फोटो – ट्विटर

टीम इंडियानं 2011 साली वर्ल्ड कप जिंकून आता 10 वर्ष झाली आहेत. या वर्ल्ड कप विजेतेपदाच्या आठवणी सध्या सांगितल्या जात आहे. त्या टीममधील सर्व 15 खेळाडूंसाठी वर्ल्ड कप विजेतेपद हा आयुष्यभराची आठवण आहे. त्या टीममध्ये टीम इंडियाचा सध्याचा व्हाईस कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) याची निवड झालेली नव्हती. रोहितला टीममध्ये न घेतल्यानं तेंव्हा वाद देखील झाला होता. 2011 ची वर्ल्ड कप टीम निवडणाऱ्या सदस्यानं रोहितची टीममध्ये का निवड झाली नाही? याचं कारण (Why Rohit not selected) सांगितलं आहे.

निवड समितीची इच्छा होती पण…

वर्ल्ड कप विजेत्या निवड समितीचे सदस्य राजा व्यंकट (Raja Venkat) यांनी ‘मिड डे’ या इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना रोहित शर्माला टीममध्ये घेण्याची निवड समितीच्या सदस्यांची इच्छा होती, अशी माहिती दिली आहे.

‘आम्हाला घरच्या परिस्थितीचा (home advantage) होता, पण त्याच बरोबर घरच्या प्रेक्षकांच्या अपेक्षांचं ओझंही होतं. आमच्याकडे चांगली ऑलराऊंड टीम होती. आमची बॉलिंग घरच्या परिस्थितीला अनुकूल अशी होती,’ अशी माहिती व्यकंट यांनी दिली.

‘2011 च्या वर्ल्ड कपसाठी टीम निवडणे आम्हाला फार अवघड गेलं नाही, कारण आम्ही त्याची योजना आधीपासूनच केली होती. आम्ही तयार केलेली टीम जवळपास सारखी होती. 14 सदस्यांची निवड सहज झाली. फक्त 15 व्या जागेसाठी रोहित शर्माची निवड करण्याची आमची इच्छा होती, पण अखेरीस पियुष चावला (Piyush Chawala) याची निवड झाली,’ असे व्यंकट यांनी सांगितले.

रोहित हा आत्ता आहे तसा तेंव्हाही क्लास प्लेयर होता. त्याच्यामध्ये प्रचंड गुणवत्ता होती. तो योग्य खेळाडू असल्याचं निवड समितीच्या सदस्यांचं मत होतं, पण टीम मॅनेजमेंटला पियूष हवा होता. आम्ही त्यांचा निर्णय मान्य केला (Why Rohit not selected) असं व्यंकट यांनी सांगितले.

( वाचा : Cricket World Cup 2011 : वर्ल्ड चॅम्पियन सध्या काय करतात? )

पियूष चावला का हवा होता?

निवड समितीचे अन्य सदस्य सुरेंद्र भावे (Surendra Bhave) यांनी पियूष चावलाच्या निवडीचं कारण स्पष्ट केलं आहे. आम्हाला एका लेग स्पिनरची गरज होती. पियूष ती गरज पूर्ण करत होता. त्याच्याकडे गुगली हे चांगलं अस्त्र होतं. तसेच तो उपयुक्त बॅट्समनही होता, असे भावे यांनी सांगितले.

रोहितचा तेंव्हा खेळ कसा होता?

रोहित शर्मानं टीम इंडियाचा सध्याचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) याच्या आधी भारतीय टीममध्ये पदार्पण केलं. रोहित शर्मा सुरुवातीच्या काळात लोअर ऑर्डरमध्ये बॅटींग करत होता. तसंच त्याच्या खेळात सातत्य नव्हते. तर विराट कोहली हा टॉप 5 मध्ये चांगली कामगिरी करत होता. या कारणामुळे देखील रोहित शर्माचं नाव वर्ल्ड कप टीम निवडताना मागं पडलं (Why Rohit not selected) असावं.

रोहितला 2013 साली मर्यादीत ओव्हर्सचा ओपनर म्हणून पहिल्यांदा पाठवण्यात आले. तेंव्हापासून त्याच्या खेळात सातत्य आले आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: