फोटो – ट्विटर, आयसीसी

महिला क्रिकेट वर्ल्ड कप (Women’s Cricket World Cup 2022) वॉर्म-अप मॅच सुरू झाल्या आहेत. टीम इंडियानं रविवारी (27 फेब्रुवारी 2022) झालेल्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 2 रननं पराभव केला. शेवटपर्यंत रंगतदार झालेल्या या मॅचचा स्कोअर समजण्यासाठी क्रिकेट फॅन्सना खासगी सोशल मीडिया हँडरलवर अवलंबून राहावे लागले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सोशल मीडिया अकाऊंटरवर (BCCI Women) एकही अपडेट या काळात पोस्ट झाले नाही.

क्रिकेटपटूवर वेळ

बीसीसीआयचे सोशल मीडिया अकाऊंटवर एकही पोस्ट नसल्यानं नेमका काय स्कोअर आहे? मॅचचा निकाल काय लागला?  या साध्या प्रश्नांचे उत्तरही मिळत नव्हते. त्यातच काही सोशल मीडिया अकाऊंटवर भारताने 4 विकेट्सनं मॅच गमावल्याचं जाहीर करण्यात आले.

प्रत्यक्षात निकाल वेगळा होता. राजेश्वरी गायकवाडनं (Rajeshwari Gaikwad) शेवटच्या ओव्हर्समध्ये 9 रनचं यशस्वी संरक्षण केले. त्यामुळे टीम इंडियानं (Team India Women) ही मॅच 2 रननं जिंकली. क्रिकेट फॅन्सचा गोंधळ दूर करण्यासाठी दक्षिण आफ्रिका विरूद्धच्या वॉर्म-अप मॅचमध्ये (India Women vs South Africa Women) खेळलेली बॅटर यास्तिका भाटियाला (Yastika Bhatia) ट्विट करावे लागले.

फॅन्सचा संताप

बीसीसीआयच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या निष्काळजी कारभारावर (BCCI Women) क्रिकेट फॅन्स चांगलेच नाराज झाले होते. त्यांनी वेगवेगळे ट्विट्स करत त्यांची नाराजी व्यक्त केली.

हरमनची सेंच्युरी

टीम इंडियाची पहिली वॉर्म अप मॅच व्हाईस कॅप्टन हरमनप्रीत कौरनं (Harmanpreet Kaur) गाजवली. न्यूझीलंड विरूद्धच्या सीरिजमध्ये फारशी कमाल करू न शकलेल्या हरमननं या मॅचमध्ये सेंच्युरी झळकावत फॉर्मात येत असल्याचे संकेत दिले. हरमननं 114 बॉलमध्ये 9 फोरच्या मदतीनं 103 रन केले. तिने यास्तिकी भाटियासोबत 84 रनची पार्टनरशिप केली. यास्तिकानं 78 बॉलमध्ये 58 रन केले.

हरमन आणि यास्तिकाचा अपवाद वगळता अन्य बॅटरनी निराशा केली. स्मृती मंधाना 12 रन काढून डोक्याला बाऊन्सर लागल्यानं रिटायर हर्ट झाली. दीप्ती शर्मा 5 तर कॅप्टन मिताली राज शून्यावर आऊट झाली. आक्रमक विकेट किपर रिचा घोषलाही फार कमाल करता आली नाही. ती 11 रन काढून आऊट झाली. पहिल्यांदा बॅटींग करत टीम इंडियानं निर्धारित 50 ओव्हर्समध्ये 9 आऊट 244 रन केले.

मुलीला क्रिकेटपटू करण्यासाठी वडिलांनी शेत विकलं, संकटमोचक जिंकून देणार वर्ल्ड कप!

राजेश्वरीच्या 4 विकेट्स

भारतीय बॉलर्सनी अचूक मारा करत दक्षिण आफ्रिकेला 7 आऊट 242 रनवर रोखले. आफ्रिकेकडून कॅप्टन सून लूसनं सर्वात जास्त 86 रन केले. टीम इंडियाकडून राजेश्वरी गायकवाड सर्वात यशस्वी बॉलर ठरली तिने 4 विकेट्स घेतल्या. भारतीय टीमच्या या झुंजार कामगिरीकडे बीसीसीआयच्या सोशल मीडिया अकाऊंटनं (BCCI Women) दुर्लक्ष केल्यानं फॅन्सनी संताप व्यक्त केला.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading