
आक्रमक बॅटींगसाठी संपूर्ण क्रिकेट विश्वात प्रसिद्ध असलेल्या वेस्ट इंडिजच्या कायरन पोलार्डनं (Kieron Pollard) नवा रेकॉर्ड केला आहे. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पहिल्या T20 मॅचमध्ये (West Indies vs Sri Lanka) पोलार्डनं अकिला धनजंय (Akila Dananjaya) एका ओव्हरमध्ये सलग सहा सिक्स लगावले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही ऐतिहासिक कामगिरी करणारा तो तिसराच बॅट्समन आहे. हर्षल गिब्ज (Herschelle Gibbs) आणि युवराज सिंह (Yuvraj Singh) यांच्यानंतर तब्बल 14 वर्षानंतर कुणीतरी ही कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे वर्ल्ड कप स्पर्धेच्या बाहेर या प्रकारची कामगिरी करणारा पोलार्ड (Pollard Record) हा पहिलाच बॅट्समन आहे.
पोलार्डची ‘मन की बात’
कायरन पोलार्डनं मॅच संपल्यानंतर धनंजयची ओव्हर खेळताना काय मनस्थिती होती, याचं सविस्तर वर्णन केलं आहे. ‘तिसऱ्या बॉलनंतर मी हे करु शकतो असं मला वाटलं. मला पिचचा अंदाज आला होता. त्यामुळे सकारात्मक राहून बाऊंड्री लाईन पार जाणारे शॉट्स मारणे आवश्यक होतं. मी टीमसाठी ते काम करु शकलो याचा मला आनंद आहे,’’ असं त्यानं सांगितलं.
‘पाचवा सिक्स मारल्यानंततर बॉलर बॅकफुटला गेला आहे हे मला माहिती होतं. माझ्या डोक्यात अनेक गोष्टी सुरु होत्या. सहाव्या बॉलवर चान्स घ्यावा की ओव्हरमध्ये 30 रन काढून थांबावे याबाबत माझ्या डोक्यात विचार सुरु होता. तो (धनंजय) ‘अराऊंड द विकेट’ आला आणि त्यानं माझ्या पॅडवर बॉल टाकला. त्यावेळी मी स्वत:ला बजावलं,’थांब पॉली, आता चान्स घे,’ असं पोलार्डनं सांगितलं.
पोलार्ड पुढे म्हणाला की, ‘मी आजवर याच पद्धतीनं खेळत आलो आहे. विशेषत: स्पिनविरुद्ध माझा हाच खेळ आहे. आज माझा दिवस होता. हे त्याच्यासाठी दुर्दैवी होते. पण, त्यामुळे आमच्या टीमला विजय मिळवता आला.’
शिखर ते पाया प्रवास
श्रीलंकेच्या अकिला धनंजयनं एकाच मॅचमध्ये शिखर ते पाया असा प्रवास केला. धनंजयनं वेस्ट इंडिज इनिंगच्या चौथ्या आणि त्याच्या पहिल्या ओव्हरमध्ये हॅट्ट्रिक (Hattrick) घेतली होती. धनंजयनं लुईस, गेल आणि पूरन हे तीन वेस्ट इंडिजचे धोकादायक बॅट्समन सलग तीन बॉलवर आऊट केले होते.
पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 रन देऊन 3 विकेट घेणाऱ्या धनंजयच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये पोलार्डनं सलग सहा सिक्स लगावत (Pollard Record) 36 रन निघाले. धनंजयनं ज्या मॅचमध्ये हॅट्ट्रिक घेतली त्याच मॅचमध्ये त्याच्या नाववर एक नकोसा रेकॉर्ड नोंद झाला.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.