फोटो – सोशल मीडिया

भारतीय क्रिकेट टीमला (Team India) टी 20 वर्ल्ड कप (T 20 World Cup 2007 ) आणि क्रिकेट वर्ल्ड कप (ICC Cricket World Cup 2011) जिंकून देण्यात मोठी भूमिका बजावणारा खेळाडू म्हणजे युवराज सिंह (Yuvraj Singh). आयसीसी (ICC) वर्ल्ड कपमधील सात फायनल खेळणारा युवराज हा एकमेव खेळाडू आहे. युवराजचा नुकताच वाढदिवस झाला. त्यावेळी सर्वांनीच सोशल मीडियावर लाडक्या युवीच्या आठवणींना उजाळा दिला.

युवराज सिंह रंगात आला की मैदानात त्याच्या बॅटमधून ‘टॉक’ या खणखणीत या जादूई आवाजानं क्रिकेट मॅच पाहणाऱ्या प्रत्येकाच्या अंगावर शहारा येत असे. युवराजने 2007 च्या वर्ल्ड कपमध्ये स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच ओव्हरमध्ये सहा सिक्सर मारले होते. त्यामुळे त्याचं ‘सिक्सर किंग’ असंही नाव आहे.

( वाचा : महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2022 : वाचा भारतीय टीमचं संपूर्ण वेळापत्रक )

कमबॅकसाठी सज्ज!

युवराज मागच्या वर्षी क्रिकेटमधून रिटायर झाला होता.  आता वर्षभरानंतर तो पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धेत ( Syed Mushtaq Ali Trophy) स्पर्धेतून युवराज पुन्हा खेळणार आहे. जानेवारी महिन्यात ही स्पर्धा होणार आहे. पंजाब क्रिकेट असोसिएशननं (PCA) युवराजला पुन्हा खेळण्याची विनंती केली होती. घरच्या टीमच्या या विनंतीचा त्यानं मान राखला आहे. पंजाबने संभाव्य 30 खेळाडूंची यादी जाहीर केली असून त्यामध्ये युवराजचा समावेश आहे.

( वाचा : पार्थिव पटेल : 17 व्या वर्षी पदार्पण, आयपीएल टीमचा प्रवासी आणि गुजरातचा गौरव! )

युवराज सिंह गेल्या काही दिवसांपासून पीसीएच्या स्टेडियमवर जोरदार सराव करत आहे. त्याचा व्हिडीओ देखील त्यानं नुकताच इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केला आहे.

युवराज सिंहनं रिटायरमेंटनंतर कॅनडामधल्या ग्लोबल टी 20 लीगमध्ये भाग घेतला होता. आता भारतीय क्रिकेट स्पर्धेत त्याच्या बॅटची जादू पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धा ही 10 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान होणार आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना बायो बबलच्या नियमांचं पालन करावं लागेल. आयपीएल स्पर्धेच्या चौदाव्या सिझनसाठी फेब्रुवारीत लिलाव होण्याची  शक्यता आहे, त्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा अनेक भारतीय क्रिकेटपटूंसाठी मोठी महत्वाची आहे.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: