फोटो – इन्स्टाग्राम /Dhanashree9

टीम इंडियाचा (Team India) स्पिनर युझवेंद्र चहलचं (Yuzvendra Chahal) लग्न झाले आहे. धनश्री वर्मा (Dhanashree Verma) असं चहलच्या बायकोचं नाव आहे. धनश्री ही कोरिओग्राफर असून युट्यूब (YouTube) स्टार देखील आहे. या दोघांचा आयपीएलपूर्वी (IPL 2020) ऑगस्ट महिन्यात साखरपुडा झाला होता. त्यांनी या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून त्यावर लाईक आणि प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.

गुरुग्राममध्ये हे लग्न झाले. यावेळी धनश्रीनं मरुन रंगाचा लेहंगा घातला होता. तर चहलने शेरवानी आणि मरुन रंगाचा फेटा असा ड्रेस घातला होता.

Once upon a Time …

चहलनं या फोटच्या कॅप्शनची त्यांच्या एकत्र येण्याची गोष्टच सांगितली आहे. ‘आम्ही Once Upon a time एकत्र सुरुवात केली आणि आता आम्ही खूप आनंदी आहोत. धनश्रीनं युझवेंद्रला नेहमीसाठी होय म्हंटले आहे,’  असे सांगत चहलनं त्यांच्या आयुष्याचा आनंदी क्षण सर्वांशी शेअर केला आहे.

कोण आहे धनश्री?

धनश्री वर्मा ही कोरिओग्राफ आहे. तसेच ती युट्यूबरही लोकप्रिय आहे. यंदा युएईमध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेच्या दरम्यानही ती चहलसोबत होती. दरम्यान, बीसीसाआयने देखील ट्विट करत नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: