फोटो- ट्विटर / ICC

ऑस्ट्रेलियाचा पहिला-वाहिला दौरा गाजवून 14 तासांच्या विमान प्रवासानं तो त्याच्या गावातील विमानतळावर उतरला. विमानतळावर उतरताच त्यानं सर्वात पहिल्यांदा त्याच्या लहानपणापासूनच्या क्रिकेट कोचची भेट घेतली. विमानतळावरच्या कॉफी हाऊसमध्ये दौऱ्यातील खेळाचं विश्लेषण केलं. त्याच्या नोट्स काढल्या. एक दिवसाच्या ब्रेकनंतर लगेच तो टीमसोबत रणजी ट्रॉफीच्या मॅचची प्रॅक्टीस करण्यासाठी उतरला.त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं म्हणून मित्रांना पार्टी हवी होती. पण त्याच्यासाठी खरी पार्टी म्हणजे टीमला रणजी ट्रॉफी जिंकून देणं हे होतं. अंडर 13 पासून सातत्यानं रन बनवणाऱ्या मुलाला सेलिब्रेशन हे फक्त क्रिकेटच्या मैदानावर करायचं असतं इतकंच माहिती होतं. देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्यानं रन करुन ऑस्ट्रेलियातील पहिल्या दौऱ्यात छाप पाडणाऱ्या मयांक अग्रवालचा (Mayank Agarwal) आज वाढदिवस. आजच्या दिवशीच म्हणजे 16 फेब्रुवारी 1991 रोजी (Mayank Agarwal Birthday) मयांकचा जन्म झाला.

भारतीय क्रिकेटची ‘द वॉल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुल द्रविडचं (Rahul Dravid) बंगळुरु हे त्याचं गाव. शालेय क्रिकेटपासून आक्रमक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या या ओपनरची तुलना ही नेहमी द्रविडशी नाही तर वीरेंद्र सेहवागशी (Virenrda Sehwag) केली गेली.

Gujrat Titans Squad Analysis: कशी आहे IPL 2022 मधील गुजरातची टीम? नव्याची नवलाई की गोंधळाचा गरबा?

शाळेपासूनच चमक

शालेय क्रिकेटपासून मयांकचं नाव बंगळुरुत गाजत होतं. 2008-09 साली झालेल्या अंडर-19 कुटबिहार स्पर्धेतील पाच मॅचमध्ये त्यानं 54 च्या सरासरीनं 432 रन केले. त्यामुळे 2010 साली झालेल्या अंडर-19 वर्ल्ड कपसाठी (Mayank Agarwal Birthday)  त्याची निवड झाली. त्या वर्ल्ड कपमध्ये त्यानं भारताकडून सर्वात जास्त रन केले.

घासून मिळाली संधी

देशांतर्गत क्रिकेटमध्ये 2013 साली पदार्पण केलेल्या मयांकसाठी 2017-18 चा सिझन चांगलाच यशस्वी ठरला. त्यानं त्या संपूर्ण सिझनमध्ये 2 हजारपेक्षा जास्त रन केले. चार वर्षांपासून राष्ट्रीय टीमचं दार मयांक ठोठावत होता. ‘भारत अ’ (India A) कडूनही त्यानं चांगली कामगिरी केली. सातत्यपूर्ण खेळामुळे त्याची अखेर 2018 साली भारतात होणाऱ्या वेस्ट इंडिज सीरिजसाठी राष्ट्रीय टीममध्ये निवड झाली. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) ने गाजवलेल्या त्या सीरिजमध्ये मयांक बेंचवरच होता.

खेळता येईना पिच वाकडे : चेन्नईला नावं ठेवण्यापूर्वी जरा ‘या’ महान पिचवरील रेकॉर्ड्सही पाह

त्याचवर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मयांकची निवड झाली नाही. तेंव्हा त्यानं कदाचित पुन्हा एकदा आणखी एक वर्ष देशांतर्गत क्रिकेटमध्ये 2000 रन करु असा विचार केला असेल. पण दौऱ्याच्या सुरुवातीलाच पृथ्वी शॉ जखमी झाला आणि मयांकला राष्ट्रीय टीमचा कॉल आला.

ऐतिहासिक पदार्पण

मेलबर्नमध्ये ऐतिहासिक बॉक्सिंग डे टेस्टमध्ये (Boxing Day) त्यानं पदार्पण केलं. त्या दौऱ्याच्या थोडे दिवस आधी न्यूझीलंडमध्ये ‘भारत अ’ कडून चांगली कामगिरी केल्याचा अनुभव त्याच्या गाठी होता. पहिल्याच टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये त्यानं 76 रन करत क्रिकेटमधील सर्वोच्च प्लॅटफॉर्मवर खेळण्यासाठी आपण सज्ज असल्याचं दाखवून दिलं.

त्यानंतर पुढच्याच वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) विशाखापट्टणममध्ये मयांकनं पहिली सेंच्युरी झळकावली. त्या पहिल्या सेंच्युरीचं त्यानं डबल सेंच्युरीमध्ये रुपांतर केलं. 12 व्या टेस्ट इनिंगमध्ये त्यानं डबल सेंच्युरी केली. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील ही दुसऱ्या क्रमांकाची जलद डबल सेंच्युरी होती. मयंकपूर्वी फक्त विनोद कांबळीनं (Vinod Kambli)  1993 साली त्याच्या करियरमधील पाचव्या टेस्ट इनिंगमध्ये डबल सेंच्युरी झळकावली होती.

वाढदिवस स्पेशल : विनोद कांबळी, हरवलेला सुपरस्टार!

मयंकसाठी 2019 हे लाभदायी वर्ष ठरलं. क्रिकेट वर्ल्ड कप टीममध्ये त्याचा अगदी उशीरा समावेश झाला. पण त्यात त्याला अंतिम 11 मध्ये संधी मिळाली नाही. हा एकमेव अपवाद वगळता तो सतत रन करत होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन सेंच्युरी झळकावल्यानंतर बांगलादेश (Bangladesh) विरुद्ध इंदूर टेस्टमध्ये त्यानं 243 रनची आक्रमक खेळी केली. हा त्याचा आजवरच्या टेस्ट करियरमधील सर्वोच्च स्कोअर आहे. त्या वर्षात त्यानं टेस्ट टीममधील जागा पक्की केली.

आयपीएलमध्ये अखेर चमकला!

मयंक अग्रवाल 2011 पासून (Mayank Agarwal Birthday) आयपीएल खेळतोय. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि दिल्ली डेयरडेव्हिल्स (Delhi Daredevils) या दोन टीमनंतर तो आता किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये (KIXP) चांगला स्थिरावला आहे.

कर्नाटकचाच जोडीदार के.एल.राहुलशी (KL Rahul) त्याची पंजाबच्या टीममध्ये जोडी जमली. मागील वर्षी झालेल्या आयपीएलमध्ये (IPL 2020) मयंकनं 11 मॅचमध्ये 155.55 च्या स्ट्राईक रेटनं 424 रन केले. यामध्ये 2 हाफ सेंच्युरी आणि एका सेंच्युरीचा समावेश आहे.

सचिन तेंडुलकरला पहिल्यांदा शून्यावर आऊट करणारा ‘स्विंगचा राजा’

आता पुन्हा संघर्ष

आयपीएल स्पर्धा गाजवून ऑस्ट्रेलियात गेलेल्या मयंक अग्रवालकडून  (Mayank Agrawal Birthday) सर्वांच्या मोठ्या अपेक्षा होत्या. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तिन्ही टीममध्ये त्याची निवड झाली होती. पण, फास्ट बॉलर्स समोर तो नव्या बॉलवर अपयशी ठरला. त्यामुळे त्याला सिडनी टेस्टमधून वगळण्यात आलं. ब्रिस्बेन टेस्टमध्ये प्रमुख खेळाडूंच्या दुखापतीमुळे तो अंतिम 11 मध्ये खेळला. पण त्याला त्याची नेहमीची ओपनिंगची जागा मिळाली नाही.

 भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यातील टेस्ट सीरिजमध्ये (India vs New Zealand Test Series 2021) त्याला संधी मिळाली. मुंबई टेस्टमध्ये एजाज पटेलनं (Ajaz Patel) 10 विकेट्स घेण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. या कामगिरीनंतरही न्यूझीलंडचा पराभव झाला. याचे मुख्य कारण म्हणजे मयंकनं त्या इनिंगमध्ये 150 रनची दमदार इनिंग खेळली होती. मुंबई टेस्टनंतर मयंक टीममध्ये परतला असं वाटत होतं, पण दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील निराशाजनक कामगिरीनं त्याची जागा पुन्हा अनिश्चित झाली आहे.

कर्नाटकच्या रणजी टीममध्ये त्याची 2013-14 च्या सिझनमध्ये निवड झाली. पण पुढच्याच वर्षी त्याला संपूर्ण सिझन बेंचवर बसावं लागलं. त्याचा ‘भारत अ’ टीमचा कोच राहुल द्रविडच्या मते तो सिझन मयंकसाठी टर्निंग पॉईंट होता. त्यानं त्या वर्षभरात वजन कमी केलं. त्याच्या कौशल्यावर जोमानं काम केलं. पुढील सिझनमध्ये पहिली रणजी सेंच्युरी झळकावली. या सेंच्युरीनंतर तो कर्नाटकच्या टीमचा कायमस्वरुपी सदस्य बनला.

भारतीय टीममध्ये स्थायी जागेसाठी संघर्ष करणाऱ्या मयंकनं हा स्वत:चाच इतिहास आता आठवून पुन्हा एकदा नव्यानं काम केलं पाहिजे. ज्या वीरेंद्र सेहवागची त्याची तुलना अगदी सुरवातीपासून होते, त्या सेहवागनंही सुरुवातीच्या संघर्षानंतर जोमानं कमबॅक करत स्वत:ला मोठं केलं होतं, हा देखील अगदी याच शतकातला इतिहास आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Exit mobile version
%%footer%%