फोटो – ट्विटर, जेमिमा रॉड्रिग्स

न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या महिलांच्या वन-डे वर्ल्ड कपसाठी (Womens World Cup 2022) टीम इंडियाची निवड जाहीर झाली आहे. निवड समितीने मिताली राजच्या (Mithali Raji) नेतृत्त्वाखाली 15 सदस्यांची घोषणा केली आहे. या टीममध्ये फॉर्मात असलेल्या जेमिमा रॉड्रिग्सला (Jemimah Rodrigues) जागा मिळालेली नाही. या वर्षात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात भरपूर रन करणाऱ्या जेमिमाला टीममध्ये जागा न मिळाल्यानं (No Jemimah Rodrigues) फॅन्सनी नाराजी व्यक्त केली आहे.  

इंग्लंड-ऑस्ट्रेलियात रन

गेल्या वर्षी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात झालेल्या लीग क्रिकेटमध्ये जेमिमानं भरपूर रन केले आहेत. इंग्लंडमधील द हंड्रेड (The Hundred) स्पर्धेत तिनं 41.50 च्या सरासरीनं आणि 150.90 च्या स्ट्राईक रेटनं 249 रन काढले होते. त्या स्पर्धेत सर्वाधिक रन करणाऱ्या बॅटरच्या यादीमध्ये ती दुसऱ्या क्रमांकावर होती. इतकंच नाही तर महिलांच्या बिग बॅश लीग स्पर्धेत (Womens Big Bash League) स्पर्धेत जेमिमानं 13 मॅचमध्ये 27.75 च्या सरासरीनं 333 रन काढले.

मुंबईकर जेमिमानं 2018 साली टीम इंडियात पदार्पण केले. गेल्या 4 वर्षात ती टीम इंडियाच्या टीमची नियमित सदस्य बनली होती. जेमिमानं 21 वन-डेमध्ये 19.70 च्या सरासरीनं 394 रन केले आहेत. यामध्ये 3 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. तर 50  T20 इंटरनॅशनलमध्ये 110.70 च्या स्ट्राईक रेटनं 1055 रन जेमिमाच्या नावावर आहेत.

जेमिमाची निवड न झाल्यानं फॅन्समध्येही नाराजीचं वातावरण (No Jemimah Rodrigues) आहे.

का निवड नाही?

जेमिमानं लीग क्रिकेटमध्ये दमदार खेळ केला असला तरी वन-डे क्रिकेटमध्ये तिचा फॉर्म खराब होता. मागच्या वर्षी इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका विरुद्ध झालेल्या वन-डे मॅचमध्ये तिने 1, 9, 0,8 आणि 4 रन काढले होते. त्यामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील वन-डे सीरिजमध्ये तिला बेंचवर बसावे लागले.

जेमिमाच्या जागी टीममध्ये निवड झालेल्या यास्तिका भाटिया (Yastika Bhatia) ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पदार्पणात लक्षवेधी कामगिरी केली होती. यास्तिकानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सीरिजमध्ये तिसऱ्या क्रमांकावर येत 35 आणि 64 रन काढले होते. त्याचबरोबर यास्तिका ही डावखुरी बॅटर आहे. त्यामुळे टॉप बॅटींग ऑर्डरमधील वैविध्यता देखील जपली जाते. हा विचार करत निवड समितीनं जेमिमाच्या जागी यास्तिकालाच वर्ल्ड कप टीममध्ये निवड न करण्याचा (No Jemimah Rodrigues) निर्णय घेतला आहे.

भारतीय महिला क्रिकेट पाहताना ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा!

दुसरा नियम का?

निवड समितीचा युक्तिवादाचा विचार केला तरीही जेमिमा सारख्या खेळाडूची निवड करताना तिचा T20 लीगमधील फॉर्म हा निकष का विचारात घेतला नाही हा प्रश्न आहे. टीम इंडियाच्या पुरूष टीममध्ये काही खेळाडूंना त्यांचा ‘क्लास’ चा विचार करत गेली कित्येक महिने खेळवलं जात आहे. महिला टीममध्ये मात्र दुसराच नियम लावला आहे.

भारतीय महिला क्रिकेटच्या जनरेशन नेक्स्टमधील शफाली आणि जेमिमा या स्टार आहेत. आपण शफाली इतकंच आक्रमक खेळू शकतो. मोठ्या खेळी करू शकतो हे जेमिमानं हंड्रेड आणि बिग बॅशमध्ये दाखवलं आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या टीम इंडियाला त्रास देणाऱ्या बॉलर्स विरुद्ध खेळण्याचा त्यांच्या विरूद्ध रन करण्याचा अनुभव तिच्याकडे आहे. तरीही वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेतून तिला निवड समितीने वगळले (No Jemimah Rodrigues) आहे.

17 व्या वर्षीच महिला क्रिकेटमधील सुपरस्टार बनलेली शफाली वर्मा कोण आहे?

वन-डे वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया :  मिताली राज (कॅप्टन), स्मृती मंधाना (व्हाईस कॅप्टन), शफाली वर्मा, यास्तिका भाटिया, रिचा घोष, स्नेह राणा, दीप्ती शर्मा, झुलन गोस्वामी, पूजा वस्त्रकार, मेघना सिंह, रेणूका सिंह ठाकूर, तानिया भाटिया, राजेश्वरी गायकवाड आणि पूनम यादव

राखीव खेळाडू : एकता बिश्ट, सिमरन दिल बहादूर आणि एस. मेघना

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.error: