फोटो – ट्विटर

पाकिस्तान क्रिकेटमध्ये T20 वर्ल्ड कपपूर्वी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. T20 वर्ल्ड कपसाठी टीम जाहीर होताच पाकिस्तानचा हेड कोच मिसबाह उल हक (Misbah – ul – Haq) आणि बॉलिंग कोच वकार युनूस (Waqur Younis) यांनी राजीनामा दिला आहे. या दोघांच्याही कराराचे एक वर्ष बाकी होते. तरीही त्यांच्या कार्यकाळातील सर्वात मोठ्या ICC स्पर्धेपूर्वी त्यांनी टीमला वाऱ्यावर सोडलंय. वकारनं आपण मिसबाह सोबत आलो आणि आता त्याच्यासोबत जात असल्याचं जाहीर केलंय. तर मिसबाहनं राजीनामा देताना कौटुंबिक कारण पुढे केलंय. वास्तविक खरं कारण (Why Misbah resigned?) वेगळंच आहे.

नव्या अध्यक्षाचे वारे

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) अध्यक्षपदी आता माजी क्रिकेटपटू रमीझ रझा (Rameez Raja) विराजमान होणार आहे. रझा 13 सप्टेंबर रोजी अध्यक्षपदाची सूत्रं अधिकृतपणे हाती घेईल. पण रझानं त्यापूर्वीच काम सुरु केलंय. तो पीसीबीच्या निवड समितीला यापूर्वीच भेटला आहे. त्यानं या T20 वर्ल्ड कपच्या टीम निवडीबाबतच्या सूचना निवड समितीला केल्या होत्या, अशी माहिती आहे.

रमीझ रझानं अध्यक्ष झाल्यानंतर हेड कोच मिसबाहची हकलपट्टी करण्याचं नक्की केलं होतं. मात्र ही हकालपट्टी T20 वर्ल्ड कपपूर्वी होणार नव्हती, अशी माहिती पाकिस्तानच्या मीडियानं दिली आहे. मिसबाहनं राजीनामा देण्याचं कारण सोमवारी (6 सप्टेंबर) रोजी सकाळी घडलेल्या काही घडामोडी (Why Misbah resigned?) आहेत.

मुख्य लढाईआधीच पाकिस्तानच्या दोन्ही कोचची माघार, T20 वर्ल्ड कपच्या तोंडावर राजीनामा

सोमवारी काय झालं?

यूएई आणि ओमानमध्ये 17 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या T20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानची निवड ही सोमवारी होणार होती. त्याचबरोबर न्यूझीलंड आणि इंग्लंड विरुद्धच्या सीरिजसाठीही टीमची घोषणा त्याच दिवशी होणार होती. मिसबाहनं सोमवारी सकाळी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वासिम खान यांची भेट घेतली. या भेटीनंतर मिसाबहनं तात्काळ राजीनामा घेण्याचा निर्णय घेतला असं मानलं जातंय.

वेस्ट इंडिज दौऱ्याहून परतलेल्या मिसबाहनं काही काळ आराम करावा, न्यूझीलंड दौऱ्यात दुसरा व्यक्ती पाकिस्तानचा कोच असेल, अशी सूचना वासिम खाननं या भेटीत केली होती. त्यामुळे मिसबाह नाराज झाला. त्यानंतर वासिम खाननं T20 वर्ल्ड कपमध्ये ज्या खेळाडूंची निवड झालीय, त्यांची नावं असलेला कागद मिसबाहकडं सोपवला. यामधील एका नावावर मिसबाहचा तीव्र आक्षेप होता. त्याची निवड झाल्यानंच मिसबाहनं तातडीनं राजीमामा देण्याचा निर्णय (Why Misbah resigned?) घेतला.

फिक्सिंगमध्ये बंदी, जेलमध्ये शिक्षा भोगलेला पाकिस्तानी क्रिकेटपटू अंपायर होणार!

कुणावर होता मिसबाहचा आक्षेप?

पाकिस्तानच्या निवड समितीनं T20 वर्ल्ड कपसाठी अतिरिक्त विकेट किपर म्हणून सर्फराज अहमदच्या ऐवजी आझम खानची (Azam Khan) निवड केली. त्याला मिसबाहचा आक्षेप होता. आझम खान हा पाकिस्तानचा माजी विकेट किपर मोईन खानचा (Moin Khan) मुलगा आहे. फक्त 1 फर्स्ट क्लास मॅचचा अनुभव असलेल्या आझमची इंग्लंड दौऱ्यात झालेली निवड देखील वादग्रस्त ठरली होती. त्या दौऱ्यात त्यानं 3 मॅचमध्ये फक्त 6 रन केले होते.

मिसबाहनं आझमच्या नावावर आक्षेप घेतला. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड त्याच्या निवडीवर ठाम होते. त्यामुळेच त्यानं तात्काळ राजीनाम्याचा निर्णय (Why Misbah resigned?) घेतला. त्यानं या निर्णयाची माहिती वकार युनूसला कळवली. त्यावेळी वकारनंही मिसबाहसोबत पद सोडण्याची घोषणा केली.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: