फोटो – सोशल मीडिया

भारतीय महिला क्रिकेट टीममध्ये (Team India Women) अनेक गुणवान क्रिकेटर्सचा समावेश आहे. या खेळाडूंमध्ये जगातील सर्व मैदानात आणि सर्व प्रतिस्पर्धी टीमविरुद्ध सरस खेळ करण्याची क्षमता आहे. वन-डे आणि T20 या दोन्ही वर्ल्ड कप स्पर्धेचं उपविजेतपद सध्या टीम इंडियाकडं आहे. पुढील वर्षी न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या वन-डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी (Women’s Cricket World Cup 2022) टीम इंडिया विजेतेपदाची प्रबळ दावेदार आहे. स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) या टीम इंडियातील अव्वल क्रिकेटपटूंनी ऑस्ट्रेलियातील T20 मॅचमध्ये दमदार खेळ (Smriti – Harmanpreet Show) केला.

स्मृतीची विक्रमी सेंच्युरी

ऑस्ट्रेलियात सध्या महिलांची बिग बॅश लीग स्पर्धा (Women’s Big Bash League) स्पर्धा सुरू आहे. विदेशातील क्रिकेट लीगमध्ये भारतीय पुरुष क्रिकेटर्सना खेळण्याची परवानगी नसली तरी महिला क्रिकेटपटूंना आहे. यावर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या 100 बॉल क्रिकेट मॅचच्या स्पर्धेत (The Hundred) देखील भारतीय महिला क्रिकेटपटू सहभागी झाल्या होत्या. त्यांनी ती स्पर्धा गाजवली. महिला बिग बॅश लीगमध्येही तेच चित्र आहे.

स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौरनं (Smriti – Harmanpreet Show) तर एकाच मॅचमध्ये कमाल केली. स्मृती या स्पर्धेत सिडनी थंडर्स (Sydney Thunder) या टीमची सदस्य आहे. तर हरमनप्रीत मेलबर्न रेनग्रेड्स (Melbourne Renegades) या टीमचं प्रतिनिधित्व करत आहे. रेनग्रेड्स विरुद्धच्या मॅचमध्ये थंडर्ससमोर 20 ओव्हर्समध्ये 176 रन करण्याचं आव्हान होतं.

172 रनचा पाठलाग करताना थंडर्सची सुरूवात चांगली झाली नाही. त्यांची 7 व्या ओव्हरमध्ये 2 आऊट 46 अशी स्थिती होती. दोन अव्वल सहकारी परतल्याचा कोणताही परिणाम स्मृतीच्या खेळीवर झाला नाही. स्मृतीनं तिचा आक्रमक खेळ कायम ठेवला. तिनं 31 बॉलमध्ये 8 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीनं हाफ सेंच्युरी पूर्ण केली.

भारतीय महिला क्रिकेट पाहताना ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा!

हाफ सेंच्युरीनंतरही स्मृतीचा ओघ सुरू होता. तिनं पुढचे 50 रन करण्यासाठी 26 बॉल घेतले. 57 बॉलमध्ये 13 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीनं तिनं सेंच्युरी पूर्ण केली. बिग बॅश लीगमध्ये सेंच्युरी झळकावणारी स्मृती ही पहिली भारतीय (Smriti – Harmanpreet Show) बनली आहे. स्मृतीनं 64 बॉलमध्ये नाबाद 114 रन काढले. या खेळीबरोबरच स्मृती महिलांच्या T20 लीगमध्ये सर्वोच्च वैयक्तिक स्कोअर करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत संयुक्तपणे टॉपवर पोहचली आहे. एश्ले गार्डनरनं 2017 सिडनी थंडर्सकडूनच खेळताना 114 रन काढले होते, स्मृतीनं तिची बरोबरी केली आहे.

हरमनप्रीतनं मारली बाजी

स्मृतीच्या या वादळी खेळीनंतरही थंडर्सला मॅच जिंकता आली नाही नाही. शेवटच्या ओव्हर्समध्ये थंडर्सला विजयासाठी 13 रनची गरज होती. रेनग्रेडसकडून हरमनप्रीतनं ती ओव्हर टाकली. थंडर्सची स्मृती आणि विल्सन ही जमलेली जोडी मैदानात असल्यानं ते मॅच जिंकतील असंच वाटत होतं. पण हरमनप्रीतनं (Smriti – Harmanpreet Show) कमाल केली.

17 व्या वर्षीच महिला क्रिकेटमधील सुपरस्टार बनलेली शफाली वर्मा कोण आहे?

हरमननं शेवटच्या ओव्हरमध्ये 1, 1, 1, 2, 2, 1 असे फक्त 8 रन दिले. तिनं अचूक बॉलिंग करत दोघींनाही सिक्स किंवा फोर मारू दिला नाही. त्यामुळे रेनग्रेड्सनं या मॅचमध्ये 4 रननं निसटता विजय मिळवला. हरमननं 4 ओव्हर्समध्ये 27 रन देत थंडर्सच्या 2 पैकी 1 विकेट घेतली.

यापूर्वी हरमननं बॅटींगमध्येही कमाल केली. 2 आऊट 9 अशी नाजूक परिस्थिती असताना बॅटींगला आलेल्या हरमननं 55 बॉलमध्ये नाबाद 81 रन काढले. यामध्ये तिनं 11 फोर आणि 2 सिक्स लगावले. हरमनच्या खेळामुळे रेनग्रेड्सनं निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 4 आऊट 175 रन काढले. स्मृतीच्या वादळी खेळीमुळे हा स्कोअर धोक्यात आला होता, पण हरमननं शेवटच्या ओव्हरमध्ये अचूक बॉलिंग करत त्याचं संरक्षण (Smriti – Harmanpreet Show) केलं.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: