फोटो – ट्विटर, रेडिओ पाकिस्तान

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या T20 वर्ल्ड कपमधील मॅचची (ICC T20 World Cup 2021, India vs Pakistan) सर्वांनाच उत्सुकता आहे. या वर्ल्ड कपच्या इतिहासात पाकिस्तानला भारताविरुद्ध आजवर एकही मॅच जिंकता आलेली नाही. मात्र त्यांची बडबड (नेहमीप्रमाणे) सुरूच आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) अध्यक्षांनी भारताला हरवल्यास खेळाडूंना कोरा चेक देण्याची ऑफर केली आहे. पीसीबी त्यांच्या खेळाडूंना फुगवत असतानाच त्यांना घरचा आहेर मिळाला आहे. पाकिस्तान टीमचा माजी कॅप्टन आणि हेड कोच मिसबाह उल हक (Misbah on Pakistan) याने पीसीबीच्या कारभारावर जाहीर टीका करत गंभीर आरोप केले आहेत.

काय केला आरोप?                         

T20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानची टीम जाहीर होईपर्यंत हेड कोच असलेल्या मिसाबहनं पाकिस्तान क्रिकेटच्या खराब व्यवस्थेवरच बोट ठेवलं आहे. ‘देशांतर्गत पातळीवर खेळाडूंचा विकास व्हावा यासाठी आपण कोणतेही काम करत नाही. आपल्याला फक्त निकाल हवा असतो. तो निराल अपेक्षेप्रमाणे लागला नाही, तर बळीचा बकरा शोधण्याचं काम सुरू होतं. दुर्दावानं पाकिस्तान क्रिकेटमध्ये बळीचा बकरा शोधण्याची सवय चांगलीच प्रचलित झाली आहे. एक मॅच किंवा सीरिज हरल्यानंतर आपण स्वत:ला वाचवण्यासाठी बळीचा बकरा शोधू लागतो.’

वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या सीरिजपर्यंत पाकिस्तानचा कोच असलेल्या मिसाबहनं सांगितलं की, ‘आपण हिच कॉस्मेटीक सर्जरी कायम ठेवली तर काहीही बदलणार नाही. तुम्ही खेळाडू आणि कोच यांच्यात बदल कराल, पण मूळ समस्या तीच राहणार आहे आपल्या क्रिकेटमध्ये फक्त निकाल पाहिले जातात. पण, पुढची योजना तसंच व्यवस्था सुधारण्यासाठी आमच्याकडं वेळ किंवा संयम नाही.’ असं मिसबाहनं (Misbah on Pakistan) सांगितलं.

अचानक काय झालं? वाचा, पाकिस्तानचा हेड कोच मिसबाह उल हकनं राजीनामा देण्याचं खरं कारण…

T20 वर्ल्ड कपपूर्वी निवड समितीची कार्यपद्धती आणि त्यांनी टीममध्ये केलेल्या बदलावर बरीच टीका करण्यात आली. त्या प्रश्नावर बोलताना मिसबाह म्हणाला की, ‘हे काय होत आहे? तुम्ही आधी काही खेळाडूंचा वर्ल्ड कप टीममध्ये समावेश करता आणि 10 दिवसानंतर  यू टर्न घेत त्यांना टीममधून बाहेर काढता.’’

व्यवस्था पाहिलेला क्रिकेटपटू

मिसबाह उल हक हा पाकिस्तानची क्रिकेट व्यवस्था कोळून पिलेला क्रिकेटपटू आहे. तो पाकिस्तान टीमचा माजी कॅप्टन आणि माजी हेड कोच आहे. या वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानची टीम घोषित होताच त्यानं पदाचा राजीनामा (Misbah on Pakistan) दिला होता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी टीम निवडीवरुन झालेल्या मतभेदानंतर त्यानं पदाचा राजीनामा दिला.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Exit mobile version
%%footer%%