
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या एक दिवस आधीच टीम इंडियानं अंतिम 11 जणांची (WTC Final India XI) घोषणा केली आहे. साधारणपणे टॉसच्या पूर्वी जाहीर होणारी टीम भारतीय मॅनेजमेंटनं एक दिवस आधीच जाहीर करत ही फायनल जिंकण्यासाठी आपण सकारात्मक आहोत, असा संदेश क्रिकेट विश्वाला दिला आहे.
मोठा बदल नाही
मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) फायनल खेळणार का? या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. सिराजनं ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून सातत्याने चांगली कामगिरी केली. इंग्लंडमधील वातावरणात तो कमाल करेल त्यामुळे त्याचा अंतिम 11 मध्ये समावेश करावा असं अनेकांचं मत होतं.
टीम मॅनेजमेंटनं मात्र इशांत शर्मा (Ishant Sharma), मोहम्मद शमी ( Mohammad Siraj) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) या अनुभवी बॉलर्सना अंतिम 11 मध्ये प्राधान्य दिले आहे. भारतीय टीम टेस्ट क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यात या तिघांसह उमेश यादव (Umesh Yadav) याचे योगदान आहे. उमेशला जागेच्या मर्यादेमुळे अंतिम 11 मध्ये संधी मिळालेली नाही. पण अन्य तीन विश्वासू बॉलर्स फायनलमध्ये न्यूझीलंडची परीक्षा घेण्यासाठी सज्ज (WTC Final India XI) असतील. मोहम्मद सिराजला आता आणखी पुढील टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. आगामी काळात तो कामगिरीत सुधारणा करुन पुढील फायनल खेळेल यात शंका नाही.
जडेजा आणि अश्विन दोघंही बेस्ट
साऊथम्पटनचं हवामान पाहून एक स्पिनर खेळवावा, असा सल्लाही काही जणांनी टीम मॅनेजमेंटला दिला होता. जडेजा आणि अश्विन (Ravindra Jadeja & Ravichandran Ashwin) या दोघांपैकी कोण बेस्ट आहे जो फायनल खेळेल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून फॅन्समध्ये रंगली होती. टीम मॅनेजमेंटनं जडेजा आणि अश्विन हे दोघेही बेस्ट आहेत, असं सांगत या दोघांचाही टीममध्ये समावेश केला आहे.
साऊथम्पटन भारताविरुद्ध झालेल्या 2 टेस्टमध्ये मोईन अलीनं 17 विकेट्स घेतल्या होत्या. त्याचा हा रेकॉर्ड जडेजा -अश्विनचा उत्साह वाढवणारा असेल. न्यूझीलंडच्या टीममध्ये असलेली डावखुऱ्या बॅट्समनचे घाऊक प्रमाण अश्विनच्या फायद्याचे आहे. फायनलमध्ये बेस्ट कामगिरी करुन हा ‘टीम मॅन’ अश्विन टीकाकारांची तोंडं बंद करण्यासाठी सज्ज आहे. तर बॅटींग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तीन्ही प्रकारातील एक पॅकेज असलेला जडेजा या फायनलसाठी ‘मॅन ऑफ द मॅच’ चा प्रबळ दावेदार असेल.
WTC Final 2021: 3 भारतीय प्लेयर जे होऊ शकतात ‘मॅन ऑफ द मॅच’
बॅटींग ऑर्डरमध्ये बदल नाही
टीम इंडियाची बॅटींग ऑर्डर (WTC Final India XI) सर्वांना अपेक्षित असलेलीच आहे. शुभमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंत हे सहा बॅट्समन फायनल खेळणार आहेत.
WTC फायनल जिंकण्यासाठी विराटची सर्वात मोठी भिस्त रोहित शर्मावर असेल कारण…
हे सहा जण न्यूझीलंचा फास्ट बॉलिंगचा अटॅक कसा खेळतात, दिवसाच्या सुरुवातीच्या सत्रात कशी बॅटींग करतात यावर टीम इंडियाच्या या विजेतेपदाचे भवितव्य अवलंबून असेल.
WTC फायनलसाठी टीम इंडिया (WTC Final India XI)
ओपनिंग बॅट्समन | रोहित शर्मा, शुभमन गिल |
मिडल ऑर्डर | चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे (व्हाईस कॅप्टन) |
लोअर मिडल ऑर्डर | ऋषभ पंत (विकेट किपर), रवींद्र जडेजा, आर. अश्विन |
बॉलर्स | इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह |
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.