फोटो – ट्विटर

वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया (West Indies vs Australia) यांच्यात सुरु असलेली पाच मॅचची T20 सीरिज वेस्ट इंडिजनं तिसऱ्या मॅचमध्येच जिंकली आहे. मंगळवारी (12 जुलै) रोजी झालेल्या तिसऱ्या T20 मध्ये वेस्ट इंडिजनं ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्स आणि 31 बॉल राखून पराभव केला. गेल्या काही मॅचमध्ये फॉर्मात नसलेल्या ख्रिस गेलची (Chris Gayle) आक्रमक हाफ सेंच्युरी आणि दोन मोठे रेकॉर्ड (Gayle 2 Big Record) हे या मॅचचे वैशिष्ट्य ठरले.

गेलला गवसला फॉर्म

T20 क्रिकेटचा युनिव्हर्स बॉस (Universe Boss) असलेल्या गेलनं वेस्ट इंडिजच्या टीममध्ये या वर्षी पुनरागमन केले. त्यानंतर 9 मॅचमध्ये गेलला फक्त 102 रन करता आले होते. त्यातही मागील पाच T20 मॅचमध्ये त्याने 13,4,11, 5 आणि 8 रन काढले होते. गेलनं वेस्ट इंडिजकडून यापूर्वी T20 क्रिकेटमध्ये 2016 साली 50 पेक्षा जास्त रन केले होते. आगामी दोन T20 वर्ल्ड कप खेळणार असल्याचे त्याने यापूर्वीच जाहीर केले आहे. मात्र त्याच्या या फॉर्ममुळे टीममधील जागेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.

41 वर्षांचा ख्रिस गेल म्हणतो,’आणखी पाच वर्ष क्रिकेट खेळणार’ ‘युनिव्हर्सल बॉस’ ची आकडेवारी पाहून तुम्ही व्हाल थक्क!

वेस्ट इंडिजचा कॅप्टन कायरन पोलार्डचा गेलला पाठिंबा आहे. कॅप्टनचा विश्वास गेलनं तिसऱ्या T20 मध्ये सार्थ ठरवला. त्याने फक्त 38 बॉलमध्ये 67 रन केले. गेलनं या खेळीच्या दरम्यान 7 सिक्स आणि 4 फोर लगावले. सुरुवातीला संथ खेळणाऱ्या गेलनं सेट झाल्यानंतर त्याचे नेहमीचे वादळी रुप (Gayle Storm) धारण केले. गेलनं 7 पैकी 5 सिक्स हे 7 बॉलमध्येच लगावले. तो 12 व्या ओव्हर्सच्या शेवटच्या बॉलवर आऊट झाला. त्यावेळी वेस्ट इंडिजचा विजय ही औपचारिकता उरली होती. गेलच्या या हाफ सेंच्युरीमुळे वेस्ट इंडिजनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1995 नंतर पहिल्यांदाच एखादी द्विपक्षीय सीरिज (Bilateral Series) जिंकली आहे.

पाकिस्तानच्या बॅट्समनचा रेकॉर्ड मोडला

ख्रिस गेल हा आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये हाफ सेंच्युरी करणारा सर्वात वयोवृद्ध क्रिकेटपटू (Gayle 2 Big Record) बनला आहे. गेलनं 41 वर्ष 294 दिवस वय असताना ही हाफ सेंच्युरी झळकावली आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड पाकिस्तानचा बॅट्समन मोहम्मद हाफिजच्या (Mohammad Hafeez) नावावर होता. त्याने वयाच्या 40 व्या वर्षी न्यूझीलंड विरुद्ध हाफ सेंच्युरी झळकावली आहे. श्रीलंकेचा माजी कॅप्टन सनथ जयसूर्या (Sanath Jayasuriya) या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

14,000 रन पूर्ण

ख्रिस गेलनं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या मॅचमध्ये T20 क्रिकेटमध्ये 14 हजार रनचा टप्पा देखील पूर्ण (Gayle 2 Big Record) केला आहे. हा टप्पा पार करणारा तो एकमेव बॅट्समन आहे. अ‍ॅस्टन अगरच्या बॉलवर सिक्स लगावत त्याने  14 हजार रनचा टप्पा झोकात पार केला. T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करण्याच्या यादीत गेलकडं मोठी आघाडी आहे. या यादीमधील दुसऱ्या क्रमांकाचा बॅट्समन आणि वेस्ट इंडिजचा कॅप्टन कायरन पोलार्डच्या नावावर 10,836 रन आहेत. पाकिस्तानचा शोएब मलिक (10,741) आणि ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर (10, 017) या आणखी दोन बॅट्समननं T20 क्रिकेटमध्ये 10 हजारचा टप्पा ओलांडला आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: