
भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील ऐतिहासिक वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल (WTC Final) 18 जून ते 22 जून दरम्यान होणार आहे. दोन वर्ष सुरु असलेल्या या टेस्ट सीरिजची फायनल सुरु होण्यास आता एक महिन्यापेक्षा कमी कालावधी उरला आहे. ही फायनल ड्रॉ किंवा टाय झाली तर? विजेता कोण असेल? सुपर ओव्हर होणार? 2019 च्या वर्ल्ड कप प्रमाणे फोर ज्या टीमने अधिक लगावले तो विजेता होणार? की मॅचचा निकाल लागेपर्यंत मॅच खेळवली जाणार का? या प्रश्नांवर क्रिकेट फॅन्समध्ये चर्चा सुरु होती. अखेर, आयसीसीने फायनल मॅचसाठी नियमावली (WTC Final Rule) जाहीर केली असून त्यामुळे या सर्व चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
काय आहे नियम?
फायनल मॅचचा संपूर्ण खेळ झाल्यानंतरही (पाऊस, खराब हवामान किंवा अन्य बाह्य अडथळा न येता) मॅच ड्रॉ किंवा टाय झाली तर दोन्ही टीम (भारत आणि न्यूझीलंड) संयुक्त विजेते असतील, असे आयसीसीने जाहीर केले आहे.
क्रिकेट वर्ल्ड कप 2019 (Cricket World Cup 2019) च्या फायनलच्या नियमावर झालेल्या वादानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड (England vs New Zealand) यांच्यात झालेली फायनल मॅच 100 ओव्हर्स आणि सुपर ओव्हरनंतरही टाय होती. त्यावेळी ज्या टीमने जास्त फोर लगावले त्या टीमला म्हणजेच इंग्लंडला आयसीसीने वर्ल्ड चॅम्पियन घोषित केले होते. आयसीसीच्या या नियमावर जोरदार टीका झाली होती. अखेर, त्यामधून धडा आयसीसीने या फायनलसाठी नवा नियम (WTC Final Rule) बनवला आहे.
एक दिवस राखीव
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी 23 जून हा एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. पाच दिवसाच्या खेळात काही अडथळा आला तर सहाव्या दिवशी खेळ होईल. पाच दिवसांचा खेळ कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडला आणि मॅचचा निकाल लागला नाही तर राखीव दिवसाचा वापर केला जाणार नाही. त्या परिस्थिती पाचव्या दिवसानंतरच दोन्ही टीम संयुक्त विजेते असल्याचं जाहीर केले जाईल.
विराट कोहली आयसीसीवर नाराज का आहे?
अन्य नियम
फायनल मॅच ग्रेड 1 ड्यूक बॉलने खेळवली जाईल. त्याचबरोबर बॅट्समनने शॉर्ट रन काढला आहे की नाही? याचा निर्णय मैदानावरील अंपायर नाही तर थर्ड अंपायर घेणार आहे. LBW च्या निर्णयावर थर्ड अंपायरकडे रिव्ह्यू मागण्यापूर्वी फिल्डिंग टीमचा कॅप्टन किंवा आऊट होणाऱ्या बॅट्समनला मैदानावरील अंपायरला बॅट्समनने बॉल खेळण्याचा प्रयत्न केला होता का? हे विचारता येईल. त्याचबरोबर LBW च्या निर्णयाबाबत स्टम्पवर आदळणाऱ्या बॉलची उंची आणि लांबी या आधारावर अंपायर्स कॉलचा निर्णय घेण्यात (WTC Final Rule) येणार आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.