फोटो – ट्विटर

ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिचेल स्टार्कसाठी (Mitchell Starc) हा वाढदिवस खास आहे. वाढदिवसाच्या एक दिवस आधी त्याला प्रतिष्ठेचं अ‍ॅलन बॉर्डर मेडल (Allan Border Medal) जाहीर झाले. स्टार्कसाठी मागील वर्ष अतिशय त्रासदायक ठरलं. त्यानं मैदानात आणि मैदानाच्या बाहेर दोन्ही ठिकाणी संघर्ष केला. या काळात त्याच्या मनात क्रिकेट सोडण्याचे विचार (Mitchell Starc on Cricket) आले होते.

कसोटीचे वर्ष

स्टार्कनं बॉर्डर पुरस्कार जिंकल्यानंतर ‘फॉक्स स्टार डॉट कॉम’शी बोलताना त्याच्या भावना बोलून दाखवल्या आहेत. ‘माझ्यासाठी मागचे वर्ष मैदानात आणि मैदानाच्या बाहेर अतिशय अवघड होते. मी मला हवं तसं क्रिकेट खेळत नव्हतो. एकवेळ अशी आली होती की, मला अजिबात क्रिकेट खेळावं वाटत नव्हतं.’ असं स्टार्कनं सांगितलं.

स्टार्कला असं वाटण्याला आधार आहे. भारताविरूद्ध झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये स्टार्कनं 40.72 च्या सरासरीनं 11 विकेट्स घेतल्या होत्या. तसंच T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये त्यानं 4 ओव्हर्समध्ये 60 रन दिले होते. त्याचवेळी त्याच्या वडिलांची कॅन्सरशी झूंज सुरू होती. मैदानातील पिछेहाटीनंतरही स्टार्कनं क्रिकेट खेळणे कायम ठेवले आणि त्याची कामगिरी सुधारली. पण, त्यानं मागच्या वर्षात वडिलांना गमावले.

जोरदार कमबॅक

अ‍ॅशेस सीरिज सुरू होण्यापूर्वी स्टार्कच्या टीममधील जागेवर प्रश्न उपस्थित झाला होता. माजी क्रिकेटपटू शेन वॉर्ननं (Shane Warne) स्टार्कवर जोरदार टीका केली होती. स्टार्कनं सर्व टीकाकारांना मैदानात उत्तर (Mitchell Starc on Cricket) दिले. त्याने अ‍ॅशेस सीरिजमध्ये 25.36 च्या सरासरीनं 19 विकेट्स घेतल्या. स्टार्कने अ‍ॅशेस सीरिजमधील पहिल्याच बॉलवर रॉरी बर्न्सला आऊट करत संपूर्ण सीरिजची दिशा स्पष्ट केली होती.

स्टार्कनं 2021 या कॅलेंडर वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 43 विकेट्स मिळवल्या. त्याने बॉर्डर पुरस्कार मिळवताना ऑल राऊंडर मिचेल मार्शवर (Mitchell Marsh) फक्त 1 मतांनी विजय मिळवला. ग्लेन मॅकग्रा, ब्रेट ली, मिचेल जॉन्सन आणि पॅट कमिन्स यांच्यानंतर बॉर्डर पुरस्कार मिळवणारा तो पाचवा फास्ट बॉलर आहे.

शेन वॉर्नला उत्तर

मिचेल स्टार्कनं या पुरस्कारानंतर शेन वॉर्नच्या टीकेला देखील उत्तर दिले आहे. ‘मी त्याच्याबद्दल (वॉर्न) काय बोलावं असं तुम्हाला अपेक्षित आहे. मला त्यात काहीही रस नाही. तो त्याला हवं ते मत मांडू शकतो. मला माझ्या पद्धतीनं क्रिकेट खेळायचं आहे. माझे कुटुंब, माझे सपोर्ट नेटवर्क आणि माझे चांगले मित्र माझ्यासोबत आहेत. मी त्यांच्यासोबत एकदम मजेत आहे.’ असे स्टार्कने स्पष्ट (Mitchell Starc on Cricket) केले.

ऑस्ट्रेलियन दिग्गज, शेन वॉर्नला पुन्हा खोटं ठरवणार का?

मिचेल स्टार्कला यंदा वन-डे क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार देखील मिळाला आहे. विशेष म्हणजे स्टार्कची पत्नी आणि ऑस्ट्रेलियाची विकेट किपर बॅटर ही देखील महिला क्रिकेटपटूंच्या गटातील ‘वन-डे क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्काराची मानकरी ठरली आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Exit mobile version
%%footer%%