वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी (WTC Final 2021) टीम इंडियाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या फायनलसाठी टीम इंडियानं ‘स्पेशल 15’ जणांची टीम जाहीर केली आहे. यामध्ये बॅटींग आणि बॉलिंगचं उत्तम संतुलन आहे. टीम इंडियाला फायनल जिंकण्यासाठी बॅटींग जबाबदारीनं करावी लागणार आहे. इंग्लंडमधल्या वातावरणात न्यूझीलंडच्या बॉलर्सचा सामना विराट कोहली आणि कंपनी कशी करते यावर या फायनलचं बरंचसं भवितव्य अवलंबून असेल. यावेळी टीम इंडियाच्या मदतीला सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) धावून आला आहे. त्याने इंग्लंडमध्ये कशी बॅटींग करायची (Sachin On Indian Batting) याचा मंत्र टीम इंडियाला दिला आहे.

काय आहे सचिनचा मंत्र?

सचिननं ‘दैनिक जागरण’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये साऊथम्पटन टेस्टमध्ये कशी बॅटींग करावी याचे विवेचन केले आहे. “टीम इंडियाचे सर्व खेळाडू अनुभवी आहे. ते खूप दिवसांपासून क्रिकेट खेळत आहेत. कोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे, याची त्यांना कल्पना आहे,” असं सचिननं सुरुवातीला सांगितलं.

साऊथम्पटनमधील परिस्थितीमध्ये फ्रंट फुट डिफेन्स मजबूत असणे आवश्यक आहे. फास्ट बॉलर्सच्या विरुद्ध ही गोष्टी चांगली असेल तर बॅटींग चांगली होईल. त्याचबरोबर जितकं शक्य आहे तितकं बॉल शरिराच्या जवळून खेळावा आणि उशीरात उशीरा खेळावा. या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. या दोन गोष्टी नीट केल्या तर अन्य अडचणींचा तुम्हाला सामना करावा लागणार नाही.” असा कानमंत्र सचिननं (Sachin On Indian Batting)  दिला आहे.

WTC फायनल जिंकण्यासाठी विराटची सर्वात मोठी भिस्त रोहित शर्मावर असेल कारण…

टीम इंडिया अनुभवी

टीम इंडियाला फायनलपूर्वी एकही सराव सामना इंग्लंडमध्ये खेळायला मिळालेला नाही. त्यांना परस्परांमध्येच मॅच खेळाव्या लागल्या. तर न्यूझीलंडची टीम इंग्लंड विरुद्ध दोन टेस्ट मॅच खेळून फायनलमध्ये उतरणार आहे. या परिस्थितीवरही सचिननं मत व्यक्त केलं आहे.

“टीम इंडियाचे सर्व खेळाडू यापूर्वी इंग्लंड विरुद्ध खेळले आहेत. काही टेस्ट मॅच खेळलेत. तर काही इंडिया ए साठी खेळले आहेत. इंग्लंडमधील पिच त्यांनी कधी पाहिलं नाही, असं नाही. या पिचवर कसं खेळलं पाहिजे हे त्यांना माहिती आहे.” असे सचिन (Sachin On Indian Batting) यावेळी म्हणाला.

राहुल द्रविडचा 13 वर्षांपूर्वीचा एक सल्ला आणि रहाणे बनला रनमशिन

टीम इंडियाचे स्पेशल 15

विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, इंशात शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, वृद्धीमान साहा, उमेश यादव आणि हनुमा विहारी

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: