-डे मध्ये 46 विकेट्स घेतल्या आहेत.

( जेंव्हा जडेजानं केली पाकिस्तानची धुलाई , पाहा VIDEO )

आसिफ 2010 साली फिक्सिंगमध्ये सापडला. त्याच्यावरील आरोप सिद्ध झाले आणि आसिफवर बंदी लादण्यात आली. त्यानंतर त्याचे क्रिकेट कारकीर्द संपली. या बंदीनंतर आसिफला पाकिस्तानच्या राष्ट्रीय टीममध्ये कमबॅक करता आले नाही.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: