टीम इंडियाचा सिक्सर किंग म्हणजे युवराज सिंह (Yuvraj Singh). युवराज म्हणजे स्टुअर्ट ब्रॉडला (Stuart Broad) मारलेले सलग 6 सिक्स. युवराज म्हणजे त्यानं बॅटनं बॉल मारला की, संपूर्ण मैदानात घुमणारा ‘टॉsssssक’ असा कडक आवाज. युवराज म्हणजे चपळ फिल्डर. युवराज म्हणजे तब्येत बरी नसताना चेन्नईत झळकावलेली सेंच्युरी. युवराज म्हणजे टीम इंडियाला एक नाही दोन नाही तर तीन वर्ल्ड कप जिंकून देणारा चॅम्पियन आणि युवराज म्हणजे कॅन्सरवर मात करत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा जिगरबाज. युवराज दोन वर्षांपूर्वी रिटायर झाला असला तरी सोशल मीडियावर (Social Media) सक्रीय आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल म्हणजेच आयसीसीने (ICC) ट्विटरवर विचारलेल्या एका प्रश्नाला युवराजनं दिलेलं उत्तर (Yuvraj Singh Answer) वाचून तुम्हाला नक्की हळहळ वाटेल.

काय होता आयसीसीचा प्रश्न?

आयसीसी ट्विटरवर क्रिकेट फॅन्सना सक्रीय ठेवण्यासाठी नेहमी काही तरी आयडिया करत असते. त्यांनी नुकताच भारतीय क्रिकेटपटूंबद्दल एक प्रश्न विचारला होता. त्याला युवराज सिंहनं उत्तर दिले. त्याचे हे उत्तर प्रश्नापेक्षा जास्त लक्षवेधी बनले आहे.

कोणत्या माजी भारतीय क्रिकेटपटूने जास्त टेस्ट मॅच खेळायला हव्या होत्या, अशी तुमची इच्छा होती? असा प्रश्न आयसीसीने त्यांच्या ट्विटर हँडलवर विचारला होता. त्या प्रश्नावर स्वाभाविकच अनेक फॅन्सनी युवराज सिंह असे उत्तर दिले. त्यावर युवराज सिंहने देखील उत्तर (Yuvraj Singh Answer) दिले आहे.

Dhoni finishes off in style! आणि भारत पुन्हा वर्ल्ड चॅम्पियन

काय म्हणाला युवराज?

युवराज सिंहनं 17 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय करियरमध्ये अनेक लक्षात ठेवणाऱ्या खेळी केल्या. बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या सर्वांनी त्याने मैदान गाजवले. त्याच्या या अविस्मरणीय खेळीच्या बहुतेक आठवणी या वन-डे किंवा T20 शी संबंधित आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये चेन्नईत इंग्लंड विरुद्धच्या टेस्टमध्ये सचिनसोबतची त्याची पार्टरनशिप ही टेस्टमधील सर्वात ठळक आठवण आहे.

युवराजसारखा खेळाडू टेस्ट क्रिकेट जास्त का खेळला नाही? हा प्रश्न आजही अनेकांना सतावतो. या प्रश्नावर युवराजला काय वाटतं? हा देखील अनेकांच्या मनातील प्रश्न आहे. युवराजनं आयसीसीच्या ट्विटरवर दिलेलं उत्तर (Yuvraj Singh Answer) कदाचित त्याच्या मनातील गोष्ट सांगणारे आहे. ‘कदाचित पुढच्या जन्मी असा योग येईल. त्यावेळी मी 7 वर्षे 12 वा खेळाडू नसेल.’ असे उत्तर युवराजने दिले आहे.

युवराजची टेस्ट कारकिर्द

युवराजने 17 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये फक्त 40 टेस्ट खेळल्या आहेत. यामध्ये त्याने 33.92 च्या सरासरीनं 1900 रन काढले आहेत. युवराजनं 3 सेंच्युरी आणि 11 हाफ सेंच्युरी झळकावल्या असून 169 हा त्याचा सर्वोच्च आहे. युवराजच्या फर्स्ट क्लास क्रिकेटचा रेकॉर्ड पाहिला तर त्याने 139 मॅचमध्ये 44.16 च्या सरासरीनं 8965 रन काढले आहेत. यामध्ये 26 सेंच्युरी आणि 36 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. 260 हा युवराजच्या फर्स्ट क्लास क्रिकेटमधील सर्वोच्च स्कोअर आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: