फोटो – ट्विटर/@WisdenCricket

अफगाणिस्तान क्रिकेटचा जागतिक चेहरा म्हणजे राशिद खान (Rashid Khan) . जगातल्या प्रमुख बॅट्समनची झोप उडवण्याची क्षमता त्याच्या बॉलिंगमध्ये आहे. तो संपूर्ण जगभर T20 लीग खेळतो. बहुतेक लीगमध्ये खेळलेला तो पहिला अफगाणिस्तानी आहे. T20 क्रिकेटमुळे येणारा वर्क लोड हा मोठा विषय आहे. पण T20 क्रिकेटमध्ये एका मॅचमध्ये कमाल 4 ओव्हर्स टाकता येतात. टेस्ट क्रिकेटमध्ये कोणत्याही बॉलरवर कमाल ओव्हर्स टाकण्याची मर्यादा नाही. त्यामुळे कॅप्टन आपल्या प्रमुख बॉलरला जास्तीत जास्त ओव्हर्स देतात. झिम्बाब्वे विरुद्ध नुकत्याच संपलेल्या टेस्टमध्ये (Afghanistan vs Zimbabwe) राशिद खान चक्क बॉलिंग मशिन (Bowling Machine Rashid Khan) बनला होता. त्याने या मॅचमध्ये तब्बल 99.2 ओव्हर टाकल्या. 21 व्या शतकात एका टेस्ट मॅचमध्ये कोणत्याही बॉलरनं केलेली ही सर्वात जास्त बॉलिंग आहे.

हे असं का घडलं?

झिम्बाब्वे विरुद्धची पहिली टेस्ट राशिद दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. त्याने दुसऱ्या टेस्टमध्ये या दोन्ही टेस्टची किंवा दोन बॉलरची बॉलिंग केली. राशिदने पहिल्या इनिंगमध्ये 36.3 तर दुसऱ्या इनिंगमध्ये तब्बल 62.5 अशी 99.2 ओव्हर (Bowling Machine Rashid Khan) बॉलिंग केली. यापैकी त्यानं 20 ओव्हर मेडन टाकत 11 विकेट्स घेतल्या. दुसऱ्या टेस्टमध्ये अन्य सर्व बॉलर्सना 16 विकेट्स मिळाल्या.

राशिदवर इतका लोड येण्याचं कारण अफगाणिस्तानच्या रणणितीमध्ये आहे. पहिली मॅच अफगाणिस्ताननं फक्त दोन दिवसांमध्ये गमावली होती. त्यामुळे या मॅचमध्ये त्यांनी दोन बॉलर्सला वगळलं. त्यांच्या जागेवर राशिद खान आणि एक अतिरिक्त बॅट्समन खेळवला. त्यामुळे अफगाणिस्तानची टीम दुसऱ्या मॅचमध्ये फक्त 3 बॉलर्सनी उतरली.

( वाचा : आता बोला! भारताबाहेरही टेस्ट 2 दिवसांमध्ये संपली, 132 वर्षांनतर झाला रेकॉर्ड )

बॅटींगला मदत करणाऱ्या पिचवर अफगाणिस्तानच्या सर्व अपेक्षा या राशिद खानवर होत्या. त्यातच अफगाणिस्ताने झिम्बाब्वेला ‘फॉलो ऑन’ देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राशिदला सलग दोन इनिंग बॉलिंग मशिन प्रमाणे (Bowling Machine Rashid Khan) काम करावं लागलं.

राशिदनं कुणाचा रेकॉर्ड मोडला?

राशिद खानने 99. 2 ओव्हर बॉलिंग करत ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर शेन वॉर्न (Shane Warne) याचा रेकॉर्ड मोडला आहे. वॉर्नने 2002 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये 98 ओव्हर बॉलिंग केली होती.

2000 सालापासून एका टेस्टमध्ये सर्वात जास्त ओव्हर्स टाकणारे बॉलर

बॉलरओव्हर्ससाल
राशिद खान99.22021
शेन वॉर्न98.02002
मुरलीधरन97.02001
मुरलीधरन96.02003
नॅथन लायन94.02012
रवींद्र जडेजा93.32017

मुरलीधरन अव्वल

टेस्ट क्रिकेटच्या संपूर्ण इतिहासात एका टेस्ट सर्वात जास्त बॉलिंग करण्याचा रेकॉर्ड श्रीलंकेचा ऑफ स्पिनर मुरलीधरनच्या (Muralidharan)  नावावर आहे. त्याने इंग्लंड विरुद्ध 1998 साली ओव्हलमध्ये झालेल्या टेस्टमध्ये तब्बल 113.5 ओव्हर बॉलिंग केली होती. त्यानंतर आता राशिद खानचा नंबर आहे.

राशिद खानच्या या मेहनतीचं फळ त्याला मिळालं. झिम्बाब्वे विरुद्धची ही टेस्ट अफगाणिस्तानने 6 विकेट्सनं जिंकली. त्याचबरोबर दोन टेस्टची सीरिज 1-1 ने बरोबरीत सोडवली.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Exit mobile version
%%footer%%