फोटो – ट्विटर

भारताच्या इंग्लंड दौऱ्यासाठी (India Tour Of England) 20 सदस्यीय टीमची घोषणा करण्यात आली. या टीममध्ये सध्या फॉर्मात असलेल्या पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याची निवड न झाल्याबद्दल अनेकांना धक्का बसला. पृथ्वीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर टीम इंडियातून वगळण्यात आले होते. त्यानंतर भारतामध्ये झालेल्या 16 मॅचमध्ये त्यानं 1135 रन केले आहेत. इतके रन्स करुनही त्याला का वगळले? (Why Prithvi Shaw not selected?) हा प्रश्न क्रिकेट फॅन्सच्या मनात निर्माण झाला आहे.

पृथ्वीसाठी जबरदस्त वर्ष

पृथ्वी शॉ साठी 2021 हे वर्ष जबरदस्त ठरले आहे. त्यानं विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy 2021) आणि आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) रन्सच्या राशी उभ्या केल्या. पृथ्वीनं विजय हजारे स्पर्धेतील 8 मॅचमध्ये 827 रन केले. हा विजय हजारे स्पर्धेतील एक रेकॉर्ड आहे. या स्पर्धेत त्याची सरासरी ही 165.40  तर स्ट्राईक रेट 138.29 होता.

त्यानंतर शॉ ने आयपीएलमधील 8 मॅचमध्ये 308 रन काढले. यामध्ये प्रसिद्ध कृष्णाच्या (Prasidh Krishna) एकाच ओव्हरमध्ये लगावलेल्या 6 फोरचा समावेश आहे. पृथ्वीनं गेल्या अडीच महिन्यातील 16 मॅचमध्ये 1135 रन काढले आहेत.

स्टँडबायमध्ये देखील जागा नाही

जवळपास चार महिन्यांच्या इंग्लंड दौऱ्यात निवड समितीनं स्टँडबाय खेळाडूंसह 24 जणांची निवड केली आहे. यामध्ये रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल आणि अभिमन्यू इश्वरन हे चार ओपनर आहेत.

पृथ्वी शॉ याला स्टँडबाय म्हणून देखील का निवडलं नाही? (Why Prithvi Shaw not selected?)  त्याचा मागच्या वर्षी एक-दोन टेस्टमधील खराब खेळ गेल्या अडीच महिन्यातील जबरदस्त कामगिरीवर भारी पडला का? हा प्रश्न अनेकांना सतावत आहे.

5 दिवसांमध्ये बदललं पृथ्वी शॉ चं आयुष्य, तुम्हीही वाचा एका बदलाची गोष्ट!

भावी सचिन टीमच्या बाहेर का?

पृथ्वी शॉ मुंबईचा असल्यानं त्याची अगदी सुरुवातीपासून सचिन तेंडुलकरशी (Sachin Tendulkar) तुलना करण्यात आली आहे. त्यानं वेस्ट इंडिज विरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये सेंच्युरीसह पदार्पण केलं आणि अनेकांना त्याच्यामध्ये ‘भावी सचिन’ दिसू लागला. त्याच्यात गुणवत्तेची कमी नाही, हे तर टीकाकार देखील मान्य करतात. तरीही पृथ्वी शॉ टीमच्या बाहेर का आहे? त्याची इतक्या मोठ्या इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या जम्बो टीममध्ये निवड का झाली नाही? या सर्वांची उत्तर ‘टाईम्स ऑफ इंडिया’ मध्ये आलेल्या एका बातमीत दडली आहेत.

या बातमीनुसार पृथ्वी शॉ ला भारतीय टीमकडून खेळायचं असेल तर वजन कमी करावं लागेल, अशी स्पष्ट सूचना बीसीसीआयनं त्याला दिली आहे.

ऋषभ पंतचं दिलं उदाहरण

बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पृथ्वी शॉ सध्या 21 वर्षांचा आहे. तरीही तो मैदानात खूप संथ आहे. त्यानं काही किलो वजन कमी करण्याची गरज आहे. ऑस्ट्रेलियात फिल्डिंगच्या वेळी देखील त्याच्यामध्ये एकाग्रता कमी असल्याचं आढळलं होतं. त्यानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून परतल्यानंतर कठोर मेहनत घेतली आहे. त्याच्यासमोर ऋषभ पंतचं (Rishabh Pant) उदाहरण आहे. पंत काही महिन्यांमध्ये या सर्व गोष्टींमध्ये बदल करु शकतो तर शॉ देखील करु शकतो,’ असं बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे.

‘पृथ्वी शॉ ने माझं ऐकलं नाही,’ रिकी पॉन्टिंगचा दावा

‘पृथ्वी शॉ याला आणखी काही सीरिजमध्ये हा फॉर्म कायम ठेवावा लागणार आहे. त्याची आजवर एका चांगल्या सीरिजच्या आधारे टीम इंडियात निवड झाली त्यानंतर त्याला रन करण्यासाठी संघर्ष (Why Prithvi Shaw not selected?)  करावा लागला. तो चांगला खेळाडू आहे, त्याच्याकडं फार काळ दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही.’ असं बीसीसीआयनं सांगितलं.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: