पाकिस्तान किंवा भारतीय क्रिकेटमध्ये काहीही घडो त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी शोएब अख्तर (Shoaib Akhatar) नेहमी आघाडीवर असतो. या टीमने किंवा खेळाडूनं असं करावं, मी असतो तर मी असं केलं असतं हे सर्व ज्ञान तो त्याच्या YouTube चॅनलवर नेहमी देतो. पाकिस्तानच्या फास्ट बॉलरपैकी एक असलेल्या शोएबची क्रिकेट कारकिर्द ज्यानं संपवली त्या रॉस टेलरचा (Ross Taylor) आज वाढदिवस. आजच्याच दिवशी (8 मार्च 1984) रोजी टेलरचा जन्म झाला.

टेलरनं 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये (Cricket World Cup 2011) त्याच्या वाढदिवशीच पाकिस्तानविरुद्ध आक्रमक सेंच्युरी झळकावली होती. या सेंच्युरीचा सर्वात मोठा फटका शोएब अख्तरला बसला. अख्तर वर्ल्ड कपमधील पुढील एकही मॅच खेळला नाहीच त्याचबरोबर त्याला त्यापुढे पाकिस्तानकडून एकही वन-डे मॅच खेळता आली नाही. विशेष म्हणजे ती मॅच रॉस टेलरच्या वाढदिवशीच झाली होती.

वाढदिवस स्पेशल : कमरान अकमल, पाकिस्तानी क्रिकेटचा अस्सल चेहरा!

नेमकं काय घडलं ?

श्रीलंकेतल्या पलिक्लेमध्ये झालेल्या त्या साखळी फेरीतील मॅचमध्ये पाकिस्तानची पहिल्यांदा बॉलिंग होती. मॅचच्या पहिल्या चाळीस ओव्हर्सवर पाकिस्तानचे नियंत्रण होते. न्यूझीलंडचा 40 ओव्हरनंतर स्कोअर होता 4 आऊट 163.  टेलर – स्टायरिस जोडी मैदानात होती. मार्टीन गप्टीलची (Martin Guptill) हाफ सेंच्युरी वगळता न्यूझीलंडच्या टॉप ऑर्डरने निराशा केली होती.

बॉलर्स निश्चिंत, फिल्डर निवांत!

पाकिस्तानचे बॉलर्स निश्चिंत तर फिल्डर निवांत होते. कमरान अकमल (Kamran Akmal) तर रॉस टेलरला टेलरला वाढदिवासाचे गिफ्ट वाटत होता. टेलर 0 आणि 4 वर असताना अकमलने टेलरला जीवदान दिले. कमरान अकमलच्या प्रमुख भूमिकेला शोएब अख्तरने स्वैर बॉलिंग करत मोलाची साथ दिली.

शोएब अख्तरच्या एका ओव्हरमध्ये टेलरने 28 रन्स काढले. टेलरने अख्तरला त्या ओव्हरमध्ये तीन सिक्सर्स आणि दोन फोर लगावले होते. त्यापाठोपाठ अब्दुल रझ्झाकची (Abdul Razzaq) आणखी धुलाई करत त्याच्या ओव्हरमध्ये 30 रन्स ठोकले. न्यूझीलंडने शेवटच्या सहा ओव्हर्समध्ये 114 रन्स काढले. त्यात रॉस टेलरच्या नाबाद 131 रन्सचा समावेश होता. टेलरने (Ross Taylor) ते रन्स 8 फोर आणि 7 सिक्सर्सच्या मदतीने काढले होते. अकमल-अख्तर जोडीने टेलरला स्थिरावण्याची संधी दिली. टेलरने ती संधी साधत टीमला मजबूत स्कोअर करुन दिला.

रॉस टेलरच्या खेळीचे विश्लेषण. * खूण नाबाद असल्याचे दर्शविते

रनबॉल
1 ते 5078
51 ते 10039
101 ते 131*7

न्यूझीलंडने दिलेलं 303 रन्सचं टार्गेट पाकिस्तानला पेलवलं नाही. त्यांची टीम 192 रन्सवरच ऑल आऊट झाली. 110 रन्सने झालेल्या मोठ्या पराभवाचे पाकिस्तानी क्रिकेटमध्ये जोरदार पडसाद उमटले. त्याचं मुख्य बिल मॅचमध्ये 9 ओव्हर्समध्ये 70 रन्स देणाऱ्या शोएब अख्तरवर फुटलं. त्या मॅचनंतर अख्तर पाकिस्तानच्या वन-डे टीममध्ये कधी दिसलाच नाही. रॉस टेलरच्या आक्रमक सेंच्युरीमुळे पाकिस्तानच्या सर्वात फास्ट बॉलर्सच्या वन-डे करिअरचाही तितकाच फास्ट अंत झाला!

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Exit mobile version
%%footer%%