फोटो – सोशल मीडिया

रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि त्याची आयपीएल टीम चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यातील वितुष्टाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. यापूर्वी आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान जडेजाला टीमच्या कॅप्टन पदावरून हटवण्यात आलं होतं. त्यानंतर सीएसके मॅनेजमेंटचा हा निर्णय जडेजाला आवडला नाही, अशा बातम्या आल्या होत्या. आता पुन्हा एकदा या विषयानं डोकं वर काढलंय.  जडेजाला समजवण्यासाठी सीएसके फॅन्स सोशल मीडियावर (Jadeja CSK Social Media) सक्रीय झालेत.

नेमकं काय घडलं?

आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान जडेजाला हटवून पुन्हा धोनीला कॅप्टन करण्याचा निर्णय या जिगरबाज ऑल राऊंडरला आवडला नाही. त्यामुळे तो सीएसकेला रामराम करणार अशा चर्चा फॅन्समध्ये सुरू आहेत. या चर्चेला संशय देण्याचं काम जडेजाच्या एका इन्स्टाग्राम पोस्टनं केलं आहे.

‘तुमचे स्टँडर्ड कधीही कुणासाठी कमी करू नका. स्वत:चा सन्मान सर्वात महत्त्वाचा आहे.’ अशा आशयाची पोस्ट जडेजानं इन्स्टाग्रामवर 18 जुलै रोजी केली आहे. जडेजानं यापूर्वी 9 जुलै रोजी गेल्या दोन वर्षांमधील चेन्नई सुपर किंग्स संबंधित इन्स्टाग्रामवरच्या पोस्ट डिलिट केल्या आहेत.

हे प्रकरण ताजे असतानाच जडेजाची नवी इन्स्टाग्राम पोस्ट म्हणजे त्यानं सीएसके सोडण्याचा निर्धार पक्का केल्याचे संकेत आहेत, अशी फॅन्सची भावना झाली आहे. त्यामुळे फॅन्सनी वेगवेगळे ट्विट करत त्यांच्या लाडक्या ‘सर रवींद्र जडेजा’ला सोडून न जाण्याचं आवाहन केलं आहे.

CSK ला महत्त्वाचा का?

रवींद्र जडेजा हा फक्क सीएसकेसाठी नाही तर जागतिक क्रिकेटमधील सध्याचा आघाडीचा ऑल राऊंडर आहे. धोनीचा विश्वासू सहकारी असलेला जडेजा गेल्या 11 वर्षांपासून सीएसके टीमचा महत्त्वाचा सदस्य आहे. धोनीनंतर त्याची कॅप्टन म्हणून निवड करत टीम मॅनेजमेंटनंही यापूर्वी जडेजाचं महत्त्वं दाखवून दिलं होतं.

जडेजा मागील सिझनमध्ये कॅप्टन म्हणून फेल गेला. खेळाडू म्हणून त्याचा फॉर्म नव्हता. त्यातच दुखापतीमुळे तो संपूर्ण सिझन खेळूही शकला नव्हता. मागील वर्षाच्या अपयशानंतरही जडेजाचं महत्त्व कमी होत नाही.

IPL 2022, Explained: महेंद्रसिंह धोनी पुन्हा कॅप्टन! ‘मास्टरस्ट्रोक’ की तडजोड?

जडेजानं बॅटर म्हणून त्याची उपयुक्तता गेल्या काही वर्षांमध्ये सिद्ध केलीय. पुढील सिझनमध्ये सीएसके चेन्नईत किमान 7 मॅच खेळणार आहे. चेन्नईच्या पिचवर जडेजाची स्पिन निर्णायक ठरू शकते. एक फिल्डर म्हणूनही तो जगातील कोणत्याही टीममध्ये खेळू शकतो. त्याचबरोबर जडेजा हा सीएसेमधील धोनीनंतरचा सर्वात लोकप्रिय ब्रँड आहे. त्यामुळे जडेजा सीएसकेसाठी महत्त्वाचा आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: