
भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल (WTC Final 2021) आता सहाव्या दिवशी (6 Day Test) देखील खेळवली जाणार आहे. फायनलमध्ये पावसाचा किंवा हवामानाचा अडथळा आला तर सहावा दिवस रिझर्व ठेवण्यात आल्याची घोषणा आयसीसीनं यापूर्वी केली होती. या मॅचमधील दोन दिवस पावसात वाहून गेले. उर्वरित दिवशी देखील पावसाचा फटका बसला. त्यामुळे आता सहाव्या दिवशी देखील होईल. टीम इंडियानं सहा दिवस टेस्ट खेळण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी देखील तीन प्रमुख वेळा भारतीय टीमनं 6 दिवस टेस्ट खेळली आहे.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, मुंबई 1975
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium, Mumbai) झालेली पहिली टेस्ट मॅच. ही टेस्ट मॅच 23 ते 29 जानेवारी 1975 दरम्यान (6 Day Test) झाली. सात दिवसांच्या या वेळापत्रकात 26 जानेवारीचा चौथा दिवस विश्रांतीचा दिवस होता. क्लाईव्ह लॉईडच्या (Clive Lloyd) वेस्ट इंडिज टीमनं पहिल्यांदा बॅटींग करत 6 आऊट 604 अशा विशाल स्कोअरवर पहिली इनिंग घोषित केली. वेस्ट इंडिजकडून कॅप्टन लॉईडनं सर्वात जास्त नाबाद 242 रन काढले.
या मोठ्या स्कोअरचा पाठलाग करताना भारताकडून एकनाथ सोलकर (Eknath Solkar) यांनी सर्वाधिक 102 रन काढले. गुंडप्पा विश्वनाथ (95), सुनील गावसकर (86) आणि अंशुमन गायकवाड (51) यांनी अर्धशतक झळकावले. भारतीय टीम पहिल्या इनिंगमध्ये 406 रनवर ऑल आऊट झाली.
वेस्ट इंडिजला पहिल्या इनिंगमध्ये 198 रनची आघाडी मिळाली होती. त्यांनी दुसरी इनिंग 3 आऊट 205 रनवर घोषित केली. दुसऱ्या इनिंगमध्ये गॉर्डन ग्रिनिचनं 54 तर व्हिव रिचर्डनं 39 रनचे योगदान दिले.
टीम इंडियाला वानखेडे स्टेडियमवरील पहिली टेस्ट जिंकण्यासाठी 404 रनचे टार्गेच होते. चौथ्या इनिंगमध्ये टीम इंडिया 202 रनवर ऑल आऊट झाली. वेस्ट इंडिजने ती टेस्ट 201 रननं जिंकली. भारताकडून त्या इनिंगमध्ये ब्रिजेश पटेल यांनी सर्वाधिक नाबाद 73 रन काढले. तर व्हॅनबर्न होल्डर यांनी 6 विकेट्स घेतल्या.
Explained: मोहम्मद शमी कसा बनला टीम इंडियाच्या फास्ट बॉलिंगचा ट्रम्प कार्ड
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, अॅडलेड 1978
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 1978 साली यांच्यात 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 1978 (एक दिवस विश्रांती) साली सहा दिवस टेस्ट (6 Day Test) झाली. त्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदा बॅटींग करत ग्रॅहम यॅलोप (103) आणि कॅप्टन बॉब सिप्सन (100) यांच्या सेंच्युरीच्या जोरावर 505 रन काढले. टीम इंडियाला त्याला उत्तर देताना 269 पर्यंतच मजल मारता आली. भारताकडून गुंडप्पा विश्वानाथ (Gundappa Viswanth) यांनी सर्वाधिक 89 रन काढले.
ऑस्ट्रेलियाला पहिल्या इनिंगमध्ये 236 रनची आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या इनिंगमध्ये 256 रन काढले. टीम इंडियासमोर टेस्ट जिंकण्यासाठी 493 रनचे टार्गेट होते. भारताने दुसऱ्या इनिंगमध्ये जोरदार प्रतिकार केला. भारताकडून मोहिंदर अमरनाथ, गुंडप्पा विश्वनाथ आणि दिलीप वेंगसरकर यांनी अर्धशतक झळकावले. तरी भारताचा हा प्रतिकार 48 रनने कमी पडला.
गांगुलीची ऐतिहासिक सेंच्युरी, द्रविडनं टेस्ट क्रिकेटमध्ये खेळला पहिला बॉल
निराश होण्याची गरज नाही
टीम इंडियाने यापूर्वी दोनदा झालेली 6 दिवसांची टेस्ट गमावली आहे. हा रेकॉर्ड वाचून भारतीय फॅन्सनं निराश होण्याची गरज नाही. सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांच्या पदार्पणातील सीरिजमधील वेस्ट इंडिज विरुद्धची शेवटची टेस्ट देखील सहा दिवस झाली होती.
गावसकर यांनी त्या टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये सेंच्युरी तर दुसऱ्या इनिंगमध्ये डबल सेंच्युरी (124 आणि 220) झळकावली. त्या खेळीमुळे भारताने ती टेस्ट ड्रॉ केली आणि वेस्ट इंडिजमध्ये प्रथमच टेस्ट सीरिज जिंकण्याचा इतिहास रचला. आता पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशिपच्या फायनलमध्ये झालेल्या 6 दिवसांच्या टेस्टमध्ये (6 Day Test) इतिहास रचण्याची संधी टीम इंडियाला आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.