
टीम इंडियाचा माजी ओपनिंग बॅट्समन वासिम जाफर (Wasim Jaffer) त्याच्या विनोदी शैलीतील ट्विटसाठी प्रसिद्ध आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18 जून ते 22 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल (World Test Championship Final) होणार आहे. या मॅचमध्ये कोण अंपायर नको याबद्ददल जाफरने एक ट्विट (Jaffer on Umpire) केले आहे. जाफरने या ट्विटमधून त्याच्या शैलीत ट्रोल केले असले, तरी याचा अर्थ खूप खोल आहे. या ट्विटमधून त्याने भारतीय फॅन्सच्या मनातील भीती व्यक्त केली आहे.
जाफरने हे ट्विट करताना एक मीम वापरलं आहे. या ट्विटमध्ये त्याने न्यूझीलंड विरुद्धच्या फायनल मॅचमध्ये इंग्लंडचे रिचर्ड केटलबेरो (Richard Kettleborough) हे अंपायर नको तर श्रीलंकेचे कुमार धर्मसेना (Kumar Dharmasena) हे अंपायर हवेत अशी मागणी केली आहे. जाफरने या ट्विटमध्ये आयसीसीला देखील टॅग केले आहे.
भारतीय फॅन्सची भीती व्यक्त
वासिम जाफरने हे ट्विट करत एकप्रकारे भारतीय फॅन्सच्या मनातील भीती मांडली आहे. केटलबेरोचा टीम इंडियाच्या मोठ्या मॅचमधील रेकॉर्ड याचे कारण आहे. त्यांनी आयसीसी स्पर्धेतील भारताच्या ज्या मोठ्या मॅचमध्ये अंपायरिंग केली आहे, त्या सर्व मॅच भारताने हरल्या आहेत.
त्यांचा हा रेकॉर्ड 2014 पासून आहे. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील T20 वर्ल्ड कप 2014 फायनल, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट वर्ल्ड कप 2015 सेमी फायनल, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज T20 वर्ल्ड कप सेमी फायनल, भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 फायनल आणि सर्वात शेवटची भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट वर्ल्ड कप 2017 सेमी फायनल या सर्व भारताने गामवलेल्या मॅचमध्ये केटलबेरो हे अंपायर म्हणून मैदानात उपस्थित होते. थोड्यात भारताने 2014 पासून ज्या आयसीसीच्या स्पर्धा थोडक्यात गमावल्या त्या सर्व स्पर्धेतील भारताच्या निर्णायक पराभवावेळी केटलबेरो अंपायर म्हणून मैदानात होते. त्यामुळेच ते फायनलमध्ये अंपायर म्हणून नको, अशी मागणी जाफरने (Jaffer on Umpire) केली आहे.
न्यूझीलंडला केलं ट्रोल
वासिम जाफरने या ट्विटमधून कुमार धर्मसेना हे अंपायर हवेत अशी मागणी करत न्यूझीलंडला ट्रोल केले आहे. न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कप फायनलमध्ये धर्मसेना अंपायर होते. त्या मॅचमध्ये त्यांनी घेतलेल्या वादग्रस्त निर्णयचा न्यूझीलंडला फटका बसला होता. त्यामुळे ती मॅच टाय झाली, आणि पुढे आयसीसीच्या नियमानुसार इंग्लंडला वर्ल्ड चॅम्पियन म्हणून घोषित करण्यात आले.
अजिंक्य रहाणेच्या अविस्मरणीय सेंच्युरीवर जळणाऱ्या ब्रिटीश मीडियाला वासिम जाफरने दिलं खणखणीत उत्तर!
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.
You must be logged in to post a comment.