फोटो – ट्विटर

बांगलादेश क्रिकेट हे नेहमीच वादग्रस्त कारणामुळे गाजत असते. त्यांचा सर्वात अनुभवी आणि यशस्वी क्रिकेटपटू असलेल्या शाकिब अल हसनचा (Shakib Al Hasan) या प्रकारच्या घटनांचा इतिहास आहे. मैदानावर नागिण डान्स करत स्वत:बद्दल फॅन्सच्या मनात चीड निर्माण करणारी टीम म्हणूनही बांगलादेशची ओळख आहे. बांगलादेश प्रीमियर लीग (BPL 2022) सध्या सुरू आहे. या प्रीमियर लीगमधील एका टीमचा कॅप्टन महेदी हसन मिराज (Mehidy Hasan Captaincy Controversy) या कॅप्टनसीवरून हटवल्यानं नवा वाद सुरू झाला आहे.

नेमके काय घडले?

बांगलादेशचा ऑल राऊंडर मेहदी हसन मिराज हा चट्रोग्राम चॅलेंजर्स (Chattogram Challengers) टीमचा कॅप्टन होता. त्याच्या टीमची शनिवारी 29 जानेवारी रोजी सिल्हेट सनरायझर्स विरूद्ध मॅच होणार होती. या मॅचपूर्वी टीममध्ये मोठे बदल झाले. टीमच्या कॅप्टनसीवरून मेहदी हसनला काढण्यात आले. नईम इस्लाम नवा कॅप्टन झाला. इतकंच नाही तर टीमचे कोच पॉल निक्सन तडकाफडकी टीमला सोडून इंग्लंडमध्ये निघून गेले.

निक्सन यांनी इंग्लंडला जाण्यापूर्वी मेहदीला कॅप्टनपदावरून हटवण्याची सूचना केली, असा दावा फ्रँचायझीच्या अधिकाऱ्यानं केला आहे. मेहदीने हा दावा फेटाळून लावला आहे.

या संपूर्ण प्रकरणाला फ्रँचायझीचे मुख्य कार्यकारी अधिकीरी (CEO) यासिर आलम जबाबदार असल्याचा आरोप मेहदीने केला आहे. त्याने आलम खोटं बोलत असल्याचा आरोप (Mehidy Hasan Captaincy Controversy) केला.

बांगलादेशचा ऑल राऊंडर शाकिब अल हसन वादग्रस्त कारणासाठी प्रसिद्ध आहे.

घरी निघाला होता पण…

मॅच सुरू होण्याच्या तीन तास आधी कॅप्टनपदारून हकालपट्टी झाल्याने मेहदी हसन चांगलाच संतापला होता. त्याने रविवारी (30 जानेवारी) टीमचे हॉटेल सोडून घरी जाण्याचा निर्णय घेतला मेहदी ढाक्याला जाण्यासाठी रवाना झाला होता. त्यावेळी बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निजामुद्दीन चौधरी यांनी त्याचे मन वळवले. त्याला हॉटेलमध्ये परत जाण्यास भाग पाडले.

मेहदी हसन हॉटेलमध्ये परतला, पण त्याचा राग शांत झाला नव्हता आपल्याला मॅच सुरू होण्याच्या 3 तासआधी कॅप्टनपदावरून काढल्याचे सांगण्यात आले. हा खेळाडू म्हणून अपमान आहे. या सर्व अपामानासाठी फ्रँचायझीचे सीईओ यासिर आलाम जबाबदार असल्याचा आरोप त्याने केला.

2 वर्षांनी हिशोब चुकता, बांगलादेशला पराभूत करत भारताची सेमी फायनलमध्ये धडक

…तोपर्यंत खेळण्यास नकार

बांगलादेशचा ऑल राऊंडर असलेल्या मेहदी हसनने यासिर आलमवर खोटं बोलत असल्याचा आरोप केला आहे. माझ्या हकालपट्टीबाबत त्यांनी दिलेलं कारण खोटं आहे. माझी कोचशी अर्धा तास चर्चा झाल्याचा दावा त्याने केला आहे.

यासिर इथे असेपर्यंत या फ्रँचायझीकडून खेळणार नाही. ते गेल्यानंतरच मी खेळेल असंही त्याने जाहीर केलं (Mehidy Hasan Captaincy Controversy) आहे. मेहदीच्या चट्टोगाम चॅलेंजर्सनं 5 पैकी 3 मॅच जिंकल्या असून 6 पॉईंट्ससह ही टीम पॉईंट टेबलमध्ये नंबर 1 आहे. मेहदीनं या स्पर्धेत आत्तापर्यंत सर्वात जास्त 9 विकेट्स घेतल्या असून बॅटने 83 रनचे योगदान दिले आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Exit mobile version
%%footer%%