फोटो- ट्विटर/ICC

केन विल्यमसनच्या (Kane Williamson) न्यूझीलंड टीमनं टीम इंडियाचा पराभव करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशिप (World Test Championship) स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावले आहे. पावसाचा अडथळा आलेली ही फायनल ड्रॉ होईल असा अनेकांचा अंदाज होता. पण सहाव्या अतिरिक्त दिवशी न्यूझीलंडनं ‘नॉक आऊट पंच’ लगावत टीम इंडियाचा पराभव केला. न्यूझीलंडच्या या विजेतेपदाची 5 मुख्य कारणं (Why New Zealand Champion) पाहूया

सांघिक प्रयत्नांचे यश

भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या टीमसारखे न्यूझीलंडच्या टीममध्ये कुणी सुपरस्टार नाहीत. केन विल्यमसननं फायनलनंतर बोलतानाही या सत्याची आठवण करुन दिली आहे. सुपरस्टार नसले तरी सांघिक भावनेनं खेळणारे खेळाडू हे या चॅम्पियन टीमने दाखवून दिलं आहे. तिसरीच टेस्ट खेळणारा डेव्हॉन कॉनवे (Devon Conway) ते 108 वी टेस्ट खेळणारा रॉस टेलर (Ross Taylor) या सर्वांनीच एका बलाढ्य टीम इंडियाला हरवायचं या उद्देशानं जीव तोडून खेळ केला. त्याचे त्यांना फळ (Why New Zealand Champion) मिळाले.

उत्तम प्लॅनिंग

न्यूझीलंडच्या टीमनं या फायनलची तयारी अधिक उत्तम केली होती. त्यांनी फायनलपूर्वी इंग्लंड विरुद्ध दोन टेस्ट मॅच खेळल्या. दुसऱ्या टेस्टमध्ये दुसऱ्या फळीतील 6 सदस्यांना खेळवून फायनलसाठी कोण बेस्ट असेल याचा अंदाज घेतला. त्याचबरोबर त्यांच्या बॉलर्सना फायनलसाठी वापरण्यात येणाऱ्या ड्यूक बॉलचाही सराव मिळाला.

टीम इंडिया शेवटची टेस्ट तीन महिन्यांपूर्वी खेळली होती. त्याचबरोबर विराट कोहलीच्या टीमला फायनलपूर्वी एकही प्रॅक्टीस मॅच खेळायला मिळाला नाही. भारतीय बॉलर्सचा ड्यूक बॉलचा सरावही फार झाला नव्हता. दोन्ही टीममधील या मोठ्या फरकाचा फायदा (Why New Zealand Champion) न्यूझीलंडला झाला.

WTC Final 2021: टीम इंडियाच्या पराभवाची 5 मुख्य कारणं

योग्य टीम निवड

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही टीमने त्यांचे बेस्ट 11 जण खेळवले. त्यातही स्पिनर न खेळवता पाच फास्ट बॉलर्स खेळवण्याचा निर्णय न्यूझीलंडच्या फायद्याचा ठरला. फायनलमध्ये एजाज पटेल हा स्पिनर खेळवला असता तर त्याच्या बॉलिंगच्या वेळी टीम इंडियाच्या बॅट्समनला उसंत मिळाली असती.

पाचही फास्ट बॉलर्सनी पिच, वातावरण आणि गेम प्लॅन याला साजेशी ब़ॉलिंग केली. पहिल्या इनिंगमध्ये काईल जेमीसन (Kyle Jamieson) तर दुसऱ्या इनिंगमध्ये टीम साऊदी (Tim Southee) हे सर्वात यशस्वी बॉलर्स (Why New Zealand Champion) ठरले. पण त्यांना अन्य बॉलर्सनी देखील तोलामोलाची साथ दिली. फायनल टेस्टमध्ये टीम इंडियाच्या एकाही बॅट्समनला हाफ सेंच्युरी करता आली नाही.

लोअर ऑर्डरची कमाल

न्यूझीलंडची पहिल्या इनिंगमध्ये 6 आऊट 162 अशी अवस्था होती. त्यावेळी टीम इंडियाला आघाडी मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण त्या निर्णायक क्षणी जेमीसन आणि साऊदी यांनी बॅट चालवत न्यूझीलंडला 32 रनची महत्तवाची आघाडी मिळवून दिली. लोअर ऑर्डरनं निर्णायक क्षणी प्रतिकार केल्यानं विजयाचा दोलक (Why New Zealand Champion) न्यूझीलंडच्या दिशेनं सरकला.

क्रिकेट विश्वाने दुर्लक्ष केलेला बेस्ट ऑल राऊंडर!

कॉनवे-विल्यमसन-टेलर

न्यूझीलंडच्या बॅटींगच्या या त्रिकुटानं टीम इंडियाचा अटॅक थोपवून धरला. तिसरीच टेस्ट खेळणाऱ्या कॉनवेनं भारताच्या अनुभवी माऱ्यासमोर आणि बॅटींगसाठी अवघड परिस्थिती असतानाही पहिल्या इनिंगमध्ये हाफ सेंच्युरी झळकावली.

केन विल्यमसनच्या पहिल्या इनिंगमधील संथ खेळीचं सोशल मीडियावर ट्रोलिंग झालं. पण विल्यमसननं एक बाजू भक्कम लावून धरत टीमच्या बॅटींगचं ओझं वाहण्याचं त्याचं काम चोख केलं. त्यानंतर शेवटच्या दिवशी शेवटच्या सेशनमध्ये शांत डोक्यानं बॅटींग करत नाबाद हाफ सेंच्युरी झळकावली आणि त्याचा क्लास दाखवून दिला. फायनल मॅचमध्ये सर्वात जास्त रन विल्यमसननं काढले.

अनुभवी रॉस टेलर या स्पर्धेत फॉर्मात नव्हता. पण त्यानं शेवटच्या दिवशी नाबाद 47 रनची खेळी करत आपण मोठ्या मॅचचे प्लेयर असल्याचं दाखवून दिलं. तो शेवटच्या सेशनमध्ये विल्यमसनसोबत मैदानात ठाण मांडून खेळला. विल्यमसन-टेलर पार्टरनरशिपमुळे वळणाच्या निसरड्या रस्त्यावरुन न्यूझीलंडची गाडी चॅम्पियनशिपच्या मुक्कामावर सुखरुप पोहचली. 13 आयसीसी स्पर्धा खेळल्यानंतर टेलरला विजयी टीमचे सदस्य होता आले. इतकंच नाही तर विजयी फटका देखील त्यानेच लगावला. कठोर परिश्रमाशिवाय (Why New Zealand Champion) यश मिळत नाही. हे रवी शास्त्रींच्या ट्विटमधील वाक्य टेलर इतके समर्पक दोन्ही टीममधील कोणत्याही खेळाडूला लागू होत नाही.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: