फोटो – ट्विटर

अंडर 19 वर्ल्ड कप विजेत्या टीमचा कॅप्टन. भारताचा भावी विराट कोहली. रणजी ट्रॉफीतील चौथ्या मॅचमध्येच 151 रन. भारत A टीमचा कॅप्टन. 28 वर्षांच्या उन्मुक्त चंदनं (Unmukt Chand) आयुष्यात हे जसे वैभवशाली दिवस बघितले. तितकाच मोठा उतारही पाहिला. दिल्लीच्या टीमकडून दुर्लक्ष. आयपीएलचा सिझन बेंचवर, उत्तराखंडकडून अपयश. पुन्हा दिल्ली आणि तिथंही फक्त प्रतीक्षा या सर्वांनंतर त्यानं भारतीय क्रिकेट सोडणार असल्याचं जाहीर केल्यानंतर खळबळ उडाली. उन्मुक्तनं भारतीय क्रिकेट सोडल्यानंतर पहिल्यांदाच त्या दिवसांबाबत गौप्यस्फोट (Why Unmukt Chand Left Indian Cricket) केला आहे.  

4 महिन्यांपूर्वी विचारही नव्हता

उन्मुक्त चंद भारतीय क्रिकेट सोडणार अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून होती. ‘Cricket मराठी’ नंही याबाबतची बातमी प्रसिद्ध केली होती. आपण चार महिन्यांपूर्वी याबाबत विचारही केला नव्हता. दिल्ली क्रिकेटमधील घाणेरड्या राजकारणामुळे हा निर्णय घेण्यास आपल्याला भाग पडले, असे त्यानं ‘स्पोर्ट्स क्रीडा’ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे.

चांगल्या कामगिरीनंतरही आपण टीमच्या बाहेर होतो आणि दुसऱ्यांना संधी मिळते, हे पाहून त्रास होत होता, असे तो म्हणाला. उन्मुक्त 2017-18 च्या सिझनमध्ये दिल्लीकडून खेळला होता. त्यानंतर तो पुढील सिझन उत्तराखंडकडून खेळला. पण, 2020-21 च्या सिझनमध्ये पुन्हा दिल्लीत परतला. यावर्षी झालेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत त्याला एकही मॅच खेळण्याची संधी (Why Unmukt Chand Left Indian Cricket) मिळाली नाही.

मानसिक त्रास सहन केला

‘माझ्यासाठी मागील काही वर्ष खूप अवघड होते. मागच्या सिझनमध्ये मला दिल्लीकडून एकही मॅच खेळायला मिळाली नाही. मला पुन्हा कधी संधी मिळेल हे माहिती मिळत नाही. भारतामधील देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक प्रश्न आहेत. मला आता पुन्हा त्यामध्ये जायचं नाही. मी बाहेर होतो आणि ज्यांना मी क्लबच्या टीममध्ये घेणार नाही, ते खेळत होते. हे पाहणे माझ्यासाठी त्रासदायक होते. या गोष्टी मानसिक छळापेक्षा कमी नव्हत्या.’ असे उनमुक्तनं सांगितले.

America Calling: वर्ल्ड कप विजेत्या टीमचा कॅप्टन भारतीय क्रिकेट सोडणार!

प्रत्येकाला संधी, उन्मुक्तला नाही

उन्मुक्त चंद 2015 साली ऑस्ट्रेलिया A आणि दक्षिण आफ्रिका A विरुद्ध झालेल्या तिरंगी मालिकेत इंडिया A टीमचा कॅप्टन होता. त्याच्या कॅप्टनसीमध्ये भारतीय टीमनं ती स्पर्धा जिंकली. उन्मुक्तनं त्या सीरिजमध्ये 47 च्या सरासरीनं 235 रन काढले होते.

त्या सीरिजमध्ये उन्मुक्तच्या कॅप्टनसीखाली ऑस्ट्रेलिया A विरुद्ध फायनल खेळलेल्या प्रत्येकाला (मयंक अग्रवाल, मनिष पांडे, करुण नायर, केदार जाधव, गुरकिरत मान, संजू सॅमसन, अक्षर पटेल, संदीप शर्मा, धवल कुलकर्णी आणि करण शर्मा) टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली. फक्त उन्मुक्तला कधीही टीम इंडियाकडून खेळता आलं नाही.

2017 साली तो इंडिया A टीमचा कॅप्टन होता. उत्तर भारत T20 टीमचा सदस्य होता. तरी त्यावर्षीच्या विजय हजारे स्पर्धेत दिल्लीनं त्याला वगळले. तसंच त्याला एकाही आयपीएल टीमनं खरेदी केलं नाही. त्यानंतर तो आयपीएलमधून बाहेर फेकला गेला. 2017 मधील या घटनेचा आपल्या करिअरवर खूप मोठा प्रभाव पडल्याचं उन्मुक्तनं या मुलाखतीमध्ये (Why Unmukt Chand Left Indian Cricket) मान्य केलं आहे.

इथं राहण्यात अर्थ नव्हता

माझ्या बाबतीमध्ये जे घडत होतं त्यामध्ये पारदर्शकता संपली होती. त्यामुळे काही अर्थ उरला नव्हता. मला त्याच गोष्टींचा विचार करुन वेळ वाया घालवायचा नव्हता. माझ्याकडं मर्यादित वेळ आहे. त्यामध्ये मला चांगले क्रिकेट खेळायचं आहे. या अनिश्चित परिस्थितीमध्ये राहणे खूप वाईट गोष्ट आहे.’ असे उन्मुक्तने (Why Unmukt Chand Left Indian Cricket) सांगितले.

टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूचा BCCI ला रामराम, ‘अमेरिकन ड्रीम’ चा करणार पाठलाग

पुढे काय करणार?

उन्मुक्त चंदला अमेरिकेच्या राष्ट्रीय टीमकडून खेळण्यासाठी 3 वर्ष वाट पाहावी लागणार आहे. त्या काळात तो अमेरिकेतील क्लब क्रिकेट खेळेल. त्याला आता सिलिकॉन व्हॅली स्ट्राईकर्स (Silicon Valley Strikers) टीमनं करारबद्ध केलं आहे.

आयसीसीच्या नियमानुसार त्याला आता या तीन वर्षातील दरवर्षी 10 महिने अमेरिकेत घालवणे आवश्यक आहे. त्यानंतर उरलेल्या दोन महिन्यात तो जगभरातील लीग क्रिकेट खेळू शकेल.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: