फोटो – ट्विटर, जेमिमा रॉड्रिग्स

महिला क्रिकेट वर्ल्ड कपला (Women’s World Cup 2022) 4 मार्चपासून न्यूझीलंडमध्ये सुरूवात होत आहे. या वर्ल्ड कपसाठी सर्व टीमची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. 4 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान 8 प्रमुख देशांच्या क्रिकेटपटू या स्पर्धेत खेळणार आहेत. या स्पर्धेच्या कालावधीमध्ये सर्व क्रिकेटपटूंना प्रतिस्पर्धी टीमपेक्षा चांगलं खेळण्याचं आव्हान तर आहेच. त्याचबरोबर मासिक पाळीच्या दिवसांमधील त्रासाचाही खेळावर कोणताही परिणाम होऊ न देण्याची खबरदारी (Women Cricketers Periods Issue) घ्यावी लागणार आहे.

जेमिमानं सांगितला ‘तो’ अनुभव

भारताची प्रमुख क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्सची (Jemimah Rodrigues) वर्ल्ड कप स्पर्धेसाठी धक्कादायक पद्धतीनं निवड झाली नाही. जेमिमा वर्ल्ड कप टीममध्ये नसली तरी गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलीय. तसंच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातील लीग क्रिकेटही तिने गाजवलं आहे.

जेमिमानं यूट्यबर रणवीर सिंह (Ranveer Singh) याला दिलेल्या मुलाखतीमध्ये महिला क्रिकेटपटूंना मासिक पाळीच्या दरम्यान खेळताना काय त्रास होतो? याचा अनुभव सांगितला आहे. रणवीरच्या बीयर बाइसेप्स (Beer Biceps) या YouTube चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये जेमिमानं पुरूष क्रिकेटर्सना कधीही सहन न कराव्या लागणाऱ्या त्रासाचे अनुभवकथन केले आहे.

जेमिमानं सांगितलं की, ‘अनेक क्रिकेटपटूंना मासिक पाळीच्यावेळी खूप त्रास होतो. तिच्या काही सहकाऱ्यांना तर चालणेही अशक्य होते. तरीही त्यांना पेन किलर घेऊन मैदानामध्ये उतरावे लागते, कारण त्यांच्यासमोर माघार घेणे हा पर्याय नसतो. त्याचबरोबर ‘ते डाग’ कपड्यावर पडतील का?  ही भीती देखील खेळाडूंना सतावत असते. त्यामुळे त्यांना सतत वॉशरूमला जावं लागतं.’ अशी अडचण (Women Cricketers Periods Issue) जेमिमानं सांगितली.

वर्ल्ड कपसाठी निवड न झाल्याचा अनुभव

जेमिमानं या मुलाखतीमध्ये वर्ल्ड कप टीममध्ये निवड न झाल्यानं काय वाटलं ती भावनाही बोलून दाखवली. ‘तो अतिशय अवघड काळ होता. मी अगदी कोसळून गेले होते. पण, त्यानंतर मी स्वत:ला सावरलं. मी माझी निराशा किंवा राग दाबला नाही.

World Cup 2022: टीम निवड ठरली वादग्रस्त, फॉर्मातील खेळाडूला जागा नाही

मी त्याबाबत आई-वडिलांशी बोलले. माझी मानसिक अवस्था चांगली नाही. मला ब्रेकची गरज आहे, असे मी वडिलांना सांगितले. माझं हे बोलणं ऐकून आई-वडील रडत होते. त्यानंतर मी स्वत:ला आनंदी ठेवण्यासाठी हॉकी खेळण्यास सुरूवात केली. आता मी आणखी चांगली क्रिकेटपटू होण्यासाठी काय करता येईल? याचा विचार करत आहे, असे जेमिमानं (Women Cricketers Periods Issue) स्पष्ट केले.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: