फोटो – ट्विटर

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये (World Test Championship Final 2021) इशांत शर्मा (Ishant Sharma), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami) या तीन फास्ट बॉलर्सची टीम इंडियानं अंतिम 11 मध्ये निवड केली आहे. इशांत शर्माचा इंग्लंडमधील अनुभव, जसप्रीत बुमराहकडं असलेली वैविध्यता टीम इंडियासाठी महत्त्वाची आहे. तर संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियाच्या फास्ट बॉलिंगचा ट्रम्प कार्ड (Shami Trump Card) असलेल्या शमीची कामगिरी या विजेतेपदासाठी निर्णायक ठरणार आहे.

शमीची सातत्यपूर्ण कामगिरी

मोहम्मद शमीचा गेल्या चार वर्षांचा प्रवास News 18 डॉट कॉम वरील एका लेखात उलगडण्यात आला आहे. मोहम्मद शमीनं गुडघ्याच्या दुखापतीनंतर जुलै 2017 मध्ये टीम इंडियात कमबॅक केले. त्यानंतर टीम इंडियानं 38 टेस्ट खेळल्या आहेत. यापैकी शमी 28 पेक्षा जास्त टेस्ट खेळला आहे. टेस्ट मॅचची ही संख्या त्याचा फिटनेस सुधारला असल्याचे दाखवते.

शमीनं या काळात टीम इंडियाकडून 23.92 च्या सरासरीनं 104 विकेट्स घेतल्या आहेत. या काळातील त्याचा स्ट्राईक रेट हा 45.1 असून किमान 50 विकेट्स घेणाऱ्या 24 फास्ट बॉलर्सच्या यादीत त्याचा स्ट्राईक रेट हा जेम्स अँडरसन, पॅट कमिन्स, टीम साऊदी, ट्रेंट बोल्ट आणि स्टुअर्ट ब्रॉड या अव्वल फास्ट बॉलर्सपेक्षा सरस आहे.

शमीनं या टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये इशांत शर्मासह 36 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने या स्पर्धेतील 10 पैकी 6 टेस्टमध्ये एका इनिंगमध्ये 4 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. बांगलादेश विरुद्ध कोलकातामध्ये झालेल्या टीम इंडियाच्या पहिल्या डे-नाईट टेस्टमध्ये 29 रन देऊन 7 विकेट्स ही शमीची या स्पर्धेतील सर्वोच्च कामगिरी आहे.

नव्या बॅट्समनचा शिकारी

बॅट्सनन पिचवर नवा असतानाच मोहम्मद शमीची आऊट करण्याची क्षमता त्याला फास्ट बॉलिंगचं ट्रम्प कार्ड (Shami Trump Card) बनवते. शमीच्या गेल्या चार वर्षातील 104 पैकी 72 विकेट्स या त्यानं बॅट्समननी 20 रन काढण्याच्या आधी घेतल्या आहेत. याचाच अर्थ गेल्या चार वर्षात शमीनं तीन पैकी दोन विकेट्स या नव्या बॅट्समनच्या घेतल्या आहेत.

इशांत शर्मा @ 100 : ‘वो तो है अलबेला, हजारों में अकेला’!

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विशाखापट्टणमध्ये 2019 साली झालेल्या टेस्टमध्ये शमीनं 4 ओव्हर्समध्ये 3 प्रमुख विकेट्स घेत दुसऱ्या इनिंगमध्ये दक्षिण आफ्रिकेची अवस्था 4 आऊट 22 केली होती.

शमीची अचूकता

फास्ट बॉलर्ससाठी आवश्यक असलेली नव्या बॉलचा सीम करण्याचा आणि जुना बॉल रिव्हर्स स्विंग करण्याची क्षमता शमीकडे आहे. त्यामुळे आशियाई पिचवर दुसऱ्या इनिंगमध्ये शमी धोकादायक बॉलर बनलाय.

‘यॉर्कर किंग’ बुमराहचं एकच आश्वासन,’डोन्ट वरी कॅप्टन, मै हूं ना!

त्याचबरोबर शमीनं गेल्या चार वर्षातील 104 पैकी 44 विकेट्स या LBW किंवा बोल्ड या माध्यमातून घेतल्या आहेत. त्यामुळे बॅट्समनला थेट आऊट करण्याची त्याची क्षमता आहे.  त्यामुळे न्यूझीलंड विरुद्धच्या फायनलमध्येच नाही तर संपूर्ण इंग्लंड दौऱ्यात नवा आणि जुना बॉल सारख्याच क्षमतेनं वापरण्याची क्षमता असलेला मोहम्मद शमी टीम इंडियाचा ट्रम्प कार्ड (Shami Trump Card) आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: