फोटो – ट्विटर/ICC

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात झालेली तिसरी टेस्ट दोन दिवसांमध्ये संपली. त्यानंतर गेली पाच दिवस सतत अहमदाबादमधील पिचवर ओरडणाऱ्या मंडळींमध्ये वाढ होत आहे. इंग्लंड प्रमाणेच पाकिस्तानचे खेळाडू देखील यामध्ये हात धूवून घेत आहेत. आता या मंडळींना ओरडण्यासाठी आणखी एक टेस्ट मॅच मिळाली आहे. पण ही टेस्ट भारतामध्ये नाही तर भारताच्या बाहेर झाली आहे. झिम्बाब्वे विरुद्ध अफगाणिस्तान (ZIM vs AFG) यांच्यात अबुधाबीमध्ये झालेली टेस्ट मॅच अवघ्या दोन दिवसांमध्येच संपली आहे.

मॅचमध्ये काय झालं?

आबुधाबी टेस्टच्या पहिल्या दिवशी अफगाणिस्तानचा कॅप्टन असगर अफगाण (Asgar Afgan) यानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा अफगाणिस्तानला फायदा उठवता आला नाही. त्यांची संपूर्ण टीम 131 रन काढून ऑल आऊट झाली.

आबुधाबीच्या मैदानावर आजवर झालेल्या टेस्ट मॅचमध्ये पहिल्या इनिंगमधील निचांकी स्कोर अफगाणिस्ताननं नोंदवला. यापूर्वी हा रेकॉर्ड न्यूझीलंडच्या नावावर होता. न्यूझीलंडनं पाकिस्तान विरुद्धच्या टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये 153 रनच काढले होते.

( वाचा : खेळता येईना पिच वाकडे : जरा ‘या’ महान पिचवरील रेकॉर्ड्सही पाहा )

झिम्बाब्वेच्या कॅप्टनची खेळी

अफगाणिस्तानचा मुख्य स्पिन राशिद खान (Rashid Khan) ही टेस्ट दुखापतीमुळे खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीचा फायदा झिम्बाब्वेनं उचलला. झिम्बाब्वेनं पहिल्या इनिंगध्ये 250 रन काढले. झिम्बाब्वेचा कॅप्टन सीन विल्यम्सची (Sean Willams) सेंच्युरी हे या इनिंगचं मुख्य वैशिष्ट्य ठरलं.

बॅटींगला अवघड ठरणाऱ्या या पिचवर विल्यमसनं 174 बॉलमध्ये 10 फोरच्या मदतीनं 105 रन काढले. विल्यम्सची ही एकूण तिसरी तर कॅप्टन झाल्यापासूनची दुसरी टेस्ट सेंच्युरी आहे. झिम्बाब्वेच्या विल्यम्स सोडून फक्त चार बॅट्समनला दोन आकडी रन काढता आले.

19 वर्षाच्या बॅट्समनचा संघर्ष

अफगाणिस्तान पहिल्या इनिंगमध्ये 119 रननं पिछाडीवर होत्या. टेस्ट मॅचच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना पुन्हा एकदा बॅटिंगला उतरावे लागले होते. दुसऱ्या इनिंगमध्येही त्यांची अवस्था 6 आऊट 47 अशी झाली होती. पण तिसरीच टेस्ट खेळणाऱ्या 19 वर्षांच्या इब्राहिम झरदान (Ibrahim Zardan) यानं अफगाणिस्तानचा डावाचा पराभव टाळला. झरदाननं एकाकी लढत देत 145 बॉलमध्ये 76 रन काढले. त्याच्या हाफ सेंच्युरीच्या जोरावर झिम्बाब्वेनं दुसऱ्या इनिंगमध्ये 16 रनची अल्पशी आघाडी घेतली.

झिम्बाब्वेनं विजयासाठी आवश्यक असलेलं 17 रनचं आव्हान 3.2 ओव्हर्समध्येच पूर्ण करत मॅच (ZIM vs AFG जिंकली. पहिल्या इनिंगमध्ये सेंच्युरी मारणाऱ्या सिन विल्यमसला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.

( वाचा : इंग्लंडमध्येही दोन दिवसांमध्ये मॅच संपल्या आहेत, जोफ्रा आर्चरचा घरचा आहेर )

दुसरी नाही 23 वी टेस्ट!

टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात 132 वर्षांनी सलग दोन टेस्ट दोन दिवसांच्या आत संपण्याच्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. टेस्ट क्रिकेटच्या आजवरच्या इतिहासातील दोन दिवसांमध्ये संपलेली ही अहमदाबाद नंतरची दुसरीच टेस्ट नाही तर एकूण 23 वी टेस्ट आहे. एकविसाव्या शतकामध्ये दोन दिवसांमध्ये संपलेली ही आठवी टेस्ट आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading