
टीम इंडियाच्या आजवरच्या इतिहासातील चौथा यशस्वी बॉलर आर. अश्विन (Ravichandran Ashwin) याने त्याच्या क्रिकेट करियरबद्दल महत्त्वाचे वक्तव्य (Ashwin On Cricket) केले आहे. अश्विन सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल (World Test Championship Final 2021) खेळतोय. त्याने यापूर्वी इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये 400 विकेट्सचा टप्पा पूर्ण केला. टेस्ट क्रिकेटमध्ये हा टप्पा पूर्ण करणारा अश्विन हा कपिल देव, अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांच्यानंतरचा चौथा भारतीय आहे. त्याचबरोबर अश्विननं टेस्टमध्ये 5 सेंच्युरी देखील झळकावल्या आहेत.
सध्याच्या टीम इंडियामधील सर्वात यशस्वी बॉलर आणि लोअर ऑर्डरमधील उपयुक्त बॅट्समन असलेल्या अश्विनला त्याच्या टीममधील जागेसाठी वारंवार संघर्ष करावा लागला आहे. अश्विननं वेगवेगळ्या कसोट्यांवर स्वत:ला सिद्ध केलंय. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अश्विनचा झुंजार खेळ सर्वांनी पाहिला आहे. सध्या सुरू असलेल्या इंग्लंड दौऱ्यातही त्याच्याकडून भारतीय फॅन्सना मोठ्या अपेक्षा आहेत.
‘….तसं झालं तर क्रिकेट सोडेन‘
भारतीय टीममध्ये सध्या स्पिन बॉलर्सच्या जागेसाठी मोठी स्पर्धा आहे. रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल हे खेळाडू टेस्ट क्रिकेटमधील जागेसाठी स्पर्धेत आहेत. अश्विनला याची चिंता नाही. उलट या स्पर्धेमुळेच सर्वश्रेष्ठ कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते, असे अश्विनने सांगितले. ज्या दिवशी स्वत:मध्ये सुधारणा करण्याची इच्छा कमी होईल. त्या दिवशी क्रिकेट खेळणे सोडून देईन, असे अश्विनने स्पष्ट केले. आयसीसीने (ICC) अश्विनचा एका व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये अश्विननं हे मत व्यक्त केले आहे.
एक विचारी क्रिकेटपटू अशी अश्विनची ओळख आहे. सतत काही तरी नवीन करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. ज्याचा त्याला आजवर फायदा झाला आहे. अश्विननं याबाबत सांगितले की, “टेस्ट क्रिकेटची ही खासियत आहे. तुम्ही यामध्ये नेहमी बेस्ट होण्याचा प्रयत्न करता. मी आजवर करियरमध्ये कधीही तडजोड केली नाही. सतत सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यावेळी काही नवं करण्याचं माझं धाडस होणार नाही. जे आहे त्यामध्ये मला समाधान वाटेल त्या दिवसापासून मी क्रिकेट खेळू (Ashwin On Cricket) शकणार नाही.”
‘त्यांचा फार विचार करत नाही’
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) याने काही दिवसांपूर्वी अश्विनवर टीका केली होती. टीकाकारांच्या मताचा आपण फार विचार करत नसल्याचे अश्विनने यावेळी स्पष्ट केले.
जडेजानंतर अश्विनवर घसरला मांजरेकर, कारकिर्दीवर उपस्थित केला गंभीर प्रश्न
“मी माझ्या खेळाबद्दल इतरांची मत वाचत नाही. मी इतरांना समाधानी करण्यासाठी त्यांनी चांगलं म्हणावं यासाठी प्रयत्न करु लागलो तर माझं आयुष्य त्यामध्येच जाईल. माझं काम करणे आणि त्या कामातून माझं घर चालवणे हे माझे प्राधान्य आहे. या कामाचे मला चांगले पैसे मिळतात.
या खेळानं मला जगण्याचा उद्देश (Ashwin On Cricket) दिला आहे. इतर व्यक्ती माझ्याबद्दल काय विचार करतात. माझं रेटिंग काय करतात याचा मी विचार करत नाही. ते त्यांचं मत आहे. मला माझ्या पद्धतीनं आयुष्य जगायचं आहे.” असे अश्विनने सांगितले.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.