
Fire vs Ice असं ज्या लढतीचं वर्णन केलं जात आहे, त्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचं (WTC Final 2021) काऊंटडाऊन आता सुरू झालं आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्या प्रमाणेच ही विराट कोहली विरुद्ध केन विल्यमसन (Virat Kohli vs Kane Williamson) यांच्यातील देखील स्पर्धा आहे. 2008 मध्ये झालेल्या अंडर 19 टी 20 वर्ल्ड कपमध्ये हे दोघं पहिल्यांदा एकमेकांच्या विरुद्ध खेळले. त्यानंतर आता 13 वर्षांनी क्रिकेट विश्वातील बेस्ट टीम कोण याचा फैसला या दोन कॅप्टनमधील लढतीमध्ये होणार आहे.
सरासरीत कोण सरस?
विराट आणि केन हे दोघंही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे तीन्ही फॉरमॅट आणि आयपीएलमध्ये खेळतात. या सर्व प्रकारत ते अव्वल बॅट्सन तसेच त्यांच्या टीमचे कॅप्टनही आहेत. या लेखात आपण त्यांच्या आजवरच्या* टेस्ट करियरची तुलना करण्यात आली आहे.
विराट कोहलीनं 91 टेस्टमध्ये 52.37 च्या सरासरीनं 7490 रन केले आहेत. तर केन विल्यमसननं 84 टेस्टमध्ये 53.60 च्या सरासरीनं 7129 रन केले आहेत. विराटनं टेस्टमध्ये 27 तर केननं 24 सेंच्युरी झळकावल्या आहेत.
नाव | टेस्ट | सरासरी | रन्स |
विराट कोहली | 91 | 52.37 | 7490 |
केन विल्यमसन | 84 | 53.60 | 7129 |
घरच्या मैदानात कुणाची आघाडी?
विराट कोहलीनं घरच्या मैदानावर 43 टेस्टमध्ये 64.31 च्या सरासरीनं 3730 रन काढले आहेत. यामध्ये 13 सेंच्युरींचा समावेश आहे. तर केन विल्यमसननं (Fire vs Ice) 41 टेस्टमध्ये 65.31 च्या सरासरीनं 3788 रन काढले आहेत. केननं 24 पैकी 13 सेंच्युरी न्यूझीलंडमध्ये झळकावल्या आहेत.
नाव | टेस्ट | सरासरी | रन्स | सेंच्युरी |
विराट कोहली | 43 | 64.31 | 3730 | 13 |
केन विल्यमसन | 41 | 65.31 | 3788 | 13 |
विदेशात कोण आहे सरस?
विराट कोहलीनं विदेशातील 48 टेस्टमध्ये 44.23 च्या सरासरीनं 3760 रन काढलेत. विशेष म्हणजे विराटनं घरच्या मैदानापेक्षा एक जास्त म्हणजे 14 सेंच्युरी घराबाहेर झळकावल्या आहेत.
कुणाची आकडेवारी आहे सरस, विराट कोहली की जो रुट?
केन विल्यमसन गेल्या काही महिन्यापासून फॉर्मात आहे. विल्यमसननं विदेशातील 43 टेस्टमध्ये 41.68 च्या सरासरीनं 3335 रन काढले आहेत. यामध्ये 11 सेंच्युरींचा समावेश आहे. विल्यमसनच्या विदेशातील 11 पैकी 2 सेंच्युरी या तटस्थ मैदानात आल्या आहेत. विराट तटस्थ मैदानात आजवर एकही टेस्ट खेळलेला नाही.
नाव | टेस्ट | सरासरी | रन्स | सेंच्युरी |
विराट कोहली | 48 | 44.23 | 3760 | 14 |
केन विल्यमसन | 43 | 41.68 | 3335 | 11 |
एकमेकांच्या देशाविरुद्ध योगदान
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. त्यामुळे विराट आणि केन (Fire vs Ice) यांचा एकमेकांच्या देशांविरुद्धचा टेस्ट रेकॉर्ड कसा आहे हे देखील पाहिलं पाहिजे.
विराट न्यूझीलंड विरुद्ध आजवर 9 टेस्ट खेळला असून या टेस्टमध्ये त्याने 51.53 च्या सरासरीनं 773 रन केले आहेत. यामध्ये 3 सेंच्युरींचा समावेश आहे. केन भारताविरुद्ध 11 टेस्ट खेळला आहे. यामध्ये त्यानं 2 सेंच्युरी आणि 36.40 च्या सरासरीनं 728 रन काढले आहेत. टेस्ट खेळणाऱ्या देशांमध्ये केन विल्यमसनची सर्वात कमी सरासरी भारताविरुद्ध आहे.
नाव | टेस्ट | सरासरी | रन्स | सेंच्युरी |
विराट कोहली | 9 | 51.53 | 773 | 3 |
केन विल्यमसन | 11 | 34.60 | 728 | 2 |
विजयामधील योगदान
विराटनं आजवर खेळलेल्या 91 पैकी 47 टेस्ट भारतानं जिंकल्या आहेत. या 47 टेस्टमध्ये विराटनं 58.25 च्या सरासरीनं 3961 रन केले आहेत. यामध्ये 13 सेंच्युरींचा समावेश आहे.
WTC Final : फायनल मॅच ड्रॉ किंवा टाय झाली तर, विजेता कोण? ICC चा नियम जाहीर
केन विल्यमसनच्या 84 पैकी 36 टेस्ट न्यूझीलंडनं जिंकल्या असून यामध्ये त्याने 15 सेंच्युरीसह 78.29 च्या सरासरीनं 3993 रन केले आहेत.
नाव | टेस्ट | सरासरी | रन्स | सेंच्युरी |
विराट कोहली | 47 | 58.25 | 3961 | 13 |
केन विल्यमसन | 36 | 78.29 | 3993 | 15 |
कॅप्टन म्हणून कुणाचं वर्चस्व?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल ही दोन कॅप्टनमधील (Fire vs Ice) लढाई आहे. विराटच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियानं 60 पैकी 36 टेस्ट जिंकल्या असून 14 टेस्ट गमावल्या आहेत.तर 10 टेस्ट ड्रॉ केल्या आहेत. तर केन विल्यमसनच्या कॅप्टनसीमध्ये न्यूझीलंडनं 36 पैकी 21 टेस्ट जिंकल्या आहेत.
नाव | टेस्ट | विजयी | पराभूत | ड्रॉ | सरासरी |
विराट कोहली | 60 | 36 | 14 | 10 | 60 |
केन विल्यमसन | 36 | 21 | 8 | 7 | 58.33 |
*लेखातील सर्व आकडेवारी ही 14-6-2021पर्यंतची आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.