
टेस्ट क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणजेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) स्पर्धेची फायनल 18 ते 22 जून दरम्यान इंग्लंडमध्ये होत आहे. भारत आणि न्यूझीलंड (India and New Zealand) या दोन्ही देशांच्या टीमला या फायनलचे वेध लागले आहेत. टीम इंडियाचे खेळाडू मुंबईमध्ये बीसीसीआयने (BCCI) तयार केलेल्या बायो-बबलमध्ये दाखल झाले आहेत. तर, न्यूझीलंडची टीम सध्या इंग्लंडमध्ये आहे. या फायनलपूर्वी ती इंग्लंड विरुद्ध दोन टेस्ट खेळणार आहे. त्यामुळे त्यांची फायनलची तयारी होईल. पण, या टेस्ट सीरिजपेक्षा टीम इंडियाच्या एका खेळाडूने न्यूझीलंडची झोप उडवली आहे. तो खेळाडू कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) किंवा हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma) नाही. तर तो आहे विकेट किपर बॅट्समन ऋषभ पंत (Rishabh Pant). न्यूझीलंडच्या बॉलिंग कोचनेच याची कबुली (New Zealand On Pant) दिली आहे.
काय दिली कबुली?
न्यूझीलंडचे बॉलिंग कोच शेन जुर्गेन्सन (Shane Jurgensen) यांच्या मते ऋषभ पंत या मेगा फायनलमधील सर्वात धोकादायक खेळाडू ठरु शकतो. त्यामुळे ते त्यांच्या बॉलर्ससोबत पंतला टार्गेट करण्याची योजना करत आहेत.
न्यूझीलंडच्या बॉलिंग कोचने याबाबत कबुली देताना सांगितले की, “ऋषभ पंत अतिशय खतरनाक खेळाडू आहे. तो एकट्याच्या जीवावर मॅच फिरवू शकतो. आम्ही त्याला हे करताना ऑस्ट्रेलियात पाहिले आहे. त्यानंतर इंग्लंड विरुद्धच्या सीरिजमध्येही पाहिले आहे. तो सकारात्मक मानसिकतेचा खेळाडू आहे. त्यामुळे आम्हाला त्याची (New Zealand On Pant) विकेट घेण्याची प्रत्येक संधी साधली पाहिजे.
WTC फायनल जिंकण्यासाठी विराटची सर्वात मोठी भिस्त रोहित शर्मावर असेल कारण…
आमच्या बॉलर्सनी चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे. त्यांना शांत डोक्याने बॉलिंग करत पंतला अडचणीत आणण्यावर भर द्यावा लागेल. त्याला एकदा लय सापडली की त्याला आऊट करणे अवघड आहे, हे आमच्या बॉलर्सनी लक्षात ठेवावे,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
पंत यावर्षी फॉर्मात
न्यूझीलंडच्या बॉलिंग कोचना पंतची धास्ती वाटण्याचं कारण त्याचा यावर्षीचा फॉर्म आहे. 2021 हे पंतसाठी यशस्वी वर्ष ठरले आहे. त्याने यावर्षी 6 टेस्टमध्ये 64.37 च्या सरासरीने 515 रन केले आहेत. यामध्ये 1 सेंच्युरी आणि 4 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे.
‘या’ दोन जबरदस्त खेळीमुळे ऋषभ पंत ठरला पहिला ‘ICC Player of the month’
पंतच्या 97 रनच्या जोरावर टीम इंडियाने सिडनी टेस्टमध्ये पराभव टाळला. त्यानंतर त्याने नाबाद 89 रन काढत टीम इंडियाला ब्रिस्बेन टेस्टमध्ये ऐतिहासिक विजय मिळवून दिला. या खेळीबद्दल पंतचा आयसीसीने ‘प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्काराने सन्मान केला आहे. इंग्लंड विरुद्ध भारतामध्ये झालेल्या टेस्ट सीरिजमध्येही त्याने 2 हाफ सेंच्युरी आणि 1 सेंच्युरी झळकावली आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.