फोटो – ट्विटर/BLACKCAPS

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचं (WTC Final 2021) काऊंडटाऊन सुरू झाले आहे. टेस्ट रँकिंगमधील नंबर 1 टीम इंडिया आणि नंबर 2 न्यूझीलंड यांच्यात ही लढत होणार आहे. या सीरिजमध्ये यापूर्वी न्यूझीलंडने टीम इंडियाचा पराभव केला होता. त्याचबरोबर वर्ल्ड कप सेमी फायनलमध्येही केन विल्यमसनची (Kane Williamson) टीम विराट कोहलीच्या (Virat Kohli) संघावर भारी पडली होती. टीम इंडियाला या दोन्ही पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे. मात्र त्यासाठी फायनलमध्ये अनुभवी रॉस टेलरचा (Ross Taylor Factor) अडथळा पार करावा लागेल.

न्यूझीलंडच्या टीममध्ये अनेक चांगले खेळाडू आहेत. आयसीसी टेस्ट रँकींगमधील नंबर वन केन विल्यमसन, धोकादायक ट्रेंट बोल्ट (Trent Boult) पदार्पणातच डबल सेंच्युरी करणारा डेवॉन कॉनवे (Devon Conway) हे सर्व जण दोन दशकांनतर न्यूझीलंडला आयसीसी विजेतेपद मिळवून देण्यासाठी सज्ज आहेत. त्यातच या सर्वांना फायनलपूर्वी इंग्लंड विरुद्ध दोन टेस्ट खेळून चांगला सराव देखील होणार आहे. हे सर्व असलं तरी न्यूझीलंडच्या मिडल ऑर्डरचा बॅट्समन रॉस टेलर टीम इंडियासाठी जास्त धोकादायक आहे.

का आहे टेलरचा धोका?

रॉस टेलर त्याच्या अनुभवाबरोबच बॅटींगच्या शैलीमुळे देखील टीम इंडियासाठी सर्वात मोठा धोका आहे. भारतीय टीम फायनलमध्ये आर. अश्विन (Ravichandran Ashwin) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) या दोन स्पिनर्ससह उतरण्याची दाट शक्यता आहे. न्यूझीलंडच्या बॅटींग विरुद्ध हे दोन अनुभवी स्पिनर्स टीम इंडियाचे मुख्य अस्र असतील. न्यूझीलंडच्या बॅट्समनपैकी या दोघांची लाईन अँड लेंथ बिघडवण्याची सर्वात जास्त क्षमता ही रॉस टेलरमध्ये आहे. टेलर रिव्हर्स स्वीप चांगल्या पद्धतीने मारु शकतो. रिव्हर्स स्वीपचा उत्तम वापर करणारा बॅट्समन भारतीय स्पिनर्स विरुद्ध यशस्वी होतो हा इतिहास आहे.  

मॅथ्यू हेडन. गिलख्रिस्ट, अँडी फ्लॉवर, ग्रॅहम गूच, माईक गॅटींग या बॅट्समननं रिव्हर्स स्वीपचा सढळ वापर करत टीम इंडियाच्या स्पिनर्सना यापूर्वी त्रास दिला आहे. टेलरच्या बॅटींगची शैली (Ross Taylor Factor) भारतीय स्पिनर्ससाठी त्रासदायक ठरु शकते.

शोएब अख्तरचे करियर संपवणारा बॅट्समन!

वेगाने रन बनवण्याची क्षमता

रॉस टेलर गेल्या 13 वर्षांहून जास्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रीय आहे. 106 टेस्टचा अनुभव असलेल्या टेलरचा स्ट्राईक रेट हा 60 पेक्षा जास्त आहे. त्याच्यामध्ये वेगाने रन काढण्याची क्षमता असून तो एकाच सेशनमध्ये मॅचचं पारडं न्यूझीलडंच्या बाजूने झुकवू शकतो. टेलरनं 2019 नंतर टेस्ट क्रिकेटमध्ये एकही सेंच्युरी झळकावलेली नाही. त्याचा हा दुष्काळ संपण्यासाठी तो फायनलमध्ये नक्की प्रयत्न करणार आहे. टीम इंडिया विरुद्ध त्याने 14 टेस्टमध्ये 3 सेंच्युरी झळकावल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियाला न्यूझीलंडला फायनलमध्ये रोखण्यासाठी (Ross Taylor Factor) रॉस टेलरवर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.    

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: