
भारतीय क्रिकेटमधील रवी शास्त्री (Ravi Shastri) यूग हे नोव्हेंबर महिन्यात संपणार अशी चिन्हे आहेत. शास्त्रीच्या प्रशिक्षकपदाचा कालावधी T20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2021) संपत आहे. त्यानंतर आपण मुदतवाढ घेणार नाही, असं शास्त्रीनी बीसीसीआयला स्पष्ट केल्याचं ‘इंडियन एक्स्प्रेस’ च्या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आले. शास्त्रीने प्रशिक्षकपद सोडल्यास त्यांची जागा कोण घेणार? (Who After Ravi Shastri?) हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. या पदासाठी टीम इंडियाचा माजी कॅप्टन राहुल द्रविडसह (Rahul Dravid) 5 दिग्गज प्रमुख दावेदार आहेत.
‘द वॉल’ होणार मुख्य मार्गदर्शक!
टीम इंडियाचा महान बॅट्समन असलेला राहुल द्रविड रिटायरमेंटनंतर भारतीय क्रिकेटच्या विकासात सक्रीय आहे. तो अंडर 19 तसंच इंडिया A टीमचा मुख्य प्रशिक्षक होता. द्रविडच्या मार्गदर्शनाखालीच भारतीय टीमनं 2018 साली झालेला अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला होता. भारतीय टीममधील नवी पिढी घडवण्याचं श्रेय द्रविडचं आहे.
बीसीसीआयला देखील टीम इंडियामध्ये बदल हवा आहे. टीम इंडियाचा स्तर उंचावण्यासाठी तसेच त्याला अजिंक्य बनवण्यासाठी बीसीसीआय नव्या कोचच्या शोधात आहे. हा शोध राहुल द्रविडपाशी संपण्याची दाट शक्यता (Who After Ravi Shastri?) आहे. श्रीलंका दौऱ्यात द्रविडची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करत बीसीसीआनं याचे संकेत दिले आहेत.
राहुल द्रविडच्या 48 अद्भुत गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
विराटचा गुरुही स्पर्धेत
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) प्रशिक्षकपदासाठी कुणाला पसंती देतो, हे या निवडप्रक्रियेत सर्वात महत्त्वाचे ठरणार आहे. हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) डायरेक्टर ऑफ क्रिकेट ऑपरेशन्स माईक हेसन (Mike Hesson) हे नाव देखील आघाडीवर आहे.
माईक हेसन हा देखील आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक अनुभवी आणि यशस्वी कोच आहे. तो 2012 ते 2018 या कालावधीमध्ये न्यूझीलंड टीमचा कोच होता. त्याच्या मार्गदर्शनाखालीच न्यूझीलंडनं 2015 साली सर्वप्रथम वर्ल्ड कप फायनलमध्ये प्रवेश केला होता. विराट आणि हेसन आरसीबीमध्ये एकत्र आहेत. त्यामुळे त्याच्या शैलीची विराटला चांगली माहिती आहे. हेसनसाठी विराटनं आग्रह केल्यास तो टाळणे बीसीसीआयला अवघड (Who After Ravi Shastri?) जाणार आहे.
खेळाडू आणि कोच म्हणून ऑस्ट्रेलियातील ‘चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स’
जुन्या दावेदाराची प्रतीक्षा संपणार?
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी ग्रेग चॅपेल काळापासून चर्चेत असलेला टॉम मूडी (Tom Moody) यंदा देखील स्पर्धेत आहे. मूडीला कोच म्हणून 10 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. तो सध्या सन रायझर्स हैदराबादचा (SRH) डायरेक्टर ऑफ ऑपरेशन्स आहे. तसेच श्रीलंका टीमचे प्रशिक्षकपदही त्याने सांभाळले आहे. जगभरातील क्रिकेट टीमला मार्गदर्शन करणाऱ्या मूडीचे नाव यंदाही प्रशिक्षकपदाच्या स्पर्धेत आहे.
श्रीलंकेचा चॅम्पियनही स्पर्धेत
श्रीलंकेचा महान बॅट्समन महेला जयवर्धने (Mahela Jayawardene) कोच म्हणूनही गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्यानं पुढं आला आहे. महेला एक बॅट्समन म्हणून कठीण प्रसांगात हमखास खेळणारा आणि टीमला वाचवणारा शांत खेळाडू म्हणून प्रसिद्ध होता. तो कोच म्हणून देखील त्याच शांतपणे काम करत आहे.
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) या आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीमचा तो कोच आहे. महेलाच्या मार्गदर्शनाखालीच मुंबई इंडियन्सनं सलग दोनदा आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावले आहे. मुंबई इंडियन्सला स्थिर करण्यात आणि आयपीएलमधील सर्वात प्रबळ टीम बनवण्यात त्याचा मोलाचा वाटा आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले भारतीय खेळाडू आज टीम इंडिया गाजवत आहेत. बीसीसीआनं T20 वर्ल्ड कपनंतर रोहित शर्माचा (Rohit Sharma) कॅप्टन म्हणून विराटच्या बरोबरीनं विचार केला तर महेलाच्या नावावर देखील कोच म्हणून शिक्कामोर्तब होऊ शकतो. बीसीसीआयला हवा असलेला बदल देण्याची क्षमता महेलाकडं आहे.
अनपेक्षित नाव मारणार बाजी?
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये चौथे प्रमुख नाव आहे वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) सेहवागनं आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाबचा प्रशिक्षक म्हणून यापूर्वी काम केले आहे. त्यानं यापूर्वी प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता. त्यावेळी सौरव गांगुलीनं सेहवागला पसंती दिली होती. त्या स्पर्धेत शास्त्रीनं बाजी मारली. यंदा राहुल द्रविडनं माघार घेतल्यास गांगुली पुन्हा एकदा सेहवागचं मन प्रशिक्षकपदासाठी (Who After Ravi Shastri?) वळवू शकतो.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.
You must be logged in to post a comment.