फोटो – BCCI

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियमशिप फायनलला (WTC Final) 18 जून पासून सुरुवात होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या या स्पर्धेचा विजेता या फायनलनंतर निश्चित होईल. पहिल्या T20 वर्ल्ड कप प्रमाणे पहिली WTC फायनल टीम इंडियाला जिंकायची असेल रोहित शर्मा फॅक्टर (Rohit Sharma Factor) विराट कोहलीसाठी (Virat Kohli) सर्वात जास्त महत्त्वाचा असणार आहे.

सर्व दिग्गजांमध्ये रोहित भारी

टीम इंडियाकडे या फायनलमध्ये दिग्गज बॅट्समन आहेत. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) हे टेस्ट स्पेशालिस्ट. स्वत:  कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि आक्रमक विकेटकिपर- बॅट्समन ऋषभ पंत (Rishabh Pant) ही तगडी बॅटींग ऑर्डर जगातील कोणत्याही मैदानात भारी पडू शकते.

या सर्व दिग्गजांच्या यादी हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma Factor) हा विराट कोहलीसाठी निर्णायक ठरणार आहे. रोहितला बराच काळ वन-डे स्पेशालिस्ट बॅट्समन समजण्यात येत होते. मात्र दीर्घकाळ खेळण्याची संधी मिळाली तर टेस्ट क्रिकेटमध्येही आपण चांगलं खेळू शकतो हे रोहितनं दाखवून दिलं आहे.

‘रोहित शर्माला टीम इंडियाचा कॅप्टन करावं, आपण जास्त मॅच जिंकू’

रोहित का भारी आहे?

रोहित शर्माची या सीरिजमधील कामगिरी इतरांपेक्षा सरस आहे, म्हणून रोहित फायनलमध्ये अन्य सर्व बॅट्समनपेक्षा भारी आहे. रोहितनं या स्पर्धेत 64.37 च्या सरासरीनं 1030 रन काढले आहेत. टीम इंडियाकडून सर्वात जास्त 4 सेंच्युरी रोहितनंच झळकावल्या आहेत. रोहित खालोखाल मयांक अगरवाल (Mayank Agarwal) यानं 3 सेंच्युरी झळकावल्या आहेत. पण त्याचं फायनलमध्ये खेळणे निश्चित नाही.

WTC फायनल खेळतील अशा बॅट्समनमध्ये अजिंक्य रहाणेनं 3, विराट कोहलीनं 2 तर ऋषभ पंतनं 1 सेंच्युरी झळकावली आहे. तर टीम इंडियाची नवी वॉल असलेल्या चेतेश्वर पुजाराला या स्पर्धेत एकही सेंच्युरी झळकावता आलेली नाही.

टीम इंडियाकडून या सीरिजमध्ये सर्वात जास्त 1095 रन अजिंक्य रहाणेनं काढले आहेत. पण रहाणे सर्वच्या सर्व 17 टेस्ट खेळला आहे. रोहितनं त्याच्यापेक्षा 6 टेस्ट कमी खेळत 1 हजारचा टप्पा ओलांडला आहे.

इतकंच नाही, तर टीम इंडियानं या सीरिजमध्ये 17 पैकी 4  टेस्ट गमावल्या असून त्यापैकी 3 टेस्टमध्ये रोहित नव्हता. हेच सोपं करुन सांगायचं तर रोहित शर्माच्या उपस्थितीमध्ये (Rohit Sharma Factor) दोन वर्ष चाललेल्या या सीरिजमध्ये टीम इंडियानं फक्त 1 टेस्ट गमावली आहे.

चेन्नईच्या फिरत्या पिचवर रोहित शर्माची सेंच्युरी

न्यूझीलंडची टीम आणि इंग्लंडचे मैदान

WTC फायनल न्यूझीलंड विरुद्ध आणि इंग्लंडमध्ये होत आहे. रोहित शर्मानं न्यूझीलंड विरुद्ध आजवर 5 टेस्टमध्ये 60 च्या सरासरीनं 360 रन केले आहेत. यामध्ये एकही सेंच्युरी नाही. ती कसर भरुन काढण्याची संधी त्याला फायनल मॅचमध्ये इंग्लंडच्या पिचवर चालून आली आहे.

रोहित शर्मा इंग्लंडमध्ये यापूर्वी क्रिकेट वर्ल्ड कप 2019 मध्ये (Cricket World Cup 2019) खेळला आहे. या वर्ल्ड कपमध्ये रोहितनं 5 सेंच्युरीसह 81 च्या सरासरीनं सर्वात जास्त 648 रन काढले होते. एका वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त सेंच्युरी करण्याचा रेकॉर्ड देखील रोहितनं केला आहे.

न्यूझीलंड विरुद्ध फायनलमध्ये रोहितचा पार्टरनर कोण असेल हे अजून नक्की नाही. या जागेसाठी शुभमन गिल आणि मयांक अगरवाल यांच्यात स्पर्धा आहे. ओपनिंगला दुसऱ्या बाजूने कुणीही येऊ हे विजेतेपद पटकावण्यासाठी टीम इंडियाची सर्वात जास्त भिस्त ही रोहित शर्मावर (Rohiot Sharma Factor) असणार आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: