फोटो – ट्विटर

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल (World Test Championship 2021) जिंकून न्यूझीलंडचा जुना हिशेब पूर्ण करण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. यापूर्वी 2000 साली झालेल्या ICC Knockout स्पर्धेच्या फायनलमध्ये न्यूझीलंडनं टीम इंडियाचा पराभव केला होता. त्यानंतर 2019 साली वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडनंच टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात आणलं होतं, हे आपल्या सर्वांना माहिती आहेच. आता टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये या सर्वांचा वचपा काढण्याची टीम इंडियाला संधी आहे. टीम इंडियाने ही फायनल जिंकली तर कोणते 3 भारतीय खेळाडू ‘मॅन ऑफ द मॅच’ (3 Mom for Team India) ठरु शकतात ते पाहूया

रोहित शर्मा

‘विदेशातील ग्राऊंडवर तो फेल होतो’, ही ओरड बंद करण्याची संधी रोहित शर्मा (Rohit Sharma) कडे आहे. टीम इंडियाचा ओपनर म्हणून एक मोठी खेळी खेळण्याची संधी रोहितला आहे. रोहितनं सुरुवातीचा एक तास खेळून काढला तर तो साऊथम्पटनमध्ये दिवसभर खेळू शकतो. रोहित दिवसभर खेळला तर तो 200 आणि टीम इंडिया 350 करणार हे नक्की आहे.

या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये रोहितची बॅट चांगलीच तळपली आहे. त्याने फक्त 11 टेस्टमध्ये 1000 पेक्षा जास्त रन केले आहेत. अजिंक्य रहाणेला मागे टाकून या भारताकडून सर्वात जास्त रन करण्याची संधी रोहितला आहे. त्याचबरोबर रोहितकडं इतरांपेक्षा बॉल खेळण्यासाठी एक सेकंद जास्त असतो. साऊथम्पटनमध्ये उशीरा बॉल खेळणे हे अधिक फायद्याचं आहे, हाच कानमंत्र सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) टीम इंडियाच्या बॅट्समन्सना दिला आहे.

WTC फायनल जिंकण्यासाठी विराटची सर्वात मोठी भिस्त रोहित शर्मावर असेल कारण…

विराट कोहली

विराट कोहलीनं (Virat Kohli) 2009 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिली सेंच्युरी झळकावली होती. त्यानंतर 2020 या कॅलेंडर वर्षात पहिल्यांदाच विराटला एकही सेंच्युरी झळकावता आलेली नाही. विराटनं शेवटची आंतरराष्ट्रीय सेंच्युरी नोव्हेंबर 2019 मध्ये झळकावली होती. हा दुष्काळ संपवून एक ‘विराट इनिंग’ खेळण्याची योग्य संधी विराटला फायनलमध्ये आहे.

न्यूझीलंड विरुद्ध विराटनं टेस्टमध्ये 51.53 च्या सरासरीनं 773 रन काढले आहेत. यामध्ये एका डबल सेंच्युरीचाही समावेश आहे. तर वन-डे क्रिकेटमध्ये त्यानं 59.91 च्या सरासरीनं 1378 रन काढले आहेत. सध्या खूप मोठी हवा भरलेल्या न्यूझीलंडच्या बॉलिंगला टाचणी लावण्याची क्षमता विराटकडे आहे. विराटनं ती टाचणी लावली तर ‘मॅन ऑफ द मॅच’ (3 Mom for Team India) तोच असेल.

WTC Final 2021: विराट की विल्यमसन? 13 वर्षांच्या Fire vs Ice लढतीमध्ये कोण आहे सरस

रवींद्र जडेजा

रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) सध्या ज्या फॉर्मात आहे, ते पाहून त्याला Playing XI मधून वगळण्याचा मुर्खपणा जगातील कोणतीही टीम करणार नाही. तीन वर्षांपूर्वी इंग्लंडविरुद्ध ओव्हल टेस्टमध्ये जडेजानं चार विकेट्स आणि 86 रनची खेळी केली. या खेळीनंतर जडेजाला त्याच्यातला बॅट्समन गवसला.

न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये (Cricket World Cup 2019) जडेजानं आठव्या क्रमांकावर येत 77 रन काढले होते. जडेजानं त्यावेळी अशक्य वाटणारा विजय खेचून आणला होता. त्यावेळी अर्धवट राहिलेलं काम यंदा पूर्ण करण्याची जडेजाला संधी आहे. त्याच्या बॉलिंगमध्ये अनुभवाची धार आलीय. तर कोणतीही जमलेली जोडी तोडण्याची क्षमता त्याच्या अचूक थ्रो मध्ये आहे. बॅटींग, बॉलिंग आणि फिल्डिंगमधील परफेक्ट पॅकेज असलेला जडेजा फायनलमध्ये ‘मॅन ऑफ द मॅच’ चा (3 Mom for Team India) प्रबळ दावेदार आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: