फोटो – ट्विटर, आयसीसी

आयसीसी स्पर्धांमध्ये (ICC Tournament) टीम इंडिया सेमी फायनल किंवा फायनलमध्ये हरते, हा अलिकडच्या काळातील इतिहास आहे. यंदा हा इतिहास बदलण्याच्या निश्चयाने टीम उतरली आहे, असं सांगण्यात आलं. आता हा इतिहास बदलण्याची फक्त औपचारिकता बाकी आहे. विजेतेपद पटकावून हा इतिहास बदलला असता तर सर्वांना आनंद झाला असता. पण तसं होणार नाही, टीम इंडिया साखळी फेरीतच स्पर्धेतून आऊट होणार आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) कॅप्टनसीमध्ये पहिल्यांदाच भारतीय क्रिकेट टीमवर आयसीसी स्पर्धेमध्ये ही वेळ आली आहे. दोन मोठ्या पराभवानंतर टीमवर ही अवस्था ओढावली आहे. टीम इंडियानं या दोन मॅचमध्ये पराभव स्वीकारला नाही तर थेट शरणागती (Team India Surrender) पत्कारली आहे.

एकदा घडतो तो अपघात, दोनदा घडते ती चूक

पाकिस्तान विरुद्धच्या वर्ल्ड कप स्पर्धांमधील (India vs Pakistan) विजयी परंरपरा यंदा तुटली. त्या मॅचमध्ये आपला थेट 10 विकेट्सनं पराभव झाला. या पराभवातून बोध घेत सात दिवसांच्या ब्रेकमध्ये चुकांवर काम करत न्यूझीलंड विरुद्ध टीम संपूर्ण तयारीसह उतरेल असा फॅन्सना विश्वास होता. ‘Cricket मराठी’ वर देखील आम्ही तीच अपेक्षा व्यक्त केली होती.

T20 World Cup 2021: टीम इंडियाला हवं तितकं ट्रोल करुन झालं असेल तर हे वाचा

न्यूझीलंड विरुद्धच्या मॅचमध्ये चित्र संपूर्ण उलट दिसलं. पाकिस्तान विरुद्ध घडलेली गोष्ट अपघात म्हणून विसरण्याची त्यासाठी माफ करण्याची संधीच विराट कोहलीच्या टीमनं दिली नाही. पुन्हा एकदा ती गोष्ट आणखी खराब पद्धतीनं केली. त्यामुळे पाकिस्तान विरुद्ध झालं तो अपघात नव्हता तर एका नामुष्कीदायक अध्यायाची सुरुवात होती, असंच आता म्हणावं लागेल.

P for Psychology, P for Panic, P for Problem

या वर्ल्ड कपसाठी निवडण्यात आलेले टीम इंडियाचे खेळाडू हे अनुभवी आणि मॅच विनर्स आहेत. त्यांनी मॅच जिंकण्यासाठी त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त नाही तर क्षमतेइतका जरी खेळ केला असता तरी या स्पर्धेत चित्रं वेगळं ठरलं असतं. मोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी खेळाडूची क्षमता ही फक्त त्याच्या मैदानातील कामगिरीवर ठरत नाही, तर ती मानसिकतेवर (Psychology) ठरते. ती मानसिकता डळमळली तर टीम पॅनिक (Panic) होते आणि त्यानंतर अनेक अडचणी (Problem) निर्माण होतात.

टीम इंडियानं बॅटींग ऑर्डरमध्ये जे बदल केले ते याच P3 प्रकारातील (Psychology, Panic आणि Problem) होती. या T20 वर्ल्ड कपची तयारी करण्यासाठी टीम मॅनेजमेंटकडं जगातील सर्व वेळ होता. त्यानंतरही त्यांनी एका पराभवानंतर T20 मधील बेस्ट ओपनरला (Rohit Sharma) खाली ढकललं. त्याला अस्थिर केलं. तीन नंबरवरच्या नेहमीच्या प्लेयरला (Virat Kohli) तो ज्या पोझिशनवर आणखी कमकुवत आहे, त्या चार नंबरवर ढकललं. या सर्व गोंधळातून प्रश्न सुटले नाहीत तर ते अधिक गुंतागुतींचे (Team India Surrender) झाले.

बायो-बबलचा थकवा मान्य पण…

न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर बोलताना फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यानं बायो-बबलच्या (Bio-Bubble) थकव्याचं कारण दिलं. क्रिकेटपटू म्हणजे रोबोट नाहीत,  मान्य आहे. त्यांच्यावरील प्रेशर आणि अतिक्रिकेटचा मानवी भूमिकेतून विचार केला पाहिजे हे देखील खरे आहे.

या सर्व गोष्टीनंतरही कोणत्याही बायो-बबलचा ताण रोहित शर्मा आणि विराट कोहलीला लेग स्पिन खेळताना होणाऱ्या त्रासाचं समर्थन करू शकत नाही. मिचेल स्टँनर आणि इश सोधी यांनी दोघांना जखडून ठेवलं. मिडल ओव्हर्समध्ये एकही फोर मारु दिला नाही. मुजीब उर रहमान आणि राशिद खान त्यांना सहज कसं सोडतील?

T20 World Cup 2021 Afghanistan: खचलेल्या देशाला उभारी देण्यासाठी क्रिकेटपटू करणार यत्न

बायो-बबल आणि अतिक्रिकेटचा कोणताही ताण हा अनफिट हार्दिक पांड्याला प्लेईंग 15 मध्ये ठेवण्याचा बचाव करु शकत नाही. टीम इंडियानं दोन्ही मॅचमध्ये त्याला प्लेईंग 11 मध्ये खेळवलं. लेग स्पिनर्सना गंडलेले रोहित-विराट ते आऊट झाल्यानंतर दबावात आलेले आणि मोठ्या शॉट्ससाठी झगडणारे ऋषभ पंत आणि अनफिट पांड्या यामुळे टीम इंडियाला 110 रनच करता (Team India Surrender) आले. T20 क्रिकेटमध्ये आणि विशेषत: मैदानात पडणारे दव लक्षात घेता कोणत्याही टीम विरुद्ध हे सेफ टोटल नव्हते. इथं तर संपूर्ण तयारीनं मैदानात उतरलेली न्यूझीलंडसारखी अनुभवी टीम होती.

‘ती’ वेळ लवकर आली

मोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना अनेकदा टीम इंडियाच्या बलस्थानांची (Strong Point) चर्चा जोरात होते. स्पर्धेची वातावरण निर्मिती करण्यात त्यामुळे मदत टीमच्या कमकुवत बाजू (Weakness) काय आहेत? त्या झाकण्यासाठी, त्यावर मात करण्यासाठी टीमचा प्लॅन काय आहे, यावर फार चर्चा होत नाही.

2019 च्या वर्ल्ड कपमध्ये (Cricket World Cup 2019) टीम इंडियाची कमकुवत बाजू असलेली मिडल ऑर्डर सेमी फायनलमध्ये उघडी पडली, आपण ती मॅच हरलो. यंदा स्पर्धेच्या सुरुवातीलाच उघडी पडल्यानं टीम इंडियानं थेट शरणागतीच पत्कारली आहे. आता यापुढचे सर्व विजय म्हणजे कामगारांना मुळ पगार न देता दिवाळीच्या तोंडावर देण्यात आलेल्या बोनससारखा आहे. त्यानं घरखर्च तर भागत नाही, पण ‘हे ही नसे थोडके’ म्हणत समाधान मानण्याची जबाबदारी मालकांनी कामगारांवर ढकलली (Team India Surrender) असते.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

     

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Exit mobile version
%%footer%%