
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship 2021) स्पर्धा कोण जिंकणार याबाबत सध्या अनेक जण अंदाज व्यक्त करत आहेत. इंग्लंड विरुद्धची (New Zealand vs England) टेस्ट सीरिज जिंकल्याने काही जणांनी न्यूझीलंडचं पारडं जड असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. असं असलं तरी टीम इंडियामध्येही प्रत्येक जण मॅचविनर आहे, हे केन विल्यमसन देखील मान्य करेल. या फायनलच्या निमित्तानं भारतविरोधी गरळ ओकण्याचं काम एका ऑस्ट्रेलियन पत्रकारानं केलं आहे. त्याला टीम इंडियाचा फास्ट बॉलर व्यंकटेश प्रसाद यानं चोख उत्तर देत (Venkatesh Prasad Slams Journalist) त्याचा ‘आमिर सोहेल’ केला आहे.
काय म्हणाला पत्रकार?
ऑस्ट्रेलियन पत्रकार सीजे वेर्लेमॅन (CJ Werleman) याने फायनलमध्ये न्यूझीलंडला पाठिंबा दिला होता. हा पाठिंबा देणे ठीक. पण, त्याने तो व्यक्त करताना जी भाषा वापरली त्यामधून त्याची भारतविरोधी मळमळ दिसून येते.
‘मी फायनल मॅचमध्ये न्यूझीलंडच्या बाजूने आहे. कारण, 50 कोटी कट्टर हिंदुत्ववादी व्यक्तींना एक सेकंदही आनंदी पाहणे माझ्यासाठी त्रासदायक आहे.’ असं ट्विटर वेर्लेमॅन याने केले होते.
वेर्लेमेनच्या या ट्विटला व्यंकेटश प्रसादने भेदक उत्तर दिले आहे. ‘टेस्ट चॅम्पियनशिप कुणीही जिंकली तरी ठीक. पण याचं आयुष्य किती दयनीय आहे. या माणसाला पब्लिकेशन हाऊसमध्ये लिहायला संधी मिळाली आहे, तरीही तो खराब बोलत आहे. तू लवकर बरा हो. ’’
आमिर सोहेल करणे म्हणजे काय?
टीम इंडियाचा माजी प्रमुख बॉलर असलेला व्यंकटेश प्रसाद 1996 वर्ल्ड कपमधील (Cricket World Cup 1996) एका अविस्मरणीय बॉलसाठी ओळखला जातो. बंगळुरमध्ये झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) वर्ल्ड कप क्वार्टर फायनलमध्ये प्रसादने तो बॉल टाकला होता.
त्या मॅचमधील पाकिस्तानचा कॅप्टन आमिर सोहेलनं (Aamir Sohail) 15 व्या ओव्हरमध्ये प्रसादला फोर मारला होता. फक्त फोर मारुन थांबला नाही. तर तो बॉल ज्या दिशेनं गेला आहे, त्या दिशेला बॅट दाखवत मी पुन्हा एकदा तसाच शॉट मारणार आहे आणि तुझ्या बॉलची तिथंच जागा आहे, असं त्यानं प्रसादला डिवचलं.
सोहलची ती कृती ती मॅच पाहणाऱ्या प्रत्येकला राग आणणारी होती. प्रसादही साहजिकच संतप्त झाला होता. प्रसादनं त्याला पुढच्याच बॉलवर बोल्ड केले. आमिरच्या उद्दापणाला प्रसादनं चोख उत्तर दिले.
व्यंकटेश प्रसादनं त्याची ही भेदकता रिटायरमेंटनंतरही कायम असल्याचं या उत्तरातून (Venkatesh Prasad Slams Journalist) दाखवून दिलं आहे. त्याने सीजे वेर्लेमेनचा आमिर सोहेल केला आहे.
WTC Final 2021: विराट की विल्यमसन? 13 वर्षांच्या Fire vs Ice लढतीमध्ये कोण आहे सरस
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.