फोटो – न्यूझीलंड क्रिकेट (BLACKCAPS)

न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज (New Zealand v West Indies) यांच्यात माऊंट मोंनगुईमध्ये झालेली दुसरी T20 मॅच ग्लेन फिलिप्स (Glenn Phillips) या न्यूझीलंडच्या 23 वर्षाच्या खेळाडूने गाजवली. फिलिप्सने त्या मॅचमध्ये फक्त 46 बॉल्समध्ये सेंच्युरी केली. या सेंच्युरीबरोबच त्याने अनेक रेकॉर्ड्सनाही गवसणी घातलीय.

46 – फिलिप्सने वेस्ट इंडिजविरुद्ध 46 बॉल्समध्ये सेंच्युरी झळकावली. ही न्यूझीलंडकडून आंतररष्ट्रीय T20 मॅचमधील सर्वात जलद सेंच्युरी आहे. कॉलिन मुन्रोचा 47 बॉल्समध्ये सेंच्युरी झळकावण्याचा विक्रम फिलिप्सने मोडला.

184 – ग्लेन फिलिप्स आणि डेवेन कॉन्वे जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी 184 रन्सची पार्टनरशिप केली. ही न्यूझीलंडकडून आतंरराष्ट्रीय T20 मध्ये कोणत्याही विकेटसाठी झालेली सर्वोच्च पार्टरनरशिप आहे. त्यांनी मार्टिन गप्टील आणि केन विल्यमसन यांचा नाबाद 171 रन्सच्या पार्टरनरशिपचा रेकॉर्ड मोडला.

184 – आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये ओपनिंग जोडीच्या शिवाय सर्वात जास्त 184 रन्सच्या पार्टरनरशिपचा रेकॉर्डही फिलिप्स – कॉन्वे जोडीनं केला. त्यांनी डेविड मलान – इऑन मॉर्गन जोडीचा 182 रन्सच्या पार्टरनरशिपचा रेकॉर्ड मोडला.

कोण आहे फिलिप्स?

वेस्ट इंडिजविरुद्ध वेगवेगळ्या विक्रमांना गवसणी घालणारा ग्लेन फिलिप्स चा जन्म दक्षिण आफ्रिकेत झाला. तो पाच वर्षाचा असताना त्याचे कुटुंब न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाले. फिलिप्स 2016 मध्ये न्यूझीलंडच्या अंडर 19 टीमचाही भाग होता.

विकेटकिपर- बॅट्समन असलेल्या फिलिप्सने 2016-17 च्या सुपर स्मॅश स्पर्धेत 369 रन्स केले होते. त्यामध्ये 57 बॉल्समध्ये 116 रन्सच्या झंझावती इनिंगचाही समावेश होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2017 साली झालेल्या T20 सीरिजमध्ये मार्टीन गप्टील जखमी झाल्याने त्याची पहिल्यांदा न्यूझीलंडच्या टीममध्ये निवड करण्यात आली होती.

ग्लेन फिलिप्सने सेंच्युरीनंतर वेस्ट इंडिजविरुद्ध एक अफलातून कॅचही घेतला. त्या कॅचचा व्हिडिओ पाहा.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: