फोटो – ट्विटर/BCCI

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील दुसऱ्या टेस्टला चेन्नईत सुरुवात झाली. चेन्नईत झालेली पहिली टेस्ट टीम इंडियानं गमावली होती. या पराभवामुळे चार टेस्टच्या सीरिजमध्ये टीम इंडिया (Team India) 0-1 अशी पिछाडीवर आहे. टॉस जिंकून पहिली बॅटींग घेतलेल्या भारतीय टीमनं पहिल्या दिवसाअखेर 6 आऊट 300 रन केले आहेत. हा स्कोअर करताच टीम इंडियाचा विजय पहिल्या दिवशीच पक्का झाला आहे.

कुणामुळे झाले 300?

रोहित शर्माची (Rohit Sharma) सेंच्युरी हे पहिल्या दिवसाच्या खेळाचं पहिलं वैशिष्ट्य ठरलं. 2021 साली भारताकडून पहिली सेंच्युरी झळकावण्याचा मान रोहितनं मिळवला आहे. रोहितनं 161 रन्सची आक्रमक इनिंग खेळली. रोहितनं अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) सोबत चौथ्या विकेटसाठी 162 रनची पार्टरनरशिप केली. मेलबर्न टेस्टमध्ये झळकावलेल्या सेंच्युरीनंतर पहिल्यांदाच रहाणेनं हाफ सेंच्युरी केली. रहाणे 67 रन काढून आऊट झाला. रोहित – रहाणेच्या योगदानामुळेच भारतानं पहिल्या दिवशी 300 रनपर्यंत मजल मारली.

( वाचा : IND vs ENG : ‘तुम्हाला इथं काहीही मसाला मिळणार नाही’, ‘त्या’ प्रश्नावर अजिंक्यचं ठाम उत्तर! )

टीम इंडियाचा विजय का पक्का?

टीम इंडियाचा घरातला रेकॉर्ड पाहिला तर हे रन आपल्याला टेस्ट मॅच जिंकण्यासाठी पुरेसे आहेत.  भारतीय टीमनं या मॅचच्या पूर्वी घरच्या मैदानावर पहिल्या इनिंगमध्ये 83 वेळा 300 पेक्षा जास्त रन केले आहेत. यापैकी 36 मॅच म्हणजेच 43 टक्के मॅच जिंकल्या आहेत. तर फक्त 4 टेस्टमध्ये आपला पराभव झाला आहे. तर उर्वरित मॅच ड्रॉ झाल्या आहेत. याचाच अर्थ फक्त 5 टक्के टेस्ट मॅचमध्ये पहिल्या इनिंगमध्ये 300 पेक्षा जास्त रन केल्यानंतरही भारतीय टीम पराभूत झाली आहे.  

विशेष म्हणजे गेल्या नऊ वर्षात एकदाही भारतीय टीम पहिल्या इनिंगमध्ये 300 पेक्षा जास्त रन केल्यानंतर पराभूत झालेली नाही. भारतीय टीमनं 12 पैकी 11 मॅचमध्ये विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेला 4, न्यूझीलंड 3 तर इंग्लंड, बांगलादेश आणि अफगाणिस्तान विरुद्ध टीम इंडियानं प्रत्येकी एक टेस्ट जिंकली आहे. तर श्रीलंकेविरुद्धची टेस्ट ड्रॉ झाली आहे. यापैकी चार टेस्ट मॅच टीम इंडियानं एका इनिंगच्या फरकानं जिंकल्या आहेत.

( वाचा : IND vs ENG: टीम इंडिया आहे चेन्नईची किंग, इंग्लंडसमोर पर्वत सर करण्याचं आव्हान! )

चेन्नईतही तगडा रेकॉर्ड

चेन्नई टेस्टमध्ये (Chennai Test) 300 पेक्षा जास्त रन केल्यानंतर तर आपला आणखी जबरदस्त रेकॉर्ड आहे. टीम इंडियानं यापूर्वी चेन्नईत चार टेस्टमध्ये ही कामगिरी केली आहे. त्यापैकी एकही टेस्ट गमावलेली नाही. 1988 साली वेस्ट इंडिजला तर 1993 साली इंग्लंडला आपण पराभूत केले होते. तर 1967 साली वेस्ट इंडिज विरुद्ध आणि 1998 मध्ये इंग्लंडच्या विरुद्धची टेस्ट ड्रॉ झाली होती.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Exit mobile version
%%footer%%