फोटो – ट्विटर/ICC

साऊथम्पटनमध्ये झालेल्या पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शिप फायनलमध्ये (World Test Championship Final) न्यूझीलंडनं टीम इंडियाचा 8 विकेट्सनं पराभव केला. या विजयाबरोबरच न्यूझीलंडनं आयसीसी विजेतेपदाचा 21 वर्षांचा दुष्काळ संपवला आहे. तर टीम इंडियाला सलग सहाव्या आयसीसी स्पर्धेत विजेतेपदापासून वचिंत राहावं लागलं आहे. टीम इंडियाच्या या पराभवाची 5 मुख्य कारणं (5 Reasons For India Defeat) काय आहेत ते पाहूया

ओपनर्सना अपयश

टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरमध्ये वेगानं रन करणारा, सुरुवातीपासून आक्रमक फटकेबाजी करणारा, या फटकेबाजीतून समोरच्या टीममध्ये गोंधळ निर्माण करणारा वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) ( किंवा सध्याच्या पिढीतील शफाली वर्मा) सारखा बॅट्समन हवा, असे मत नेहमी व्यक्त केले जाते.

क्रिकेट फॅन्सची ही भावना योग्य आहे. पण सेहवागसारखा खेळाडू एकच असतो. दुसरा सेहवाग किंवा दुसरी शफाली सहज तयार होत नाही. कोणत्याही खेळाडूला तसं करण्याचा अट्टहास देखील करु नये. भारतीय ओपनर्सना फायनलमधील दोन्ही इनिंगमध्ये मोठी कामगिरी करण्यात अपयश आले. रोहित-शुभमन जोडीनं (Rohit Sharma-Shubman Gill) पहिल्या इनिंगमध्ये 67 रनची पार्टरनरशिप केली. पण त्यानंतर ते दोघंही लागोपाठ आऊट झाले. त्याचबरोबर दुसऱ्या इनिंगमध्येही तसंच घडले. न्यूझीलंडकडून डेवॉन कॉनवेनं (Devon Conway) पहिल्या इनिंगमध्ये हाफ सेंच्युरी झळकावली. चांगली ओपनिंग न मिळाल्याचा फटका (5 Reasons For India Defeat) टीम इंडियाला बसला.

17 व्या वर्षीच महिला क्रिकेटमधील सुपरस्टार बनलेली शफाली वर्मा कोण आहे?

जुनी चूक पुन्हा एकदा

न्यूझीलंडसमोर 175 पेक्षा जास्त टार्गेट असते तर परिस्थिती वेगळी ठरली असती, असा अनेक फॅन्सचं मत आहे. पाचव्या दिवशी न्यूझीलंडची अवस्था 6 आऊट 162 झाली होती. विल्यमसन (Kane Williamson) कोषात खेळत होता. त्यावेळी भारतीय बॉलर्सना न्यूझीलंडला झटपट गुंडाळता आले नाही. लोअर ऑर्डर झटपट गुंडाळण्यात भारतीय बॉलर्सना येणारे अपयश फायनल टेस्टमध्येही पुन्हा दिसले.

न्यूझीलंडच्या शेवटच्या 4 बॅट्सनननं पहिल्या इनिंगमध्ये 82 रन जोडले. भारताच्या शेवटच्या चौघांना 12 रनच करता आले. आपल्या लोअर ऑर्डरनं बॅटींगमध्ये योगदान न देणे ही जुनी चूक (5 Reasons For India Defeat) फायनलमध्ये पुन्हा केली.

बॉलर्सची पार्टरनरशिप नाही

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल जिंकण्यासाठी बॅट्समनच्या पार्टरनरशिप सोबतच बॉलिंगमध्येही पार्टरनरशिप होणे आवश्यक होते. टीम इंडियाच्या टेस्टमधील विजयी अभियानात इशांत-शमी-बुमराह-उमेश या चौघांच्या एकत्रित कामगिरीचे योगदान होते. फायनलमध्ये न्यूझीलंडच्या साऊदी-बोल्ट-जेमीसन-वॅग्नर या चौघांनीही एकत्र मारा केला.

त्यांनी मोक्याच्या क्षणी विकेट्स घेत, टीम इंडियाला उसंत मिळू दिली नाही. टीम इंडियाकडून पहिल्या इनिंगमध्ये मोहम्मद शमीनं (Mohammed Shami) जोरदार स्पेल टाकला. त्याला त्याचवेळी दुसऱ्या बाजूने तोलामोलाने विकेट्स घेऊन साथ मिळाली नाही. दुसऱ्या इनिंगमध्ये अश्विनने (R. Ashwin) न्यूझीलंडचे ओपनर्सना आऊट करत संधी निर्माण केली होती. त्याचा फायदा अन्य बॉलर्सना (5 Reasons For India Defeat) विकेट्स मिळवून उठवता आला नाही.

WTC Final 2021: …तसं झालं तर क्रिकेट खेळणे सोडून देईन, अश्विनचं मोठं वक्तव्य

बुमराहचे अपयश

जसप्रीत बुमराह (Jasprith Bumrah) हा सध्या निर्विवादपणे जगातील बेस्ट बॉलर आहे. या बेस्ट बॉलरला फायनल टेस्टमध्ये एकही विकेट मिळाली नाही. या टेस्टमध्ये विकेट न मिळालोला तो टीम इंडियाचा एकमेव बॉलर होता.

बुमराहनं पहिल्या इनिंगमध्ये 26 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 10.4 ओव्हर्स टाकल्या. त्याच्या या 36 ओव्हर्समध्ये टीम इंडियाला एकही विकेट मिळाली नाही. दुसऱ्या इनिंगमध्ये बुमराहच्या बॉलिंगवर रॉस टेलरचा कॅच पुजारानं सोडला. पण त्याच्यासारख्या बेस्ट बॉलर्सकडून या प्रकारच्या संधी जास्त निर्माण करण्याची अपेक्षा (5 Reasons For India Defeat) होती. तसंच बुमराहला दोन्ही इनिंगमध्ये बॅटींग करण्याची संधी मिळाली. दोन्ही वेळेस त्याला भोपळाही फोडता आला नाही. दोन्ही इनिंगमध्ये मिळून तो फक्त 5 बॉल खेळला. त्याचं मुख्य काम बॉलिंग असले तरी बॅटींगमध्ये काहीही योगदान न देणे हे बुमराहसारख्या बड्या प्लेयरला शोभत नाही.

सहाव्या दिवशी खराब खेळ

विराट कोहली (Virat Kohli) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) या दोन प्रमुख बॅट्समनच्या सेंच्युरीची प्रतीक्षा आणखी लांबली आहे. सहाव्या दिवशी हे दोघं भारतीय फॅन्स टीव्ही/हॉटस्टार लावून स्थिरावण्याच्या आत आऊट झाले. त्यामुळे सुरुवातीपासून टीम इंडियावर दबाव निर्माण झाला. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) बाहेरच्या बॉलवर आऊट झाला. टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरच्या बॅट्समननी जबाबदारी खेळ करत मोठी पार्टरनशिप करायला हवी होती. विल्यमसन-टेलर जोडीनं ती जबाबदारी पूर्ण करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

विराट की विल्यमसन? 13 वर्षांच्या Fire vs Ice लढतीमध्ये कोण आहे सरस

ऋषभ पंतने (Rishabh Pant) चांगलाच खेळ केला. पण कसोटीच्या क्षणी त्याला फटकेबाजीचा मोह टाळता आला नाही. जडेजा-अश्विनकडूही टीम इंडियाला जास्त बॅटींगची अपेक्षा होती. ती अपेक्षा या जोडीला पूर्ण करता आली नाही. भारताच्या दिग्गज बॅट्समन्सना दोन्ही इनिंगमध्ये मिळून एकही हाफ सेंच्युरी करता आली नाही. विशेषत: सहाव्या दिवशी त्यांचे अपयश (5 Reasons For India Defeat) टीम इंडियाच्या फायनलमधील पराभवाचे मोठे कारण ठरले.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: